एक्स्प्लोर
काकस्पर्श न झाल्याने नगरमध्ये बंधाऱ्यातून चक्क पाणी सोडलं!
खरंतर पाण्यावरचं शेवाळ काढणं अपेक्षित होतं किंवा शेवाळास कारणीभूत ठरणारं प्रदूषित पाणी रोखण्याची आवश्यकता असताना, चक्क पाणीच सोडण्यात आलं आहे.

अहमदनगर : अहमदनगर श्रीगोंदा शहरात दशक्रिया विधीच्या वेळी काकस्पर्श होत नसल्यानं बंधाऱ्यातील पाणी सोडण्याचा प्रकार घडला. शेवाळयुक्त पाणी साचल्याने काकस्पर्श होत नसल्याने गोरे मळ्याजवळील बंधाऱ्यातून लाख मोलाचं पाणी सोडण्यात आले. स्थानिक नगरसेवक आणि नागरिकांनी हा अजब निर्णय घेतला. खरंतर पाण्यावरचं शेवाळ काढणं अपेक्षित होतं किंवा शेवाळास कारणीभूत ठरणारं प्रदूषित पाणी रोखण्याची आवश्यकता असताना, चक्क पाणीच सोडण्यात आलं आहे. या अंधश्रद्धेने मात्र लाखमोलाचं पाणी वाया गेलं.
एकीकडे, सरकार पाण्यासाठी जलयुक्त शिवार योजना राबवत असताना, दुसरीकडे काकस्पर्शासाठी बंधाऱ्यातील पाणी सोडल्याने आश्चर्य तर व्यक्त केला जातोच आहे, मात्र संतापही व्यक्त होतो आहे. पाणी सोडल्यानं काकस्पर्श होईल का यावरही उलट सुलट चर्चा सुरु आहे. श्रीगोंदा शहरातील सरस्वती नदीवर गोरे मळा परिसरात बंधारा आहे. यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं बंधाऱ्याचं पाणी दशक्रियाच्या ओट्यापर्यत आलं होतं. मात्र या पाण्यावर शेवाळ साचल्याने दशक्रिया विधी करण्यास अडचण निर्माण होत असल्याचं काही नागरिकांचं मत होतं.
एकीकडे, सरकार पाण्यासाठी जलयुक्त शिवार योजना राबवत असताना, दुसरीकडे काकस्पर्शासाठी बंधाऱ्यातील पाणी सोडल्याने आश्चर्य तर व्यक्त केला जातोच आहे, मात्र संतापही व्यक्त होतो आहे. पाणी सोडल्यानं काकस्पर्श होईल का यावरही उलट सुलट चर्चा सुरु आहे. श्रीगोंदा शहरातील सरस्वती नदीवर गोरे मळा परिसरात बंधारा आहे. यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं बंधाऱ्याचं पाणी दशक्रियाच्या ओट्यापर्यत आलं होतं. मात्र या पाण्यावर शेवाळ साचल्याने दशक्रिया विधी करण्यास अडचण निर्माण होत असल्याचं काही नागरिकांचं मत होतं. Before You Go
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र





















