एक्स्प्लोर

16 टन माती, औरंगाबादकर पाकिस्तानची माती का खात आहेत?

ही माती शहरातील वेगवेगळ्या किरणा दुकानात विकली तर जातेच, शिवाय ती चवीने खाल्लीही जाते. ही मुलतानी माती असते. राखाडी रंगाची भाजकी माती खाण्यासाठी वापरली जाते.

औरंगाबाद : औरंगाबादकरांना सध्या पाकिस्तानची माती खाण्याची सवय लागली आहे. माती खाणाऱ्यांमध्ये महिला, तरुणी अग्रेसर आहेत. औरंगाबादकर थोडी-थोडकी नाही तर वर्षाला तब्बल 16 टन माती रिचवत आहेत. पाकिस्तानच्या मुलतानमधून आलेले हे भाजक्या मातीचे खडे  गुजरात, राजस्थानमधून ट्रक भरुन औरंगाबादच्या जुन्या मोंढ्यात पोहोचले आहेत. ही माती शहरातील वेगवेगळ्या किरणा दुकानात विकली तर जातेच, शिवाय ती चवीने खाल्लीही जाते. ही मुलतानी माती असते. राखाडी रंगाची भाजकी माती खाण्यासाठी वापरली जाते. ही भाजकी माती हलक्या-भारी प्रतीनुसार 500 ते 1 हजार रुपयांपर्यंत एक पोते या दराने विकली जाते. किरकोळ विक्रीत 20 ते 40 रुपये किलोने मातीचे खडे मिळतात. एका दुकानातून दररोज 5 ते 10 किलोपर्यंत भाजकी माती विकली जाते. काही जण दररोज साधारणत: 20 ग्रॅम ते 50 ग्रॅमपर्यंत मातीचे खडे खातात. यात महिला, तरुणी आणि पुरुषांनाही माती खाण्याचं व्यसन लागलं आहे. पण प्रश्न असा आहे की औरंगाबादकर ही माती का खात आहेत? यावर स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सविता पानट सांगतात की, "माती खाणं जसं व्यसन आहे तसं माती खाणारे 'पिका' या मानसिक आजाराने ग्रासलेले असतात. आयर्न, फॉलिक अ‍ॅसिडच्या कमतरतेने महिलांना माती खाण्याची सवय लागते. शहरातील 60 तर ग्रामीण भागातील 80 टक्के महिलांना अ‍ॅनिमिया असतो. आयर्नच्या कमतरतेमुळे 30 टक्के महिला माती खातात. माती खाल्ल्याने गरोदर महिलांची अपूर्णकालीन प्रसूती होणे, बाळाचे वजन कमी भरणे, तसेच प्रसूती काळात हृदयदाब वाढणे, अशा तक्रारी येण्याची शक्यता असते. खरंतर शास्त्रीयदृष्या सुरक्षित असलेल्या बाजारात कॅल्शियमच्या गोळ्या असतात, पण त्यापेक्षा मातीखाण्याकडेच बायकांचा कल आहे, असं आयुर्वेद चिकित्सक डॉ. संतोष नेवपूरकर यांनी सांगितलं. "निसर्गाच्या प्रत्येक घटकात औषधी गुण असतात. मातीतही औषधी गुण आहेत. आजही गेरुचा वापर आयुर्वेदात औषधी म्हणून केला जातो. पण आता कॅल्शियमच्या गोळ्या आल्या आहेत. शरीरातील लोहाचे कमी प्रमाण त्याने भरुन निघते," असं डॉ. संतोष नेवपूरकर म्हणाले. मात्र, कोणतीही गोष्ट खाताना तारतम्य बाळगा, माती खाऊन आरोग्याची माती करु नका, अन्यथा आयुष्याची माती होईल, असा सल्ला जाणकार देत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Supriya Sule on CM Post: भाजपसोबत NDAमध्ये गेल्यास मुख्यमंत्रीपद मिळण्याची चर्चा, सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच म्हणाल्या...
भाजपसोबत NDAमध्ये गेल्यास मुख्यमंत्रीपद मिळण्याची चर्चा, सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच म्हणाल्या...
Sunetra Pawar and Supriya Sule: यशवंतराव चव्हाणांचा स्मृतीदिन; साताऱ्यात सुनेत्रा पवार अन् सुप्रिया सुळे एकाच मंचावर, नतमस्तक होत चर्चा, नेमकं काय घडलं?
यशवंतराव चव्हाणांचा स्मृतीदिन; साताऱ्यात सुनेत्रा पवार अन् सुप्रिया सुळे एकाच मंचावर, नतमस्तक होत चर्चा, नेमकं काय घडलं?
Omraje Nimbalkar On Loksabha Election 2029: चॅलेंज स्वीकारलं, 2029 ला किती मतांनी जिंकणार?; ओमराजे निंबाळकरांनी जाहीर करुन टाकलं, धाराशिवमध्ये जबरदस्त भाषण!
चॅलेंज स्वीकारलं, 2029 ला किती मतांनी जिंकणार?; ओमराजे निंबाळकरांनी जाहीर करुन टाकलं, धाराशिवमध्ये जबरदस्त भाषण!
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: एकनाथ शिंदे म्हणजे संपूर्ण शिवसेना नाही; सिब्बल यांचा युक्तिवाद, आजच्या सुनावणीकडे देशाचं लक्ष, गेल्या सुनावणीत नेमकं काय घडलेलं?
एकनाथ शिंदे म्हणजे संपूर्ण शिवसेना नाही; सिब्बल यांचा युक्तिवाद, आजच्या सुनावणीकडे देशाचं लक्ष, गेल्या सुनावणीत नेमकं काय घडलेलं?

व्हिडीओ

Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Flex: पुण्यात ‘भाऊ फ्लेक्स काढा’ मोहिम; भाजपचेच ‘नेते’ आघाडीवर, पालिकेकडून विद्रुपीकरण पुरस्काराचे मानकरी जाहीर, स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमालेंसह नगरसेवक पृथ्वीराज सुतार, पांडे यादीत
पुण्यात ‘भाऊ फ्लेक्स काढा’ मोहिम; भाजपचेच ‘नेते’ आघाडीवर, पालिकेकडून विद्रुपीकरण पुरस्काराचे मानकरी जाहीर, स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमालेंसह नगरसेवक पृथ्वीराज सुतार, पांडे यादीत
Hinjewadi Crime News: साडेतीन वर्षांचे प्रेमसंबंध; तीन महिन्यांपासून वाद, रागात प्रेयसीचं डोकं आधी भिंतीवर मग बेडवर आपटलं... इन्फोसिसच्या शुभमने विप्रोच्या कोमलला संपवलं अन्...
साडेतीन वर्षांचे प्रेमसंबंध; तीन महिन्यांपासून वाद, रागात प्रेयसीचं डोकं आधी भिंतीवर मग बेडवर आपटलं... इन्फोसिसच्या शुभमने विप्रोच्या कोमलला संपवलं अन्...
Sunetra Pawar and Supriya Sule: यशवंतराव चव्हाणांचा स्मृतीदिन; साताऱ्यात सुनेत्रा पवार अन् सुप्रिया सुळे एकाच मंचावर, नतमस्तक होत चर्चा, नेमकं काय घडलं?
यशवंतराव चव्हाणांचा स्मृतीदिन; साताऱ्यात सुनेत्रा पवार अन् सुप्रिया सुळे एकाच मंचावर, नतमस्तक होत चर्चा, नेमकं काय घडलं?
Sunil Tatkare on Konkan new district: कोकणात नव्या जिल्ह्याची निर्मिती झाल्यास मुख्यालय कुठे? सुनील तटकरेंचं महत्त्वपूर्ण वक्तव्य, म्हणाले....
कोकणात नव्या जिल्ह्याची निर्मिती झाल्यास मुख्यालय कुठे? सुनील तटकरेंचं महत्त्वपूर्ण वक्तव्य, म्हणाले....
Mumbai Andheri Police station: अंधेरी पोलीस ठाण्यात नाट्यमय घडामोडी, वरिष्ठ अधिकाऱ्याच्या ट्रान्सफरनंतर फटाके वाजवणाऱ्या त्या महिला कॉन्स्टेबलचीही बदली, नक्की काय घडलं?
अंधेरी पोलीस ठाण्यात नाट्यमय घडामोडी, वरिष्ठ अधिकाऱ्याच्या ट्रान्सफरनंतर फटाके वाजवणाऱ्या त्या महिला कॉन्स्टेबलचीही बदली, नक्की काय घडलं?
Naigaon Vasai News: आईच्या मृत्यूचा घाव ताजा असतानाच काळाचा दुसरा घाला; हॉस्टेलला जाण्याच्या आदल्या दिवशी सहा वर्षांच्या चिमुरड्याचा 11व्या मजल्यावरून पडून मृत्यू
आईच्या मृत्यूचा घाव ताजा असतानाच काळाचा दुसरा घाला; हॉस्टेलला जाण्याच्या आदल्या दिवशी सहा वर्षांच्या चिमुरड्याचा 11व्या मजल्यावरून पडून मृत्यू
Silver Rate : चांदी तीन महिन्यात 1 लाख रुपयांनी स्वस्त, आता चांदीचे दर महागणार की आणखी स्वस्त होणार, तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या 
चांदी तीन महिन्यात 1 लाख रुपयांनी स्वस्त, आता चांदीचे दर महागणार की आणखी स्वस्त होणार?
Chikkodi Belagaum : 'संबंध ठेव, नाहीतर अत्याचाराचा गुन्हा दाखल करेन'; धमकीला कंटाळून प्रियकराने 38 वर्षीय विवाहित प्रेयसीचा जंगलात नेऊन काटा काढला
'संबंध ठेव, नाहीतर अत्याचाराचा गुन्हा दाखल करेन'; धमकीला कंटाळून प्रियकराने 38 वर्षीय विवाहित प्रेयसीचा जंगलात नेऊन काटा काढला
Embed widget