एक्स्प्लोर

Wet Drought Maharashtra : ओला दुष्काळ म्हणजे काय, जाहीर करण्याचे निकष कोणते, फायदे काय?

Wet Drought Maharashtra : मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. या भागात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे.

Wet Drought Maharashtra : राज्यात गेल्या काही दिवसांपासून ढगफुटीसदृश्य पाऊस झालाय. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत . घरादारांचे मोठे नुकसान झाले असून अनेक जनावरे दगावली आहेत .विशेषतः  मराठवाडा (Marathwada) विदर्भ (Vidarbha) आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे . या पार्श्वभूमीवर आज (23 सप्टेंबर ) मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet Meeting)ओला दुष्काळ (Wet Drought) जाहीर करण्यासाठी जोरदार मागणी करण्यात येणार आहे. पण ओला दुष्काळ म्हणजे नेमकं काय ? ओला दुष्काळ जाहीर करण्याचे निकष कोणते ? जाणून घेऊया सविस्तर .

अतिवृष्टी म्हणजे काय?  (Heavy Rain)

जेव्हा एखाद्या ठिकाणी सामान्य वेळेपेक्षा कमी कालावधीत खूप जास्त पाऊस पडतो त्याला अतीवृष्टी झाली असे म्हणतात. हवामान तज्ञांच्या मते जेव्हा थोड्या काळासाठी पाऊस पडतो पण प्रचंड जोरात पडतो. जेव्हा हवा तापते तेव्हा ती अधिक आद्रता धरून ठेवते. पण ही आद्रता अधिक काळ धरून ठेवू शकत नसल्यामुळे हा पाऊस अधिक काळ पडत नाही.  एका दिवशी 65 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडलास त्याला अतिवृष्टी म्हटलं जातं. जर या अतिवृष्टीमुळे 33 टक्क्यांहून अधिक पिकांचे नुकसान होत असेल तर तो ओला दुष्काळ ठरतो असे सांगितले जाते.

ओला दुष्काळ म्हणजे काय ? (Wet drought meaning)

खरंतर ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात सरकारी दफ्तरात कोणत्याही प्रकारची नियमावली नाही. मात्र यात प्रामुख्याने दोन शब्द वापरले गेले आहेत.पहिला अवकर्षण काळ. ज्यात सरासरीपेक्षा  10% कमी पाऊस झाला तर अवकर्षण काळ असं म्हटलं जातं. तर दहा टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला तर त्याला अतिवृष्टी म्हटलं जातं. 

- ओला दुष्काळ म्हणजे अतिवृष्टी किंवा सलग मुसळधार पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होणे .

- यात पिके पाण्याखाली जातात .पिकांची मुळे कुजतात .जमिनीची पोषणतत्व धुवून निघतात .

- साठवण व घरे उद्ध्वस्त होतात .

-हा दुष्काळ पावसाअभावी नसून पावसाच्या अतिरेकामुळे उद्भवतो .

ओला दुष्काळ जाहीर करण्याचे निकष कोणते ? (Drought Declaration Norms)

राज्य सरकारने ठरवलेले काही प्रमुख निकष असे आहेत -

- पिकांचे नुकसान :  33% किंवा त्यापेक्षा अधिक शेतीचे नुकसान झाले आहे का ?

-पावसाचे प्रमाण : त्या तालुक्यात /गावात 24 तासात किंवा अल्पावधीत खूप जास्त पाऊस झाला आहे का ? (एका दिवशी 65 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस )

-स्थितीची पाहणी : महसूल विभाग कृषी विभाग व स्थानिक प्रशासन पंचनामे करून याबाबत अहवाल सादर करतात

-शेतकऱ्यांची प्रत्यक्ष हानी : शेती शिवाय घर जनावरे रस्ते पाणीपुरवठा यावर झालेला परिणामही तपासला जातो .

- या अहवालांच्या आधारे जिल्हाधिकारी , विभागीय आयुक्त, राज्य सरकार ओला दुष्काळ घोषित करते .

ओला दुष्काळ जाहीर झाल्यानंतर फायदे / मदत (Benefits/Assistance after a wet drought is declared)

ओला दुष्काळ जाहीर झाल्यावर शेतकऱ्यांना खालील शासकीय मदत दिली जाते :

- पीक विमा / नैसर्गिक आपत्ती मदत -33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते .

-कर्जमाफी / कर्ज मोर्टोरिअम - पीक कर्ज फेडण्यास मुदतवाढ किंवा कर्जमाफी

-महसूल वसुली स्थगिती - सरकारी महसूल वसुली (वीज, पाणीपट्टी, कर) काही काळांसाठी थांबवली जाते .

-नुकसान भरपाई - घर जनावर विहिरी शेततळे पीक साठा यांचे नुकसान भरून काढण्यासाठी थेट अनुदान मिळते .

-महात्मा गांधी रोजगार हमी योजना (EGS) -ग्रामीण भागात रोजगाराची हमी वाढविली जाते .

-इतर सुविधा - चारा छावण्या, तात्पुरता निवारा, अन्नधान्यांची मदत, आरोग्य शिबिरे अशी मदतही पुरवली जाते .

हेही वाचा 

Wet Drought Maharashtra : मोठी बातमी : ओला दुष्काळ जाहीर करा, कॅबिनेटमध्ये शिवसेनेचे सर्व मंत्री एकमुखाने मागणी करणार!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election : भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour Full नगराध्यक्षांच्या निकालाचा मनपा मतदानावर परिणाम होईल? मुंबईत महायुतीला कोणाचं आव्हान!
Special Report Manikrao Kokate माणिकराव कोकाटे संकटाच्या चक्रव्यूहात, कोकाटेंचं राजकीय भवितव्य काय?
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election : भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
Success Story : तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
Epstein files India: अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
Gold Rate : भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
Nagpur Butibori MIDC : टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
Embed widget