एक्स्प्लोर

Pravin Darekar : शेकडो जीआर अद्यापही शासनाच्या वेबसाईटवर अपलोडच का नाही? हजारो कोटीच्या गैरव्यवहाराचा दरेकरांचा आरोप

एकनाथ शिंदे यांच्याकडे जवळपास 50-51 आमदार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीला असलेल्या पाठिंब्याच्या संख्येतून हे आमदार कमी केले तर सरकार अल्पमतात असल्याचे स्पष्ट दिसून येत असल्याचेही दरेकर यांनी स्पष्ट केले. 

मुंबई :  राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विविध विभागांनी घेतलेले शेकडो शासन निर्णय (जीआर) अद्यापही शासनाच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आलेले नाहीत, त्या प्रस्तावांची किंमत सुमारे हजारो कोटीच्या घरात आहेत. जीआरचे हे प्रस्ताव शासनाच्या  वेबसाईटवर प्रसिध्द केल्यास महाविकास आघाडी सरकराचे गैरकृत्य व गैरव्यवहार उघड होण्याची सरकारला भीती वाटत आहे असा गंभीर आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज केला. तसेच विरोधी पक्ष नेते या नात्याने आपण चार दिवसांपूर्वी राज्यपालांना पत्र पाठवून शासनाच्या सुमारे 160 जीआर संदर्भात हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती. महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने राज्यपालांनी या विषयाची दखल घेऊन त्यामध्ये हस्तक्षेप केल्याबद्दल प्रविण दरेकर यांनी राज्यातील कोट्यवधी जनतेच्यावतीने राज्यपालांचे आभार व्यक्त केले. 

विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, जवळपास 450  जीआर शासनाच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आले असले तरीही विविध विभागांचे अद्यापही शेकडो जीआर अजूनही वेबसाईटवर अपलोडही करण्यात आलेले नाहीत. हे जीआर म्हणजे कोणाचे तरी हित जपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही दरेकर यांनी केला. 

दरेकर यांनी सांगितले की, विरोधी पक्ष नेते या नात्याने तीन दिवसांपूर्वी राज्यपालांना पत्र पाठवून एकाच दिवसात 160 जीआर काढण्यात आल्याची माहिती देत हा सर्व प्रकार संशयास्पद असून यामध्ये तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती राज्यपालांकडे केली होती. अडीच वर्षांच्या काळात सरकारला निर्णय घेण्यास वेळ मिळत नव्हता, पण जे शेकडो जीआर काही दिवासांमध्ये काढण्यात आले यामध्ये गैरव्यवहार झाल्याची दाट शक्यता आहे. काही लोकांचे हित साधण्यासाठी घाई गर्दीत हे जीआर काढण्यात आले आहेत. तसेच राज्यात राजकीय अस्थिरता असताना व सरकार अल्पमतात असताना असे निर्णय घेणे उचित नव्हे. म्हणूनच हे सर्व जीआर थांबविण्याची विनंती आपण राज्यपालांकडे केली होती.

राज्य सरकारने जरी शासन निर्णय काढले तरी हा प्रश्न राज्यातील जनतेचा आहे व सर्व पैसा जनतेचा आहे. कारण सरकार हे जनतेचे आहे. जनतेच्या पैश्यांचा अपव्यय होऊ नये व अवास्तव खर्च होऊ नये. हीच आमची प्रामाणिक भावना आहे. असे सांगतानाच दरेकर म्हणाले की, सरकार अल्पमतात असताना व राज्यपालांना यांसदर्भात पत्र देऊनही असे शासन निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळे या सरकारला आता कशाचीच भीती राहिलेली नाही. केवळ पैसे कमविण्याचा सपाटा राज्य सरकारचा दिसत असल्याचा आरोपही दरेकर यांनी यावेळी केला.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आहे. कारण एकनाथ शिंदे यांच्याकडे जवळपास 50-51 आमदार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीला असलेल्या पाठिंब्याच्या संख्येतून हे आमदार कमी केले तर सरकार अल्पमतात असल्याचे स्पष्ट दिसून येत असल्याचेही दरेकर यांनी स्पष्ट केले. 

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने 17 ते 27 जून 2022 या काळात शासनाच्या 32 विभागांकडून एकूण 443  जीआर काढण्यात आले आहेत. यामध्ये सर्वाधिक 152 जीआर हे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडून काढण्यात आले तर मृदू व जलसंधारण विभागाचे 32, शालेय व क्रिडा विभागाचे 27, महसूल व वन विभागाचे 23, सार्वजनिक आरोग्य विभागाचे 22, जलसंपदा विभागाचे 20, सार्वजनिक बांधकाम विभागाचे 19, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे 17 जीआर आदी प्रमुख विभागांचा समावेश असल्याची माहिती विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज सविस्तरपणे कागदपत्रांसह सादर केली.

एबीपी माझाच्या मुंबई ब्युरो मध्ये गेल्या वर्षभरापासून मुंबई प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी  ई टीव्ही भारत,लोकमत आणि मुंबई तरुण भारत या माध्यम समूहांमध्ये कार्यरत होते. सर्वसामान्य घडामोडींसह राजकीय बातम्याचं वार्तांकन ते करतात.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Shivsena Operation Tiger: 'ऑपरेशन टायगर'च्या यशानंतर शिंदेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन धडाक्यात साजरा होणार
'ऑपरेशन टायगर'च्या यशानंतर शिंदेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन धडाक्यात साजरा होणार
'खोक्यांनी पैसे घेऊन गद्दारी करणाऱ्यांना जनतेच्या पैशातून Y+ सुरक्षा..' फुटीरांच्या सुरक्षेवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांचा सडकून प्रहार, सोशल मीडियातही टीकेचा आसूड
'खोक्यांनी पैसे घेऊन गद्दारी करणाऱ्यांना जनतेच्या पैशातून Y+ सुरक्षा..' फुटीरांच्या सुरक्षेवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांचा सडकून प्रहार, सोशल मीडियातही टीकेचा आसूड
Shiv Sena UBT Crisis: ठाकरेंच्या सेनेकडून बाळासाहेबांच्या आदेशांची आठवण, फुटीर खासदारांना थेट Y+ सुरक्षा तैनात! राऊत म्हणाले, 'फक्त अर्धा तास मला ईडी, सीबीआय द्या, पहिला गिरीश महाजनला फोडतो..'
ठाकरेंच्या सेनेकडून बाळासाहेबांच्या आदेशांची आठवण, फुटीर खासदारांना थेट Y+ सुरक्षा तैनात! राऊत म्हणाले, 'फक्त अर्धा तास मला ईडी, सीबीआय द्या, पहिला गिरीश महाजनला फोडतो..'
Ravikant Tupkar: झाडावर चढला, सुतळी बॉम्ब फेकला, पोलीस येताच राष्ट्रगीत बोलू लागला; रविकांत तुपकरांच्या कार्यकर्त्यांचं मुंबईत आंदोलन
झाडावर चढला, सुतळी बॉम्ब फेकला, पोलीस येताच राष्ट्रगीत बोलू लागला; रविकांत तुपकरांच्या कार्यकर्त्यांचं मुंबईत आंदोलन

व्हिडीओ

Sanjay Raut Arvind Sawant : फुटणाऱ्या आमदार-खासदारांना रस्त्यात तुडवा, ठाकरेंच्या शिवसेनेचा ॲक्शन प्लॅन ठरला
BJP Grand Plan Operation Tiger : शिदेंना ताकदीची गोळी, भाजपची कोणती खेळी? Special Report
Opration Tiger : खासदार वाढले तरी ऑपरेशन टायगर सुरूच; शिंदेंचं अंतिम लक्ष्य काय? | Special Report
Operation Tiger Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : ऑपरेशन फत्ते की ठाकरेंकडे पत्ते? | Special Report
Arvind Sawant on Operation Tiger : ऑपरेशन टायगर फेल, सगळे खासदार ठाकरेंसोबत, सावंतांचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! बेस्ट कर्मचारी जाणार संपावर, बससेवा आणि वीज विभागावर परिणाम होण्याची शक्यता
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! बेस्ट कर्मचारी जाणार संपावर, बससेवा आणि वीज विभागावर परिणाम होण्याची शक्यता
Operation Tiger : खासदारांमागे ठाकरेंचे आमदारही येणारच आहेत, शिंदे साहेबांचं करेक्ट प्लॅनिंग; ऑपरेशन टायगरनंतर बड्या नेत्याचा दावा
खासदारांमागे ठाकरेंचे आमदारही येणारच आहेत, शिंदे साहेबांचं करेक्ट प्लॅनिंग; ऑपरेशन टायगरनंतर बड्या नेत्याचा दावा
Karnataka MLC Election: कर्नाटकात डीकेंचा मुख्यमंत्री होताच भाजपचा 'फंडा' भाजपला दाखवत सर्जिकल स्ट्राईक! मतांचा कोटा नसतानाही अनपेक्षित पाचवी जागा जिंकून दाखवली
कर्नाटकात डीकेंचा मुख्यमंत्री होताच भाजपचा 'फंडा' भाजपला दाखवत सर्जिकल स्ट्राईक! मतांचा कोटा नसतानाही अनपेक्षित पाचवी जागा जिंकून दाखवली
देशाच्या माजी पंतप्रधानांच्या माजी खासदार चिरंजीवांना सायबर भामट्यांचा तब्बल 7.8 कोटींचा गंडा! बनावट व्हॉट्सॲप अकाउंट तयार करून धडाधड 30 ते 40 खात्यात पैसे ट्रान्सफर
देशाच्या माजी पंतप्रधानांच्या माजी खासदार चिरंजीवांना सायबर भामट्यांचा तब्बल 7.8 कोटींचा गंडा! बनावट व्हॉट्सॲप अकाउंट तयार करून धडाधड 30 ते 40 खात्यात पैसे ट्रान्सफर
Rajya Sabha Election: इकडं मध्य प्रदेशात मीनाक्षी नटराजनांची उमेदवारी रद्द, तिकडं झारखंडमध्ये क्रॉस व्होटिंग, काँग्रेस उमेदवाराचा पराभव; भाजप-समर्थित अपक्ष उद्योगपतीचा विजय
इकडं मध्य प्रदेशात मीनाक्षी नटराजनांची उमेदवारी रद्द, तिकडं झारखंडमध्ये क्रॉस व्होटिंग, काँग्रेस उमेदवाराचा पराभव; भाजप-समर्थित अपक्ष उद्योगपतीचा विजय
'खोक्यांनी पैसे घेऊन गद्दारी करणाऱ्यांना जनतेच्या पैशातून Y+ सुरक्षा..' फुटीरांच्या सुरक्षेवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांचा सडकून प्रहार, सोशल मीडियातही टीकेचा आसूड
'खोक्यांनी पैसे घेऊन गद्दारी करणाऱ्यांना जनतेच्या पैशातून Y+ सुरक्षा..' फुटीरांच्या सुरक्षेवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांचा सडकून प्रहार, सोशल मीडियातही टीकेचा आसूड
टीम इंडियात एन्टी होताच वैभव सूर्यवंशी पहिल्याच गंभीर वादात अडकला, कारवाईचा सुद्धा दणका; आता बीसीसीआय लक्ष घालणार की नाही? सचिवांनीच केला खुलासा
टीम इंडियात एन्टी होताच वैभव सूर्यवंशी पहिल्याच गंभीर वादात अडकला, कारवाईचा सुद्धा दणका; आता बीसीसीआय लक्ष घालणार की नाही? सचिवांनीच केला खुलासा!
Shivsena Crisis : संजय दिना पाटील यांचा शेवटपर्यंत खोटारडेपणा, विमान पकडून लगेच बैठकीला येतो म्हणाले अन् गायब झाले, ठाकरेंच्या बैठकीतील Inside Story 
संजय दिना पाटील यांचा शेवटपर्यंत खोटारडेपणा, विमान पकडून लगेच बैठकीला येतो म्हणाले अन् गायब झाले, ठाकरेंच्या बैठकीतील Inside Story 
Embed widget