एक्स्प्लोर

Shrikant Shinde on Aaditya Thackeray : कल्याण लढू म्हणणारे आदित्य ठाकरे कुठे गेले? उमेदवारी जाहीर होताच श्रीकांत शिंदे यांचा पहिला वार

Shrikant Shinde on Aaditya Thackeray : कार्यकर्त्याला पुढे करून "तुम लढो हम कपडा सांभालते है" अशा प्रकारची भूमिका घेतल्याची टीका श्रीकांत शिंदे यांनी ठाकरेंवर केली.

Shrikant Shinde on Aaditya Thackeray : कल्याण लोकसभेला मोठमोठ्या वल्गना करून आदित्य ठाकरे वरुण सरदेसाई आणि उद्धव ठाकरे लढणार असे सांगितलं जात होतं. ते कुठे आहेत? या मतदारसंघात झालेला विकास पाहून त्यांची लढण्याची हिंमत झाली नाही, असा टोला खासदार श्रीकांत शिंदे यांनी (Shrikant Shinde on Aaditya Thackeray) लगावला. श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीची (Shrikant Shinde will contest from the Kalyan constituency) आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

तुम लढो हम कपडा सांभालते है

कार्यकर्त्याला पुढे करून "तुम लढो हम कपडा सांभालते है" अशा प्रकारची भूमिका घेतल्याची टीका श्रीकांत शिंदे यांनी ठाकरेंवर केली. अंबरनाथमध्ये हेरंबा मंदिर परिसरात प्रचाराचा नारळ श्रीकांत शिंदे यांच्याकडून फोडण्यात आला. 

श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीची अखेर घोषणा 

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha elections) महाराष्ट्रातील कल्याण मतदारसंघातून निवडणूक लढवतील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरातून केली. त्यामुळे कल्याणची जागा शिंदे गटाला गेल्याचे फडणवीस यांनी केलेल्या घोषणेवरून स्पष्ट झालं आहे. कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांच्या नावाला भाजपच्या स्थानिक नेत्यांनी विरोध केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ही घोषणा करण्यात आली आहे.

श्रीकांत शिंदे यांच्या नावाला कोणताही विरोध नाही

श्रीकांत शिंदे यांच्या नावाला कोणताही विरोध नसून भाजप शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपण उभा राहील आणि गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येईल, असे प्रतिपादन देवेंद्र फडणवीस यांनी केले. महायुती ही महाराष्ट्रातील सत्ताधारी युती आहे, ज्यात अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली भाजप, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा समावेश आहे.

कल्याणमधून श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर

विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांची कल्याण मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाच्या दोनवेळा नगरसेविका वैशाली दरेकर यांच्याशी लढत होणार आहे. 49 वर्षीय दरेकर हे दोन दशकांहून अधिक काळ शिवसेनेशी संबंधित आहेत. त्यांनी इतिहासात पदव्युत्तर पदवी घेतली आहे आणि आता एलएलबीच्या प्रवेश परीक्षेची तयारी करत आहेत. त्यांचे पती हे अभियंता असून ते एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करतात. 

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कुठल्याही परिस्थितीत मनसेसोबत जायचं नाही; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं, राष्ट्रवादीच्या आघाडीवरही बोलले
कुठल्याही परिस्थितीत मनसेसोबत जायचं नाही; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं, राष्ट्रवादीच्या आघाडीवरही बोलले
मोठी बातमी :  शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटीलवर 'त्या' प्रकरणात गैरसमजुतीने गुन्हे, पुणे पोलिसांचा अजब कारभार!
मोठी बातमी : शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटीलवर 'त्या' प्रकरणात गैरसमजुतीने गुन्हे, पुणे पोलिसांचा अजब कारभार!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2025 | सोमवार
Pankaja Munde: वैद्यनाथ कारखाना देताना मला प्रचंड वेदना झाल्या; गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा देत पंकजा मुंडे गहिवरल्या
वैद्यनाथ कारखाना देताना मला प्रचंड वेदना झाल्या; गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा देत पंकजा मुंडे गहिवरल्या
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Delhi Blast: 'प्रथम दर्शनी हा बॉम्बस्फोटच वाटतो', लेफ्टनंट कर्नल सतीश ढगेंचा मोठा दावा
Delhi Car Blast: 'गाडीचा वापर दहशतवाद्यांकडून...?', लाल किल्ल्याजवळच्या स्फोटामागे कटाचा संशय
Voter List Row: 'परप्रांतीय महापौर करण्यासाठी मतदार यादीत घोळ', MNS नेते देशपांडेंचा BJP वर थेट आरोप
Pune Land Scam: 'गैरसमजुतीने FIR मध्ये नोंद', बोपडी प्रकरणात Pune Police चा यू-टर्न
Congress Rift: 'त्यांना नोटीस दिली', Harshwardhan Sapkal यांचा इशारा; Vijay Wadettiwar यांचा मात्र वेगळा सूर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुठल्याही परिस्थितीत मनसेसोबत जायचं नाही; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं, राष्ट्रवादीच्या आघाडीवरही बोलले
कुठल्याही परिस्थितीत मनसेसोबत जायचं नाही; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं, राष्ट्रवादीच्या आघाडीवरही बोलले
मोठी बातमी :  शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटीलवर 'त्या' प्रकरणात गैरसमजुतीने गुन्हे, पुणे पोलिसांचा अजब कारभार!
मोठी बातमी : शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटीलवर 'त्या' प्रकरणात गैरसमजुतीने गुन्हे, पुणे पोलिसांचा अजब कारभार!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2025 | सोमवार
Pankaja Munde: वैद्यनाथ कारखाना देताना मला प्रचंड वेदना झाल्या; गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा देत पंकजा मुंडे गहिवरल्या
वैद्यनाथ कारखाना देताना मला प्रचंड वेदना झाल्या; गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा देत पंकजा मुंडे गहिवरल्या
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा वाढ, सोन्याचे दर वाढणार की घसरणार, सोनं खरेदी करावं की थांबावं?
सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा वाढ, सोन्याचे दर वाढणार की घसरणार, सोनं खरेदी करावं की थांबावं?
Ajinkya Naik : मुख्यमंत्री, शरद पवार आणि आशिष शेलारांना मी योग्य खेळाडू वाटलो; MCA अध्यक्षपदावर बिनविरोध निवड, अजिंक्य नाईक यांची प्रतिक्रिया
मुख्यमंत्री, शरद पवार आणि आशिष शेलारांना मी योग्य खेळाडू वाटलो; MCA अध्यक्षपदावर बिनविरोध निवड, अजिंक्य नाईक यांची प्रतिक्रिया
शरद पवारांची 'ती' गुगली अन् अजिंक्य नाईक बनले एमसीए निवडणुकीच्या मैदानात चॅम्पियन, इनसाईड स्टोरी
शरद पवारांची 'ती' गुगली अन् अजिंक्य नाईक बनले एमसीए निवडणुकीच्या मैदानात चॅम्पियन, इनसाईड स्टोरी
लोकसभेला बिनसलं, पण स्थानिकला जमलं! सतेज पाटील अन् राजू शेट्टींची गट्टी; कोल्हापूर जिल्ह्यात स्वाभिमानी अन् महाविकास आघाडी एकत्र लढणार
लोकसभेला बिनसलं, पण स्थानिकला जमलं! सतेज पाटील अन् राजू शेट्टींची गट्टी; कोल्हापूर जिल्ह्यात स्वाभिमानी अन् महाविकास आघाडी एकत्र लढणार
Embed widget