एक्स्प्लोर

वयाच्या 26व्या वर्षी आमदार अन् दोन वर्षांपूर्वी विक्रमी मतांनी दुसऱ्यांदा खासदार; आता शिंदेंच्या गळाला लागताच पुण्यातून दुसऱ्या मार्गाने कलटी मारली, फुटीर ओमराजेंचीच सर्वाधिक चर्चा का होत आहे?

Omraje Nimbalkar: ओमराजे निंबाळकर यांची आक्रमक भाषणे, त्यांनी मांडलेल्या भूमिका कायम शिवसैनिकांमध्ये चर्चेत होत्या. त्यांना 2024 मध्ये 3 लाख 29 हजार 886 मतांचे लीड मिळाले होते.

Omraje Nimbalkar: जवळपास चार वर्षांपूर्वी फुटलेला शिवसेना ठाकरे पक्ष आता पुन्हा फोडण्यात आला आहे. ठाकरेंकडील 9 पैकी 6 खासदार शिंदेंच्या गळाला लागले असून त्यामध्ये धाराशिव खासदार ओमराजे निंबाळकर यांचाही समावेश असल्याने शिवसेना ठाकरे गटासह शिवसैनिकांना सुद्धा धक्का बसला आहे. फुटलेल्या पाच खासदारांपैकी सर्वाधिक चर्चा ओमराजे निंबाळकर यांचीच होत आहे.  

विक्रमी मतांनी खासदार अन् 26 व्या वर्षी आमदार 

ओमराजे निंबाळकर यांची आक्रमक भाषणे, त्यांनी मांडलेल्या भूमिका कायम शिवसैनिकांमध्ये चर्चेत होत्या. त्यांना 2024 मध्ये 3 लाख 29 हजार 886 मतांचे लीड मिळाले होते. ते पहिल्यांदा 2019 मध्ये पहिल्यांदा खासदार झाले होते. त्यानंतर 2024 मध्ये त्यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली. ओमराजे वयाच्या 26व्या वर्षी आमदार झाले होते. त्यांना जनतेमधून असणारा पाठिंबा, पक्ष, ठाकरे कुटुंबाप्रती स्नेह, फिटनेसमुळे लोकप्रियता मिळाली.

खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केल्याची चर्चा 

दुसरीकडे, शिंदेंच्या गळाला लागलेल्या खासदारांनी गट स्थापन केला असून त्याला लोकसभा अध्यक्षांनी मान्यता दिली आहे. यामध्ये ओमराजे यांच्यासह संजय दीना पाटील, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय जाधव आणि संजय देशमुख यांचा समावेश आहे. दुसरीकडे, आज (17 जून) गट स्थापन केल्याचे समोर आलं असलं तरी सहा खासदारांचे पत्र अजून समोर आलेलं नाही. त्यामुळे त्यांनी सही केली आहे की नाही याबाबत स्पष्टता आलेली नाही. 

पुण्यात माध्यमांना चुकवून कलटी मारली

दरम्यान, दिल्लीहून पुण्यात आल्यानंतर ओमराजे पुणे विमानतळावर व्हीआयपी लाऊंजमध्ये तीन तास बसून होते. त्यानंतर त्यांनी स्वत:चे वाहन टाळत त्यांनी खासगी वाहने घरी जाणे पसंत केले. त्यामुळे बंडखोरी केली आहे, तर ते लपवाछपवी कशासाठी असा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला आहे. दुसरीकडे, मतदारसंघात त्यांच्या बंडखोरीनंतर संतप्त भावना उमटल्या आहेत. काहींनी शेण फासण्याचा इशारा दिला आहे. 

ओमराजे राजकारणात कसे आले?

ओमराजे यांचा राजकारणातील प्रवेश अतिशय कठीण परिस्थितीत झाला. त्यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांची  मध्ये हत्या झाली. त्यानंतर अवघ्या 22-23 वर्षांचे असताना त्यांच्यावर कुटुंबाची आणि राजकीय वारशाची मोठी जबाबदारी आली. वडिलांच्या निधनानंतर खचून न जाता त्यांनी जनतेमध्ये जाणे पसंत केले. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत ते पहिल्यांदा शिवसेनेकडून धाराशिव (उस्मानाबाद) मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पहिल्यांदा मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत संसद गाठली. त्यानंतर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून त्यांनी पुन्हा एकदा दणदणीत विजय मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले.

'उद्धव साहेबांनी मला पदरात घेतलं, मला सांभाळलं'

एबीपी माझाच्या 'माझा कट्टा'वर आलेले ओमराजे नेहमीपेक्षा खूप वेगळे, भावूक पण तितकेच आक्रमक पाहायला मिळाले होते. ते म्हणाले होते की, ज्याचा बाप गेलाय तो रडेल नाही तर काय हसेल का? लहान वयात वडिलांचे छत्र हरपल्यानंतर जी परिस्थिती मी आणि माझ्या कुटुंबाने अनुभवली, ती शब्दांत सांगता येणार नाही. पण मी कधीही रडत बसलो नाही. लोकांचे प्रेम आणि वडिलांचे आशीर्वाद पाठीशी होते, म्हणूनच मी आज इथपर्यंत उभा राहू शकलो. पवनराजे निंबाळकरांच्या हत्येनंतर या धाराशिवच्या जनतेने आणि उद्धव साहेबांनी मला पदरात घेतलं, मला सांभाळलं.

इतर महत्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
Mira Bhayandar News: रहिवासी इमारतींमध्ये कुर्बानीवर बंदी; सत्ताधारी भाजपने महासभेत प्रस्ताव केला मंजूर, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडासह गुन्ह्याची तरतूद
मीरा-भाईंदरमधील रहिवासी इमारतींमध्ये कुर्बानीवर बंदी; सत्ताधारी भाजपने महासभेत प्रस्ताव केला मंजूर, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडासह गुन्ह्याची तरतूद
Washim Crime Couple death: आंतरजातीय लग्नाला घरच्यांकडून विरोध, वाशिमच्या प्रेमी जोडप्याने मोर्णा तलावात एकत्रच उडी मारुन आयुष्य संपवलं
आंतरजातीय लग्नाला घरच्यांकडून विरोध, वाशिमच्या प्रेमी जोडप्याने मोर्णा तलावात एकत्रच उडी मारुन आयुष्य संपवलं
Sameer Wankhede on Tukaram Mundhe: बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
Advertisement

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
Sameer Wankhede on Tukaram Mundhe: बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
Ganesh Naik: डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
Baba Ramdev on Kangana Ranaut: शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
Pune Crime News: टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
David Warner News : कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
Embed widget