एक्स्प्लोर
Advertisement
पालघरमध्ये मच्छिमारांच्या जाळ्यातून देवमाशाची सुखरुप सुटका
पालघरमध्ये समुद्रात डोल जाळे खेचत असताना मच्छिमारांना सुमारे 25 ते 30 फूटांचा व्हेल मासा जाळ्यात अडकलेला आढळला.
पालघर : पालघरमध्ये मच्छिमारांच्या जाळ्यात सापडलेल्या देवमाशाची सुखरुप सुटका करण्यात आली. समुद्रात पहाटे मासेमारी करताना 25 ते 30 फूटांचा व्हेल जाळ्यात अडकला होता.
बोटमालक हितेंद्र अरविंद मेहेर हे वडराई गावातून आपल्या सहकाऱ्यांसोबत 'अमर साई' नावाची बोट घेऊन समुद्रात मासेमारीसाठी गेले होते. मंगळवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास समुद्रात 12 नॉटिकल मैल क्षेत्रात ते मासेमारी करत होते. त्यावेळी त्यांनी आपल्या बोटीतील डोल जाळी खुंटांना रोवली.
काही वेळानंतर हे 'डोल जाळे खेचत असताना त्यांना सुमारे 25 ते 30 फूटांचा व्हेल मासा जाळ्यात अडकलेला आढळला. देवमासा सुटकेसाठी धडपड करत असल्याचं त्यांना जाणवलं. त्यानंतर बोटीतील सर्व मच्छिमारांनी एकत्र येत त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु केले.
बोटीत असलेल्या घोश्याच्या (काठीला बांधलेले टोकदार आयुध) सहाय्याने त्याच्या शरीराभोवती लपेटले गेलेले जाळे सोडवण्यात आले. विशेष म्हणजे देवमाशाला कुठलीही इजा न करता त्याची सुखरुपपणे सुटका करण्यात आली. काही काळानंतर तो पाण्यात दिसेनासा झाला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
बातम्या
क्रिकेट
भविष्य
Advertisement