जेव्हा आमदार व जिल्हाधिकाऱ्यांना बैलगाडीने प्रवास करावा लागतो..
परभणीचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर व गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टेची नुकसान पाहणी.गावात जायला रस्ता नसल्याने जिल्हाधिकारी आणि आमदारांना बैलगाडीतून प्रवास करावा लागला.
परभणी : राज्यात पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी आणि पंचनामे प्रशासनाकडून सुरु आहेत. परभणी जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात पावसाने नासाडी केली आहे. याची पाहणी करण्यासाठी स्वतः जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर आणि गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे गेले. मात्र, ज्या ठिकाणी नुकसान झाले आहे, त्या ठिकाणी जायला रस्ता नव्हता. मग काय गावकऱ्यांनी बैलगाडी बोलली आणि जिल्हाधिकारी आणि आमदारांनी चक्क बैलगाडीत बसून प्रवास केला.
जिल्ह्यात मागच्या महिनाभरापासून सर्वत्र जोरदार पाऊस बरसतोय. वार्षिक सरासरीच्या जास्त पाऊस परभणी जिल्ह्यात झाला आहे. त्यातल्या त्यात पालम तालुक्यात मागच्या दोन दिवसांमध्ये अतिवृष्टीप्रमाणे पाऊस झाला आहे. ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे. याची पाहणी करण्यासाठी स्वतः जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर आणि गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे गेले. मात्र, ज्या ठिकाणी नुकसान झाले आहे, त्या ठिकाणी जायला रस्ता नव्हता. मग काय गावकऱ्यांनी बैलगाडी बोलली आणि जिल्हाधिकारी आणि आमदारांनी चक्क बैलगाडीत बसून प्रवास केला. त्यांचा हा प्रवास अत्यंत भन्नाट होता.
अतिवृष्टीनं पिकं 'पाण्यात'! कृषीमंत्री म्हणतात, 'शेतकऱ्यांना मदतीसाठी सरकारकडे पैसे नाहीत'
ग्रामीण भागात अजूनही बहुतांशी खेड्यांना जोडणारे रस्ते नाहीत. त्यामुळे चिखल तुडवीत गावकऱ्यांना गाव गाठावे लागते. पावसाळ्यात अत्यंत भयंकर परिस्थिती या रस्त्यांची होते. याच रस्त्यावरून आज जिल्हाधिकारी आणि आमदारांना प्रवास करावा लागला. त्यामुळे ते घामाघूम झाल्याचं पाहायला मिळालं. एकूणच काय तर रोज ग्रामीण भागातील नागरिकांना ज्या हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात. त्या हाल-अपेष्टा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांना किमान नुकसानीच्या पाहणीच्या निमित्ताने का होईना बघायला मिळाल्या. हेही नसे तितके कमी.
Farming Help | कोरोनामुळे सरकारी तिजोरीत पैसा नाही; बळीराजासाठी जे करावं लागेल ते करु : दादा भुसे