एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 16/09/2017
राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 16/09/2017
1. मुंबईतल्या आर.के स्टुडिओला लागलेली भीषण आग आटोक्यात, आगीत स्टुडिओचं मोठं नुकसान, दोन स्टुडिओ खाक, छप्परही कोसळलं https://goo.gl/ZpywKk
2. औरंगाबादमध्ये मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या चौघांना भरधाव कारनं चिरडलं, जालना रोडवरील केंब्रिज शाळेजवळील अपघातात चारही जणांचा जागीच मृत्यू, चालक फरार https://goo.gl/hGdFcg
3. तूर, मूग, उडीद डाळींवरील निर्यातबंदी उठवली, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय https://goo.gl/EkY5vz, सोमवारपर्यंत कांदा लिलाव सुरु करा, अन्यथा परवाने रद्द करु, आयकरच्या छाप्यानंतर लिलाव बंद पाडणाऱ्या व्यापाऱ्यांना नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश http://abpmajha.abplive.in/
4. सप्तश्रुंगी गडावर यंदापासून बोकडबळी प्रथेला बंदी, भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिर प्रशासनाचा ऐतिहासिक निर्णय https://goo.gl/WdxDwR
5. गुरुग्राममधील रायन स्कूलचा कारभार आता हरियाणा सरकारकडे, सोमवारपासून जिल्हा उपायुक्तांच्या देखरेखीखाली शाळा सुरु होणार, चिमुकल्या प्रद्युम्नच्या शवविच्छेदन अहवालातून गळ्यावर खोल वार झाल्याचं उघड https://goo.gl/cAS53a
6. कार-बाईक चालवणारे भुकेने मरत नाहीत, पेट्रोलसाठी जास्त पैसे द्यावेच लागतील', केंद्रीय पर्यटन मंत्री के जे अल्फोन्स यांचं वादग्रस्त विधान http://abpmajha.abplive.in/
7. निकालातील घोळानंतर मुंबई विद्यापीठावर आता पुनर्मूल्यांकनाचं ओझं, पुनर्मूल्यांकनासाठी तब्बल 50 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांचे अर्ज https://goo.gl/N5dg4z
8. 'फुटबॉल खेळायला आधी सराव लागतो', अजित पवारांकडून सरकारची खिल्ली, लोडशेडिंग, कर्जमाफीवरुनही फडणवीस सरकारचा समाचार https://goo.gl/Cjqpa8
9. येत्या ४८ तासात मुंबईत पुन्हा मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज https://goo.gl/93hAUj
10. 'बुलेट ट्रेनचा जंगी शो करण्याऐवजी मराठा समाजाच्या जंगी मोर्चांकडे लक्ष द्या', शिवसेनेचा सामनातून सरकारवर घणाघात https://goo.gl/QRXH57
11. देवाची गाणी लिहिणाऱ्याला अखेर देव पावला, 'माझा'च्या बातमीनंतर गीतकार उत्तम कांबळेंना नंदेश उमपकडून आर्थिक मदत https://goo.gl/hbuzUP
12. साध्वीवरील बलात्कार प्रकरणानंतर बाबा राम रहीमवर दोन हत्यांचा आरोप, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात सुनावणी https://goo.gl/vH7zCC
13. 20 वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर नासाचं 'कॅसिनी' यान शनी ग्रहाजवळ नष्ट, 4.9 अब्ज मैलाचा प्रवास करुन अंतराळातील सर्वात मोठी मोहीम फत्ते https://goo.gl/ifXaF1
14. ब्रिटन संसदेकडून अभिनेता सलमान खानच्या कारकिर्दीचा गौरव, लंडनमध्ये दिमाखदार सोहळ्यात सलमानला ग्लोबल डायवर्सिटी पुरस्कार प्रदान https://goo.gl/XLSxUU
15. भारताची बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू कोरिया सुपर सीरिज बॅडमिंटनच्या अंतिम फेरीत, चीनच्या बिंगजिआओवर तीन गेम्समध्ये मात, जपानच्या नोझोमी ओकुहाराशी होणार अंतिम लढत https://goo.gl/XQ3yLU
माझा कट्टा : डिजिटल शिक्षणाचा भगीरथ हर्षल विभांडिक यांच्याशी दिलखुलास गप्पा, आज रात्री 9 वाजता माझा कट्ट्यावर
बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive
@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement