एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 15/09/2017
राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 15/09/2017
- म्हाडाच्या मुंबईतील 819 घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध, कोणत्या गटासाठी किती घरं? सर्व माहिती एकाच ठिकाणी https://goo.gl/SXnNjQ तर लोअर परेलमधील घराची किंमत तब्बल 2 कोटी रुपये https://goo.gl/WMaikV
- नाशिकमध्ये सात कांदे व्यापाऱ्यांवर 120 आयकर अधिकाऱ्यांची धाड, कांद्याचे दर 35 टक्क्यांनी घसरले, कारवाई विरोधात दोन दिवस लिलाव बंद https://goo.gl/vZ1KsU
- विदर्भ वगळता महाराष्ट्र तुडुंब असताना दुष्काळ कराची वसुली का?, संतप्त शेतकऱ्यांचा सवाल, भाजप खासदार नाना पटोले लोकसभेत आवाज उठवणार http://abpmajha.abplive.in/
- पोलिस आयुक्तांना न सांगताच मुंबईत लक्झरी बस आणि अवजड वाहनांना बंदी; वाहतूक विभागाचे सहआयुक्त अमितेश कुमार यांच्या फतव्याने नवा वाद, बसचालकांचा संपाचा इशारा https://goo.gl/rCNJB8
- कर्जमाफीचे ऑनलाईन फॉर्म भरण्याची मुदत 22 सप्टेंबरपर्यंत वाढवली, सहकारमंत्री सुभाष देशमुखांची माहिती, राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा https://goo.gl/XUJVe1
- मराठवाड्यातील धरणं हाऊसफुल्ल, सलग दुसऱ्या वर्षी पावसाने दुष्काळ धुतला, तर उजनी धरणाच्या विसर्गामुळे चंद्रभागा दुथडी भरुन https://goo.gl/r1gZA8
- मुसळधार पावसामुळे फलटण-बारामती रस्त्यावरचा 60 फूट लांबीचा सोमंथळी पूल वाहून गेला, सुदैवाने जीवितहानी नाही https://goo.gl/d33adH
- दिवाळीसाठी नवी मुंबई महापालिकेकडून सानुगह अनुदान प्रस्ताव मंजूर, कंत्राटी कामगारांना 12 हजार, तर कायमस्वरुपी कामगारांना 19 हजार रुपयांचा बोनस http://abpmajha.abplive.in/
- मुंबई मेट्रो-3 प्रकल्पासाठी फोर्ट भागात भुयाराच्या खोदकामाला तात्पुरती स्थगिती, जे एन पेटीट संस्थेच्या याचिकेवर हायकोर्टाचा निर्णय https://goo.gl/wi94Aa
- पॅनपाठोपाठ आता ड्रायव्हिंग लायसन्ससोबतही आधार कार्ड लिंक करणं अनिवार्य, केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांची माहिती http://abpmajha.abplive.in/
- महाराष्ट्र फुटबॉलमय, 10 लाख मुलं मैदानात, खेड्या-पाड्यात, गल्लो-गल्ली फुटबॉल फिव्हर, फुटबॉलर रोनाल्डिनो आणि डेको सिद्धीविनायकचरणी https://goo.gl/kV7XxJ
- पुण्यात तडीपार गुंड पप्पू सातपुतेची धारदार शस्त्राने हत्या, मुळशी तालुक्यातील कोळवणमध्ये पोलिस चौकीसमोरची घटना https://goo.gl/gv3qRz
- बॉम्बस्फोटाने लंडन पुन्हा हादरलं, अंडरग्राऊंड पार्सन्स ग्रीन मेट्रो स्टेशनवर स्फोट, 22 जण जखमी, स्फोटात आयईडीचा वापर https://goo.gl/649UZP
- उत्तर कोरियाच्या कुरघोड्या सुरुच, जपानवरुन मिसाईलची पुन्हा चाचणी, संयुक्त राष्ट्राने झापल्यानंतरही किम जोंग उनची मुजोरी कायम https://goo.gl/QBGfs5
- टीम इंडियाचा गोलंदाज प्रग्यान ओझा बेपत्ता, ओझाच्या नावाशिवायच बंगाल संघाची घोषणा, ओझा आणि सीएबीमधील शीतयुद्ध सुरुच https://goo.gl/mxsJD8
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement