एक्स्प्लोर

Weekly Recap : पंतप्रधानांचा मुंबई दौरा, नेपाळ विमान दुर्घटना; कसा होता आठवडा? वाचा एका क्लिकवर सविस्तर...

Weekly Recap : चालू आठवड्यात म्हणजे, 16 जानेवारी ते 22 जानेवारी यादरम्यान अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहे. पाहुयात या आठवड्यात घडलेल्या घटनांचा आढावा...

Weekly Recap : 2023 या नवीन वर्षातील पहिलाच सण मकर संक्रांत या आठवड्याच्या सुरुवातीलाच होता. याचा देशभरात उत्साह पाहायला मिळाला पण, त्याच दिवशी दुर्दैवी अपघातही घडला, या आठवड्याच्या सुरुवातीला नेपाळ विमान दुर्घटना घडली. यामध्ये अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी या आठवड्यात मुंबई दौऱ्यावर आले होते. या आठवड्यात अनेक महत्त्वाच्या गोष्टी घडल्या. काही आनंद देणाऱ्या तर काही थरकाप उडवणाऱ्या, आठवडाभरातील अशाच काही चांगल्या, वाईट आणि महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आम्ही तुमच्यासाठी सविस्तर वाचा. 

यांसारख्या अनेक छोट्या-मोठ्या घडामोडींनी सरता आठवडा गाजला. जाणून घेऊया, नववर्षातील पहिला आठवडा नेमका होता कसा? यासंदर्भात सविस्तर...

15 जानेवारी 2023 | रविवार

वर्षातील पहिला सण मकर संक्रांत 

नवीन वर्षातील हा पहिलाच मकर संक्रांत 15 जानेवारी 2023 रोजी होता. यामुळे सगळीकडे उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. मकर संक्रांतीचा देशभरात उत्साह पाहायला मिळत आहे. मकर संक्रांत, लोहरी आणि पोंगल अशा वेगवेगळ्या नावांनी हा सण ओळखला जातो.

Nepal Plane Crash : नेपाळमध्ये विमान अपघातात 72 जणांचा मृत्यू, पाच भारतीयांचाही समावेश 

नेपाळ विमान दुर्घटनेमध्ये (Nepal Plane Crash) पाच भारतीयांसह 72 जणांचा मृत्यू झाला आहे. यती एअरलाइन्सच्या विमानाचा अपघात झाला. पोखरा विमानतळाच्या दिशेने जात असताना अचानक विमानाचे नियंत्रण बिघडलं आणि विमान कोसळलं. यती एअरलाइन्सच्या एटीआर-72 विमानाचा अपघात झाला. यामध्ये 68 प्रवासी, चार क्रू मेंबर्स यांचा मृत्यू झाला असून यात पाच भारतीयांचा समावेश आहे.

Dr. Sudhir Tambe : डॉ. सुधीर तांबेंचं काँग्रेस पक्षातून निलंबन

काँग्रेस पक्षाकडून नाशिक पदवीधर मतदारसंघातील डॉ. सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पक्षाच्या विरुद्ध भूमिका घेतल्याने काँग्रेस पक्षाने ही कारवाई केली असल्याचं पत्र जारी करण्यात आलं आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत सुधीर तांबे यांचं पक्षातून निलंबित असणार आहेत. 

Tata Mumbai Marathon 2023 : दोन वर्षांच्या ब्रेकनंतर मुंबईत टाटा मॅरेथॉनचं आयोजन

15 जानेवारी रोजी मुंबईत टाटा मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होते. दोन वर्षानंतर या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. या मॅरेथॉन स्पर्धेत नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतल्याचे पाहायला मिळत आहे. या मॅरेथॉनला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. टाटा मॅरेथॉनमध्ये सुमारे 55,000 स्पर्धक सहभागी झाले होते.

16 जानेवारी 2023 | सोमवार

Maharashtra Kesari 2023 : पैलवान सिकंदर शेखवर अन्याय? सोशल मीडियावर समर्थक-विरोधक आक्रमक

पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत माती गटातील अंतिम लढतीत पैलवान सिकंदर शेख (Sikandar shaikh) याचा शिवराज राक्षे याने पराभव केला आणि महाराष्ट्र केसरीची गदा जिंकली. दरम्यान, माझ्यावर अन्याय झाला आणि हाअन्याय संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलाय, असं सिकंदर शेख याने म्हटलं. या संपूर्ण प्रकरणावर सिंकदर शेख याने एबीपी माझासोबत संवाद साधत प्रतिक्रिया दिली.

Nepal Plane Crash Update : नेपाळ दुर्घटनेतील 68 मृतदेह हाती, चार जणांचा शोध सुरु

नेपाळमध्ये विमान कोसळून भीषण अपघात झाला. 72 प्रवासी असलेले यती एअरलाइन्सचे ATR-72 विमान कोसळलं. या अपघातात विमानातील सर्व लोकांचा मृत्यू झाला आहे. या विमानात 68 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते. अपघातानंतर अजूनही शोधकार्य सुरु असून 68 जणांचे मृतदेह हाती आले आहेत. अद्याप चार मृतदेहांचा शोध सुरु आहे. मृतांमध्ये पाच भारतीयांचाही समावेश आहे.

Berhampur Bank Liquidation Case: 72 वर्ष जुना खटला निकाली

Berhampur Bank Liquidation Case : 72 वर्षांतील भारतातील सर्वात जुना खटला कोलकाता उच्च न्यायालयाच्या (Culcutta High Court) सर्वात जुन्या खंडपीठानं अखेर निकाली काढला. गेल्या आठवड्यात या प्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयानं आपला निकाल सुनावला. महत्त्वाची बाब म्हणजे, विद्यमान सरन्यायाधीश प्रकाश श्रीवास्तव (Prakash Srivastava) यांच्या जन्माच्या दशकभरापूर्वी बेरहामपूर बँकेशी (Berhampur Bank) संबंधित हा खटला दाखल झाला होता. दरम्यान, बेरहामपूर बँक (Berhampur Bank News) लिमिटेडच्या लिक्विडेशन प्रक्रियेशी संबंधित खटला अखेर निकाली निघाला आहे. 

17 जानेवारी 2023 | मंगळवार

राज्य सरकारच्या जीआरमध्ये हिंदीचा राष्ट्रभाषा असा उल्लेख

महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीची फेररचना करण्यासाठी राज्य सरकारने काल, सोमवारी (16 जानेवारी 2023) जारी केलेल्या शासन निर्णयामुळे (GR) नव्या वादाला तोंड फुटलंय. पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्या या शासन निर्णयामध्ये प्रस्तावनेतच हिंदी ही राष्ट्रभाषा असल्यामुळे अशी सुरुवात आहे. ही सुरुवातच वादाचं कारण आहे. कारण हिंदी ही कधीही राष्ट्रभाषा नव्हती आणि नाही. भारत सरकारने कोणत्याच एका भाषेला कधीच राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला नाही. भारतात सर्वाधिक औपचारिक वापरामुळे हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याचा समज असला तरी तो फक्त समज आहे, याबाबत कोणताही अधिकृत दस्तावेज उपलब्ध नाही.

Pakistan : पाकिस्तान नरमलं! शांततेसाठी भारतासोबत चर्चेस तयार, पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं वक्तव्य

Pakistan PM Shahbaz Sharif : पाकिस्तान सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तानने नरमाईची भूमिका घेतल्याचे दिसत आहे. भारताशी आम्ही शांततेनं राहू इच्छितो, एकत्र बसून मार्ग काढूया असे आवहान पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाझ शरीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले आहे. परंतु, पाकिस्तानच्या आव्हानाला भारताने फारसा प्रतिसाद दिला नाही. एका टीव्ही मुलाखतीत बोलताना शेहबाज शरीफ यांनी शांतता प्रस्ताव मांडलाय.

Dawood Second Marriage : दाऊद कराचीतच, दुसरे लग्नही केले; हसीना पारकरच्या मुलाचा गौप्यस्फोट

Dawood Second Marriage : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन आणि ग्लोबल टेररिस्ट दाऊद इब्राहिमने (Dawood Ibrahim) पाकिस्तानात दुसरे लग्न केले आहे. त्याची दुसरी पत्नी पाकिस्तानातील पठाण कुटुंबातील आहे. दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकरच्या मुलाने सप्टेंबर 2022 ला दिलेल्या जबाबामध्ये मोठा गौप्यस्फोट केला आहे. 

18 जानेवारी 2023 | बुधवार

Brij Bhushan Sharan Singh : बृजभूषण सिंहांवर लैंगिक शोषणाचे आरोप

Wrestler Protest : महिला कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष आणि भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह अनेक वर्षांपासून महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण करत आहेत, असा आरोप केलाय. या आरोपानंतर खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात दिल्लीत पैलवानांनी आदोलन केलं आहे. दरम्यान, या आरोपाचं गांभीर्य लक्षात घेऊन क्रीडा मंत्रालयाने कुस्तीगीर संघटनेला नोटीस पाठवून या आरोपांवर 72 तासांत उत्तर देण्यास सांगितले आहेत. आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंनी सिंह यांना अध्यक्षपदावरून हटवण्याच्या मागणीसह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली.  

भाजप खासदार तेजस्वी सूर्यांनी उघडलं विमानाचं इमर्जन्सी गेट

BJP MP Tejasvi Surya : चेन्नईवरुन तिरुचिरापल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानाचा आपात्कालीन दरवाजा (Emergency Exit) उघडल्याप्रकरणी भाजप खासदार तेजस्वी सूर्या (BJP MP Tejasvi Surya) यांनी माफी मागितल्याचं केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांनी स्पष्ट केलं आहे. तेजस्वी सूर्या यांनी विमानाचा आपात्कालीन दरवाजा उघडला होता, पण चूक लक्षात येताच त्यांनी माफी मागितली असं ज्योतिरादित्य शिंदे यांनी म्हटलंय. गेल्या महिन्यात, 10 डिसेंबर 2022 रोजी चेन्नईवरुन तिरुचिरापल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमान 6E-7339च्या प्रवासावेळी ही घटना घडली होती.  

China Population : साठ वर्षांत पहिल्यांदाच घटली चीनची लोकसंख्या

जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश चीनला (China) आपली लोकसंख्या वाढवायची आहे. कारण चीन सध्या म्हाताऱ्यांचा देश बनू लागला आहे. गेल्या साठ वर्षात पहिल्यांदाच चीनचा जन्मदर नीचांकी पातळीवर आला आहे. साठ वर्षांत पहिल्यांदाच चीनची लोकसंख्या घटली आहे. चीनमध्ये 2022 साली 95 लाख मुलांचा जन्म झाला आहे. तर 2011 साली 1 कोटी 62 लाख मुलांचा जन्म झाला होता. चीनच्या राष्ट्रीय सांख्यिकी विभागाने लोकसंख्येबाबत धक्कादायक माहिती प्रसिद्ध केली आहे. या रिपोर्टनुसार चीनचा जन्मदर कमालीचा घसरला आहे. 

19 जानेवारी 2023 | गुरुवार

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7सह विविध विकासकामांचं उद्घाटन

मेट्रो 7 (Metro 7) आणि मेट्रो 2 A (Metro 2 A) मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली आहे. 19 जानेवारी रोजी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्या हस्ते मुंबई मेट्रोच्या एका टप्प्याचं उद्घाटन पार पाडलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर आले होते. बीकेसी येथे मोठ्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. 

Satyajeet Tambe Suspended : काँग्रेसकडून सत्यजीत तांबे यांचं अखेर निलंबन

नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी (Nashik Graduate Constituency) बंडखोरी करणारे सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांचं अखेर काँग्रेसमधून निलंबन करण्यात आलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्याबाबतची माहिती दिली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज एकत्र पत्रकार परिषद घेत, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत आपली भूमिका जाहीर केली. 

राखी सावंत मुंबई पोलिसांच्या ताब्यात

Rakhi Sawant : मुंबई पोलिसांनी अभिनेत्री राखी सावंतला ताब्यात घेतलं आहे. काही वेळाने पोलीस राखी सावंतला अंधेरी न्यायालयात हजर करणार आहेत.  आंबोली पोलिसांनी राखीला ताब्यात घेतलं आहे. राखी सावंतवर एका महिला मॉडेलचा आक्षेपार्ह व्हिडीओ आणि फोटो व्हायरल केल्याचा आरोप आहे. यानंतर मॉडेलच्या तक्रारीवरुन राखीवर आंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तिच्या तक्रारीवरुन नोव्हेंबर 2022 मध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत राखीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांकडून वारंवार प्रयत्न करुनही ती हजर राहत नव्हती. त्यामुळे आज पोलीस पथकाने तिला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले असून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

Anant Ambani Radhika Merchant Engagement : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा साखरपुडा

रिलायन्स उद्योग समूहाचे (Reliance) सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा लेक अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांचा साखरपुडा पार पडला. मुंबईतील अँटिलिया बंगल्यामध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांनी एकमेकांना अंगठ्या परिधान केल्या.  साखरपुड्यासाठी अँटिलिया रोषणाईनं उजळलं होतं.

IND vs NZ 1st ODI 2023 : टीम इंडियाचा न्यूझीलंडवर 12 धावांनी विजय

भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिल्या एकदिवसीय सामन्यात मैदानात शुभमन गिल नावाचं वादळ पाहायला मिळालं. न्यूझीलंडच्या एकदिवसीय सामन्यात शुबमन गिलनं धडाकेबाज द्विशतक झळकावलं. द्विशतक साकारताना गिलनं 149 चेंडूचा सामना करताना खेळीला 19 चौकार आणि 9 षटकारांनी साज चढवला. शुभमनच्या खेळीमुळे भारताला 349 धावांचा डोंगर उभा केला. या सामन्यात शुभमननं द्वीशतक झळकावताना अनेक विक्रम नावावर केले. एक एकदिवसीय सामन्यात 19 डावात त्याने एक हजार धावा पूर्ण करत विराट आणि शिखर या दिग्गजांना मागे टाकलं. यासोबतच द्विशतक झळकवणारा शुबमन गिल ठरला पाचवा भारतीय खेळाडू ठरला.

20 जानेवारी 2023 | शुक्रवार

MPSC Recruitment 2023 : एमपीएससीकडून 8,169 पदांसाठी मेगा भरती

MPSC Recruitment 2023 : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं (MPSC News) तब्बल आठ हजार 169 पदांसाठी जाहिरात काढली आहे. आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र अराजपात्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधून पदे भरली जाणार आहेत. 

Sadichcha Sane Murder : पालघरच्या सदिच्छा सानेची हत्या केल्याची मिट्टू सिंहची कबुली

Palghar News : पालघरच्या (Palghar) सदिच्छा साने (Sadichcha Sane) बेपत्ताप्रकरणी अखेर दोन वर्षांनी मिट्टू सिंह (Mittu Singh) या जीवरक्षकाला अटक केली आहे. पालघरच्या (Palghar) एमबीबीएसला शिकणाऱ्या 22 वर्षीय सदिच्छा साने (Sadichcha Sane) बेपत्ताप्रकरणी आता मोठा खुलासा झाला आहे. आरोपी मिट्टू सिंहने सदिच्छा सानेची हत्या करुन तिचा मृतदेह समुद्रात फेकल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणात तपास करत असलेल्या गुन्हा शाखेच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या जबाबात त्याने ही कबुली दिली आहे. 

Air India Urination Incidence : प्रवासी महिलेवर लघुशंका प्रकरणी एअर इंडियाला DGCA कडून 30 लाख रुपयांचा दंड

एअर इंडियाच्या (Air India)  विमानात प्रवासी महिलेच्या अंगावर लघुशंका केल्याचं प्रकरणी वाहतूक महासंचालनालयाकडून (DGCA)  एअर इंडियाला 30 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. एवढेच नाही तर विमानाच्या पायलटचे लायसन्स देखील तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे. डीजीसीएने (DGCA)  नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड  ठोठावण्यात आला आहे. विमानाच्या पायलटने आपली जबाबदारी व्यवस्थित पार न पाडल्याने पायलटला तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे. तसेच विमानाच्या डायरेक्टरला तीन लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 

Sikandar Shaikh : पैलवान सिकंदर शेखनं मारलं 'विसापूर केसरी'चं मैदान

पैलवान सिकंदर शेखने (Sikandar Shaikh) सांगली (Sangli) जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील 'विसापूर केसरी'चे (Visapur Kesari) मैदान मारलं आहे. सिकंदर शेखने मोळी डावावर पंजाबचा (Punjab) पैलवान नवजीत सिंगला (Navjeet Singh) लोळवले. अवघ्या पाचच मिनिटात सिकंदरने कुस्ती करत कुस्ती शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे पारणे फेडले. या विसापूर केसरीसाठी महाराष्ट्रासह (Maharashtra) संपूर्ण देशभरातून मल्ल आले होते. त्यामुळं या स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झालं होतं. यावेळी मोठ्या संख्येनं कुस्तीप्रेमी होते.

21 जानेवारी 2023 | शनिवार

Bawankule on Pankaja Munde : भाजपच्याच नेत्यांकडून पंकजा मुंडेंना बदनाम करण्याचा कट; प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा गौप्यस्फोट

Chandrashekhar Bawankule : गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) आपल्या पक्षात नाराज असल्याच्या बातम्या सतत येत आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडून पंकजा यांना डावलण्यात येत असल्याची देखील अनेकदा चर्चा झाली. मात्र याबाबत आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मोठं गौप्यस्फोट केला असून, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजपच्याच नेत्यांकडून (BJP Leader) पंकजा मुंडेंना बदनाम करण्याचा कट रचला जात असल्याचं बावनकुळे म्हणाले.

IND vs NZ, 2nd ODI : टीम इंडियाचा न्यूझीलंडवर दमदार विजय

India vs New Zealand ODI : रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय मैदानात भारतानं न्यूझीलंडवर (IND vs NZ) 8 गडी राखून दमदार असा विजय मिळवला आहे. सामन्यात आधी अप्रतिम गोलंदाजी करत अवघ्या 108 धावांत न्यूझीलंडच्या संपूर्ण संघाला भारतानं बाद केलं. त्यानंतर 109 धावांचं माफक लक्ष्य केवळ 20.1 ओव्हरमध्ये दोन गडी गमावून पूर्ण केलं आणि 8विकेट्सनी सामना जिंकला.  सामन्यात गोलंदाजीत सर्वांनी उत्तम कामगिरी केली. शमीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, तर फलंदाजीत कर्णधार रोहित शर्मानं (Rohit Sharma) अर्धशतक झळकावलं. विशेष म्हणजे या विजयासह भारतानं तीन सामन्यांच्या मालिकेतही 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.

Moon Closest to Earth : 993 वर्षांनंतर चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ

Moon Closest to Earth : चंद्राचे (Moon) पृथ्वीपासूनचे (Earth) अंतर (Distance of Moon and Earth) नेहमी एकसारखे नसते. चंद्राची पृथ्वीभोवतीची कक्षा (Orbit of Moon) वर्तुळाकार नसून लंबवर्तुळाकार असते. लंबवर्तुळाकार कक्षेमुळे, कधी चंद्र पृथ्वीपासून खूपच जवळ असतो, तर कधी फारच दूर असतो. यावर्षी तब्बल 993 वर्षांनंतर असा योग जुळून आला की, चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ (Moon Nearest to Earth) आला होता. शनिवारी चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ होता. असा योग हजारो वर्षानं जुळून आला आहे. 21 जानेवारी रोजी चंद्र आणि पृथ्वी एकमेकांच्या फार जवळ होते. पण अमावस्या असल्यामुळे पृथ्वीच्या इतक्या जवळ असलेला चंद्र आपल्याला दिसला नाही. 

22 जानेवारी 2023 | रविवार

Republic Day 2023 : प्रजासत्ताक दिनाच्या चित्ररथात साडेतीन शक्तीपीठांचा समावेश

Republic Day Parade : यंदा प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day) नवी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचा (Maharashtra News) चित्ररथ यंदा 'साडेतीन शक्तिपीठे आणि स्त्रीशक्ती जागर' यावर साकारण्यात येणार आहे. यामध्ये लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वणीच्या सप्तश्रृंगी देवीचा (Saptshrungi Devi) चित्ररथात समावेश असणार आहे. 26 जानेवारी निमित्त प्रजासत्ताक दिनी दिल्लीत कर्तव्य पथावर होणाऱ्या पथसंचलनाकडे देशवासीयांचे लक्ष लागलेले असते.

Pune Sakal Hindu Morcha : पुण्यात सकल हिंदू समाजाचा मोर्चा

पुण्यात सकल हिंदू समाजाच्या मोर्चाला सुरुवात झाली. छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिन हा धर्मवीर दिन म्हणून घोषित करावा, गोहत्या, लव्ह जिहाद, धर्मांतर विरोधी कायदा राज्यसह संपूर्ण देशात लागू करण्यात यावा यासाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे. हा मोर्चा लाल महालपासून निघणार असून डेक्कनच्या छत्रपती सभाजी पुतळ्यापर्यत काढला जाणार आहे. या मोर्चाला हिंदू जनआक्रोश मोर्चा अस नाव देण्यात आलं आहे. 

Abu Azmi : समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांना जीवे मारण्याची धमकी

समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. अबू आझमी यांच्या पीएला फोन करुन धमकी देण्यात आली आहे.

Moreshwar Temurde passes away : विधानसभेचे माजी उपाध्यक्ष अॅड. मोरेश्वर टेमुर्डे यांचे निधन

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विधानसभेचे माजी उपाध्यक्ष आणि वरोरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अॅड. मोरेश्वर टेमुर्डे यांचे निधन झाले. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे राहत्या घरी झोपेतच ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय होते. 

America Air Strike : सोमालियात अमेरिकेचा एअर स्ट्राईक; अल शबाबचे 30 दहशतवादी ठार

America Air Strike on Somalia : अमेरिकन (America) सैन्याने सोमालिया (Somalia) देशातील दहशतवादी ठिकाणावर एअर स्ट्राईक (Air Strike) केला आहे. अमेरिकन सैन्याने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये अल शबाब या दहशतवादी संघटनेच्या 30 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं आहे. अमेरिकन सैन्याने शुक्रवारी सोमाली शहरातील अल शबाब दहशतवादी संघटनेला लक्ष्य करत त्यांच्यावर एअर स्ट्राईक केला. इथे सोमालियाचे लष्कर आणि अल शबाब संघटनेच्या दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. सोमालियातील दहशतवाद्यांशी लढण्याला अमेरिका सोमालिया सरकारला मदत करत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये अमेरिकेने अनेक वेळा दहशतवाद्यांच्या ठिकाणांना लक्ष्य केलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhaskar Jadhav On Nana Patole : Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचितABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
Embed widget