एक्स्प्लोर

Maharashtra Weather Update: गणरायाच्या स्वागताला वरुणराजा लावणार हजेरी, महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; पुण्यासह या जिल्ह्यांना अलर्ट जारी

Maharashtra Weather Update: मान्सूनचे वारे अचानक सक्रिय झाल्यामुळे, राज्यात 7 ते 9 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. प्रामुख्याने पुणे, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांना तीन दिवस अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

पुणे: आज घरोघरी गणरायाचं आगमन होणार आहे, आज गणरायाच्या आगमनाला वरूणराजा देखील हजेरी लावण्याची शक्यता आहे. राज्यातील काही भागात मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे, तर काही भागात विश्रांती घेतली आहे. आजपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) काही ठिकाणी शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. आज पुन्हा एकदा राज्यात हवामान विभागाकडून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मान्सूनचे वारे अचानक सक्रिय झाल्यामुळे, राज्यात 7 ते 9 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा (Heavy Rain) देण्यात आला आहे. प्रामुख्याने पुणे, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांना तीन दिवस अतिमुसळधार पावसाचा (Heavy Rain) ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसात विश्रांती घेतलेल्या मान्सूनचे वारे राज्यात कालपासून (शुक्रवारपासून) पुन्हा सक्रिय झाले असून, गणपतीच्या आगमनालाच आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील बहुतांश भागात 9 सप्टेंबरपर्यंत यलो, तर पुणे, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांना 7 ते 9 सप्टेंबरपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

ऑरेंज : रायगड (7 ते 9), रत्नागिरी (8, 9), सिंधुदुर्ग (8), पुणे (8, 9), सातारा (7 ते 9), कोल्हापूर (9) यलो अलर्ट : संपूर्ण विदर्भ (7 ते 9)

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पावसाचा इशारा

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता आहे. मात्र, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात कमी पावसाचा अंदाज आहे. एकदा मान्सून राज्यात सक्रिय झाल्यावर मात्र, त्या भागात पाऊस वाढण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून त्याचे रूपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होण्याची शक्यता आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम-उत्तर-पश्चिम दिशेने छत्तीसगड, उत्तर विदर्भ, दक्षिण मध्य प्रदेशाकडे सरकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील पावसाची तीव्रता काल (शुक्रवारी) वाढली. त्यामुळे 7 ते 9 सप्टेंबरदरम्यान कोकणासह पुणे, सातारा घाटमाथा भागात अतिवृष्टीची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने  निवृत्त हवामान विभागप्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिली आहे.

पुण्यात पुढील तीन दिवस अतिमुसळधार बरसणार

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्यामुळे मान्सूनचे वारे पुन्हा सक्रिय झाल्यामुळे पुणे शहर घाटमाथ्यासह जिल्ह्याला हवामान विभागाने 7 ते 9 सप्टेंबर या काळात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा देण्यात आला आहे. पुणे शहरात कमी आधिक प्रमाणात पावसाच्या सरी सुरूच आहेत. 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 सप्टेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 सप्टेंबर 2024 | सोमवार
Nana Patole : शिंदेजी, वाचाळवीर संजय गायकवाडांना वेळीच आवरा, नाहीतर...; नाना पटोलेंचा इशारा
शिंदेजी, वाचाळवीर संजय गायकवाडांना वेळीच आवरा, नाहीतर...; नाना पटोलेंचा इशारा
मोठी बातमी! पुण्यातील वनराज आंदेकर प्रकरण;आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई; काय आहे शिक्षा?
मोठी बातमी! पुण्यातील वनराज आंदेकर प्रकरण;आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई; काय आहे शिक्षा?
women Health: मासिक पाळीदरम्यान हे व्यायाम चुकुनही करू नका, रक्तस्राव अधिक होऊन थकवा येण्याचा वाढताे धोका
मासिक पाळीदरम्यान हे व्यायाम चुकुनही करू नका, रक्तस्राव अधिक होऊन थकवा येण्याचा वाढताे धोका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nana Patekar Ganpati Bappa : देवेंद्र फडणवीस - अजित पवार नाना पाटेकरांच्या फार्महाऊसवर ABP MAJHAABP Majha Headlines : 05 PM : 16 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सKolhapur Truck Accident : पुणे बंगळुरू हायवेवर भीषण अपघात, तिघे जागीच दगावलेAmbernath Truck Bike Accident : घाई करणं भोवलं, दुचाकी थेट ट्रक खाली, मृत्यू अक्षरश: कट मारून गेला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 सप्टेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 सप्टेंबर 2024 | सोमवार
Nana Patole : शिंदेजी, वाचाळवीर संजय गायकवाडांना वेळीच आवरा, नाहीतर...; नाना पटोलेंचा इशारा
शिंदेजी, वाचाळवीर संजय गायकवाडांना वेळीच आवरा, नाहीतर...; नाना पटोलेंचा इशारा
मोठी बातमी! पुण्यातील वनराज आंदेकर प्रकरण;आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई; काय आहे शिक्षा?
मोठी बातमी! पुण्यातील वनराज आंदेकर प्रकरण;आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई; काय आहे शिक्षा?
women Health: मासिक पाळीदरम्यान हे व्यायाम चुकुनही करू नका, रक्तस्राव अधिक होऊन थकवा येण्याचा वाढताे धोका
मासिक पाळीदरम्यान हे व्यायाम चुकुनही करू नका, रक्तस्राव अधिक होऊन थकवा येण्याचा वाढताे धोका
आमदाराला निवडून येणं महत्त्वाचं, पक्ष नाही; अजित पवारांच्या आमदारांबाबत बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य
आमदाराला निवडून येणं महत्त्वाचं, पक्ष नाही; अजित पवारांच्या आमदारांबाबत बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य
Twice Born Baby: दोनवेळा जन्माला आलेलं जगातलं पहिलं बाळ! आईच्या गर्भातून काढून पुन्हा ठेवलं गर्भात, विज्ञानाच्या चमत्काराची जगभर चर्चा
दोनवेळा जन्माला आलेलं जगातलं पहिलं बाळ! आईच्या गर्भातून काढून पुन्हा ठेवलं गर्भात, विज्ञानाच्या चमत्काराची जगभर चर्चा
धनगर-धनगड एकच, महायुतीत खडाजंगी, झिरवाळांनंतर अजितदादांच्या आणखी एका आमदाराचा सरकारला घरचा आहेर
धनगर-धनगड एकच, महायुतीत खडाजंगी, झिरवाळांनंतर अजितदादांच्या आणखी एका आमदाराचा सरकारला घरचा आहेर
Sadabhau Khot VIDEO : संजय राऊत घरकोंबडा, महाविकास आघाडीचे नेते वळू-रेडे, त्यांना चाबकाने फोडून काढणार : सदाभाऊ खोत
संजय राऊत घरकोंबडा, महाविकास आघाडीचे नेते वळू-रेडे, त्यांना चाबकाने फोडून काढणार : सदाभाऊ खोत
Embed widget