एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुस्लीम आरक्षणासाठी एमआयएम कोर्टात जाणार : इम्तियाज जलिल
मागील सरकारने मराठा समाजांसह मुस्लिमांनाही 5 टक्के आरक्षण दिले होते. मात्र ते आरक्षण कोर्टात टिकले नव्हते.
मुंबई : मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर झाल्यानंतर आता मुस्लीम आरक्षणाचा मुद्दा जोर धरत आहे. मुस्लीम आरक्षणासाठी कोर्टात जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती एमआयएमचे औरंगाबादचे आमदार इम्तियाज जलिल यांनी दिली. विधानसभा आणि विधानपरिषदेत काल एकमताने मराठा समाजाला 16 टक्के आरक्षणाचे विधेयक मंजूर झाले. आघाडी सरकारने मराठा समाजांसह मुस्लिमांनाही 5 टक्के आरक्षण दिले होते. मात्र ते आरक्षण कोर्टात टिकले नव्हते.
कोणत्याही पक्षाला मुस्लिमांचं देणंघेणं नाही, आम्ही मुस्लीम आरक्षणाच्या मागणीसाठी कोर्टात जाण्याच्या तयारीत आहोत. काँगेस-राष्ट्रवादीचे मुस्लीम आमदार आता मुस्लीम आरक्षणाच्या मागणीचं नाटक करत आहेत. मात्र इतकी वर्ष तुमचीच सत्ता होती, तेव्हा तुम्ही काय केले? असा प्रश्न इम्तियाज जलिल यांनी उपस्थित केला. ज्याप्रमाणे मराठ्यांना आर्थिक, सामाजिक स्थितीच्या आधारे आरक्षण देण्यात आले, त्याच प्रमाणे मुस्लिमांनाही आरक्षण देण्यात यावे, अशी आमची मागणी असल्याचे इम्तियाज जलिल म्हणाले.
मुस्लिमांची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक स्थिती पहावी आणि मुस्लिमांना आरक्षण द्यावे. मात्र हे सरकार मुस्लिमविरोधी आहे. त्यांना माहिती आहे की मुस्लीम त्यांना मतदान करणार नाही. म्हणून ते मुस्लिमांना दुर्लक्षित करत आहेत. आता मुस्लिमांना फक्त न्यायालयातून न्याय मिळू शकतो. म्हणून आम्ही मुस्लीम वर्गाचं मागासलेपण सिद्ध करणारी माहिती गोळा करून न्यायालयासमोर मांडणार आहोत, असं एमआयएमचे आमदार इम्तियाज जलिल म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement