एक्स्प्लोर
भावाला लाखो रुपयांची कर्जमाफी देणारा 'तो' माजी मंत्री कोण?
![भावाला लाखो रुपयांची कर्जमाफी देणारा 'तो' माजी मंत्री कोण? Who Is Is That Ex Minister Who Give Loan Waiver To His Brother Latest Updates भावाला लाखो रुपयांची कर्जमाफी देणारा 'तो' माजी मंत्री कोण?](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/06/12142705/CHANDRAKANT-DADA.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर या योजनेचा लाभ धनदांडग्यांना होऊ नये, यासाठी सरकारने कंबर कसली आहे. शेतकरी नेते, सरकारचे प्रतिनिधी आणि सर्वपक्षीय मिळून कर्जमाफीसाठी निकष काय असावेत, याचा निर्णय घेणार आहेत.
राज्यात यापूर्वी 2008 साली राज्यासह देशभरात ऐतिहासिक 72 हजार कोटींची कर्जमाफी झाली होती. तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातील काही शेतकऱ्यांचे 82-82 लाखांपर्यंतचं कर्ज माफ झालं. राज्यातील मंत्रिमंडळात एका टॉपच्या मंत्र्याने स्वतःच्या भावाला कर्जमाफी मिळवून दिली, असं वक्तव्य महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत केलं होतं.चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यानंतर तो मंत्री कोण, अशी एकच चर्चा राज्यभर सुरु झाली.
चंद्रकांत पाटील काय म्हणाले?
‘’कर्जमाफी ही खैरात होऊ नये, यासाठी शेतकरी संघटनेचे नेतेच स्वतःहून बैठकीत बोलले. ज्यांना आवश्यक आहे, अशापर्यंतच कर्जमाफी पोहोचावी. 2008 साली पश्चिम महाराष्ट्रात 82-82 लाख कर्जमाफ झाले, नाव घेऊन कुणाला एक्स्पोज करणं माझा स्वभाव नाही, पण त्यावेळी महाराष्ट्राच्या मिनिस्ट्रीमध्ये टॉप मिनिस्टर असणाऱ्याच्या सख्ख्या भावाला कर्जमाफी मिळाली. अशी कर्जमाफी होणार असेल, तर 100 रुपये आपल्याकडे आहेत आणि त्यामध्ये आपल्याला अनेकांना समाधानी करायचं असेल तर ज्याला गरज नाही, ते रांगेतून बाहेर पडले, तर गरज असणारा आपोआप पुढे येईल’’, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
VIDEO : चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले, ते खालील व्हिडिओमध्ये 7 मिनिटांपासून ऐकू शकता
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
क्राईम
भारत
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)