15 October In History : मिसाईल मॅन अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस, टाटा समूहाची पहिली एअरलाइन, 15 ऑक्टोबर महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार
On this day in history 15 October : 15 ऑक्टोबर हा दिवस देशाच्या आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार आहे. जाणून घेऊया इतिहासात आजच्या दिवशी काय काय घडलं होतं...
On this day in history 15 October : इतिहासात 15 ऑक्टोबर हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस म्हणून नोंद आहे. अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी झाला होता. एका नावाड्याचा मुलगा, वैज्ञानिक आणि देशाचा राष्ट्रपती, कलामांची ही वाटचाल थक्क करणारी आहे. डॉ. कलाम यांनी अॅरोनॉटिकल इंजिनीअर म्हणून कारकीर्दीची सुरुवात केली असली तरी शाळेच्या दिवसात त्यांनी घराघरात पेपर टाकण्याचं काम केलं होतं. पेपर टाकण्यापासून देशाला शक्तीशाली देश बनवणं आणि त्यानंतर भारताचे राष्ट्रपती बनणं हे मोठं यश आहे. अब्दुल कलाम तरुणांना देशाची खरी ताकत मानत होते. अब्दुल कलाम यांचा प्रवास तरुणांना नेहमीच प्रेरणा देणारा राहिलाय. अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस जगभरात जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून पाळला जातो. भारत सरकारने अब्दुल कलाम यांना 'पद्मभूषण', 'पद्मविभूषण' व 1997 मध्ये 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब देऊन सन्मान केलाय. 15 ऑक्टोबर रोजी 100 वर्षांपूर्वी शिर्डीमध्ये साईबाबांनी समाधी घेतली होती. तसेच आजच्याच दिवशी प्रख्यात महाराष्ट्रीयन मराठी साहित्यकार, नाटककार, लेखक व पटकथाकार वसंत सबनीस यांचे निधन झाले होते.
15 ऑक्टोबर हा दिवस देशाच्या आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार आहे. जाणून घेऊया इतिहासात आजच्या दिवशी काय काय घडलं होतं...
1240 : दिल्लीवर राज्य करणाऱ्या रजिया सुल्तान यांचं निधन
1542 : तिसरा मुगल सम्राट अकबर यांचा जन्म
1878 : बल्बचा शोध लावणाऱ्या थॉमस एडिसन यांनी इलेक्ट्रिक लाइट कंपनीची स्थापना केली.
1917 : पहिल्या विश्वयुद्धात जर्मनीसाठी हेरगिरी करणाऱ्या नेदरलँडच्या प्रसिद्ध नृत्यांगना माता हारी यांना फ्रान्सच्या सैनिकांनी गोळी मारली.
1918 : शिर्डीमध्ये साईबाबा यांनी समाधी घेतली.
1924 : अमेरिकेचे राष्ट्रपती काल्विन कूलीड्ज यांनी स्टेच्यू ऑफ लिबर्टीला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलं.
1926 : भाकरीचा चंद्र दाखवणारे महाराष्ट्रीयन कवी नारायण गंगाराम सुर्वे यांचा जन्म
1931 : माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्म
1932 : टाटा समूहाने पहिली एअरलाइन सुरु केली. याचं नाव ‘टाटा सन्स लिमिटेड’ असं ठेवण्यात आलं होतं.
1949 : त्रिपुरा राज्याचा भारतात समावेश करण्यात आला.
1951 : अमेरिकन "टेलव्हिजन" प्रोग्रॅम‘आई लव्ह लूसी’ याचं प्रसारण सुरु झालं होतं. यामध्ये लूसील बॉल आणि डेसी एरनाज यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या. ही मालिका जगभरात गाजली होती.
1961 : लेखक सूर्यकांत त्रिपाठी निराला यांचं निधन
1969 : सोमालियाचे राष्ट्रपती कॅब्दीराशिद केली शेरमार्के यांची हत्या
1978 : सोव्हिएत युनियनने पूर्व कझाकिस्तानमध्ये आण्विक चाचण्या केली.
1987 : बुर्किना फासोमध्ये सैनिक विद्रोहात प्रमुख थॉमस संकारा यांची आणि समर्थकांची हत्या.
1988 : उज्ज्वला पाटील ह्या संपूर्ण जगाची समुद्र यात्रा करणाऱ्या पहिल्या महिला बनल्या होत्या.
1988 : गोपळ गणेश आगरकर यांनी सुधारक पत्राची सुरुवात केली.
1990 : बॉलीवूड अभिनेते ओम शिवपुरी यांचं निधन
1990 : सोव्हिएत युनियनचे राष्ट्रपती मिखायल गोर्बाचोव यांना नोबेल शांतता पुरस्कार देण्यात आला.
1993 : दक्षिण अफ्रिकेचे नेल्सन मंडेला आणि एफ डब्ल्यू क्लार्क यांना शांतता नोबेल पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
1997 : ‘द गॉड आफ स्माल थिंग्स’या कादंबरीसाठी लेखिका अरुंधती रॉय यांची ब्रिटनचा प्रतिष्ठित बुकर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
1998 : भारताच्या फातिमा यांना गरिबी निर्मूलनासाठी संयुक्त राष्ट्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
2003 : अंतराळात मानविरहित यान पाठवणारा चीन तिसरा देश झाला.
2006 : संयुक्त राष्ट्र संघाने उत्तर कोरियावर निर्बंध लावले.
2018 : माजी केंद्रीय राज्यमंत्री एमजे अकबर यांच्याविरोधात अनेक महिलांनी #MeToo चा आरोप केल्यानंतर 15 ऑक्टोबर रोजी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल
2020 : भारताच्या पहिला ऑस्कर पुरस्कार जिंकणाऱ्या कॉस्ट्युम डिजायनर भानू अथैया यांचं निधन