कोकण रेल्वे आजही विस्कळीतच; पेडणे बोगद्यात पाणी, वाहतूक ठप्प, मुंबईतून सुटणाऱ्या 13 एक्स्प्रेस रद्द
Rain Updates : गोव्याहून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. सावंतवाडी रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.
Konkan Railway : मुंबई : पश्चिम किनारपट्टी पट्ट्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे (Konkan Railway Updates) मार्गावर परिणाम झाला आहे. गोव्याहून (Goa) मुंबईच्या (Mumbai) दिशेनं जाणाऱ्या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. सावंतवाडी रेल्वे स्थानकावर (Sawantwadi Railway Station) प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. अनेक प्रवासी अडकून पडले आहेत.
काल (मंगळवारी) संध्याकाळनंतर विस्कळीत झालेली कोकण रेल्वे अद्याप देखील रुळावर आलेली नाही. पडणे बोगदात सध्या युद्ध पातळीवर काम सुरू आहे. त्यामुळे मुंबई ते मडगाव या कोकण रेल्वे मार्गावरील सर्वच गाड्या रद्द झालेल्या आहेत. तर लांब पल्ल्याच्या काही गाड्या या पर्यायी मार्गानं वळवण्यात आल्या आहेत. असं असलं तरी प्रवाशांचे मात्र सध्या मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
आजच्या दिवशी रद्द करण्यात आलेल्या ट्रेन्स
- 12449 मडगाव जंक्शन : चंदीगड एक्सप्रेस
- 12620 बंगळुरू सेंट्रल : लोकमान्य टिळक एक्सप्रेस
- 12134 मंगळुरू जंक्शन : मुंबई सीएसएमटी एक्सप्रेस
- 50107 सावंतवाडी रोड : मडगाव जंक्शन
दुसऱ्या मार्गावरुन वळवण्यात आलेल्या ट्रेन
- 16345 लोकमान्य टिळक : तिरुअनंतपुरम
- 22113 लोकमान्य टिळक : कोचिवल एक्सप्रेस
- 12432 हजरत निजामुद्दीन : तिरुअनंतपुरम, गाडी राजापूर रेल्वे स्थानकातून पनवेल मार्गे पुणे सोलापूर या मार्गावरून पुढे जाईल.
- 19260 भावनगर : कोचुवेली एक्सप्रेस, गाडी रत्नागिरी रेल्वे स्टेशनतुन मागे जाईल.
- 12224 लोकमान्य टिळक : एरणाकुलम एक्सप्रेस चिपळूण रेल्वे स्टेशनमधून मागे जाईल.
- 20932 इंदोर जंक्शन : कोचिवल्ली एक्सप्रेस, ही गाडी सुरत जळगाव वर्धा या मार्गे वळविण्यात आलेली आहे.
रत्नागिरी रेल्वे स्थानकामध्ये उभी असलेली भावनगर टर्मिनस : कोचीवली एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने रवाना झालेली आहे. ही ट्रेन पनवेल -पुणे-सोलापूर मार्गे वळवण्यात आलेली आहे.
तुळशी घाटात दरड कोसळण्याचं सत्र सुरूच
रत्नागिरी जिल्ह्यात कोसळणाऱ्या अति मुसळधार पावसामुळे मंडणगड बाणकोट रस्त्यावरील तुळशी घाटात दरड कोसळण्याचं सत्र सुरूच आहे. या मार्गावर तुळशी घाटात वारंवार दरड कोसळून वाहतूक ठप्प होत आहे. मंडणगड ते अंबडवे यादरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे काम करण्यात आलं. त्यामुळे रस्ता रुंदीकरणासाठी डोंगर कटिंग करण्यात आलं होतं. त्यामुळे सतत या डोंगरांची दरड कोसळत असल्यानं हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे.
पाहा व्हिडीओ : Kokan Railway Cancelled : पेडणे बोगद्यात पाणी, कोकण रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम