एक्स्प्लोर
लातूरमध्ये गणेश विसर्जनाला दुष्काळाचा फटका, गणेशमूर्ती विसर्जित न करता दान करण्याचा मंडळांचा निर्णय
गणेश मंडळांच्या गणेशमूर्ती विसर्जित न करता दान करण्याचा निर्णय घेण्यात आला. मोठ्या गणेशमूर्ती त्याच बरोबर मानाच्या गणेशमूर्ती या लातूरचे ग्रामदैवत असलेल्या सिद्धेश्वर मंदिरात ठेवण्यात येणार आहेत.
![लातूरमध्ये गणेश विसर्जनाला दुष्काळाचा फटका, गणेशमूर्ती विसर्जित न करता दान करण्याचा मंडळांचा निर्णय water shortage due to drought affected ganesh visarjan in latur लातूरमध्ये गणेश विसर्जनाला दुष्काळाचा फटका, गणेशमूर्ती विसर्जित न करता दान करण्याचा मंडळांचा निर्णय](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/09/11201939/WEB-Latur-dushkal-feed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
लातूर : जिल्ह्यात यावर्षी पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र पाण्याची प्रचंड टंचाई आहे. जिल्ह्यातील सर्व नदी नाले आणि विहिरी कोरड्या पडल्या आहेत. यामुळे गणेशमूर्तीचे विसर्जन कुठे करावे असा जटिल प्रश्न आहे.
याबाबत आज लातूर शहरात शांतता कमिटीची बैठक झाली. या बैठकीला लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत पोलीस अधीक्षक राजेंद्र माने यांच्यासह शहरातील अनेक गणेशमंडळाचे पदाधिकारी हजर होते. या सर्वांसमोर एकच प्रश्न होता कि यावर्षी गणेश विसर्जन कुठे आणि कसे करावे? यावर तोडगा काढत मोठ्या गणेश मंडळांच्या गणेशमूर्ती विसर्जित न करता दान करण्याचा निर्णय घेण्यात आला. मोठ्या गणेशमूर्ती त्याच बरोबर मानाच्या गणेशमूर्ती या लातूरचे ग्रामदैवत असलेल्या सिद्धेश्वर मंदिरात ठेवण्यात येणार आहेत. पाणी टंचाईमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला गणेश मंडळांनी सहकार्य करावे आणि त्याच जोशात सण साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
गणेशमूर्ती विसर्जनाऐवजी हे आहेत उपाय सुचवण्यात आले आहेत :
- गणेशमूर्ती मंदिरात ठेवणे
- गणेशमूर्ती दान करणे
- मंडळाकडे जागा असल्यास जतन करून ठवणे
- घरगुती गणेशमूर्ती घरातच पाण्यात विसर्जन करणे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
राजकारण
राजकारण
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)