एक्स्प्लोर

राज्याला धडकी भरवणाऱ्या वाई हत्यांकाड खटल्याची सुनावणी सुरू

वाई येथील हत्यांकाड खटल्याची सुनावणी सुरू सातारा जिल्हा न्यायालयात सुरू झाली आहे. डॉ. संतोष पोळ या खटल्यात मुख्य आरोपी आहे.

सातारा : चार वर्षापूर्वी संपुर्ण राज्याला धडकी भरवणाऱ्या वाई हत्यांकाड खटल्याची सुनावणी सातारा जिल्हा न्यायालयातील जिल्हा न्यायाधीश एन. एल. मोरे यांच्यासमोर सुरू झाली आहे. साताऱ्यातील वाई येथील डॉ. संतोष पोळ याने इंजेक्शनच्या माध्यमातून सहा जणांचे खून केल्याचे उघड झाले आणि डॉक्टराच्या या कृत्याने संपुर्ण राज्यात खळबळ उडाली होती. यातील प्रमुख आरोपी डॉ. संतोष पोळ आणि ज्योती मांढरे या दोघांनाही वाई पोलिसांनी अटक केली होती. सामाजिक कार्यकर्त्या मंगल जेधे यांच्या बेपत्ता तक्रारीच्या तपासावेळी हा संपुर्ण प्रकार उघडकिस आला होता. वैद्यकीय व्यवसायाला काळिमा फासणाऱ्या या प्रकरणात ज्योती मांढरे माफीची साक्षीदार झाली आहे. तिने न्यायालयात जबाबात दिलेली माहिती धक्कादायक आहे. मंगल जेधेला विश्वासात घेऊन पुण्याला जायचे आहे, थकवा नको असे म्हणत या डॉक्टरने तिला विषारी इंजेक्शन देऊन मारले आणि डॉ. संतोषने त्याच्या फार्महाऊस मध्ये नेहून त्या ठिकाणी तिला पुरले, अशी माहिती ज्योती मांढरेने न्यायालयासमोर सांगितली. या वेळी संतोष पोळला कोल्हापूर येथील कारागृहातून सातारा न्यायालयात आणले होते. हा खटला सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्वल निकम लढत आहेत. पुढील सुनावनी 14 फेब्रुवारीला होणार आहे. याबाबत माहिती अशी की, दोन वर्षांपूर्वी वाई येथील डॉक्टर घोटावळेकर यांच्या दवाखान्यातील कंपाऊंडर असलेल्या संतोष पोळ याने सोन्याचे दागिने आणि पैशाच्या हव्यासापोटी पाच महिलांसह सहाजणांचा खून केला होता. अंगणवाडी सेविका संघटनेच्या राज्याध्यक्षा मंगला जेधे यांच्या खुनानंतर वाई पोलिसांनी संतोष पोळ याला अटक केली. त्यानंतर पोळ याने केलेल्या सर्व खुनांची उकल झाली. पोलिसांनी सर्वांचे मृतदेह ताब्यात घेऊन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. पैशाच्या हव्यासापोटी खून - पैशाच्या हव्यासापोटी संतोष पोळने हे खून केल्याची कबुली दिली. हत्येनंतर मृतांचे जबरदस्तीने दागिगे काढून घेत असे. हे दागिने सोनार मारवाडी व नातेवाईकांकडे दिले असल्याचे त्याने सांगितले. संबंधित बातमी - Angad Singh | अंगद सिंगची हत्या युवक काँग्रेसच्या वादातून | ABP Majha

एबीपी माझाच्या स्थापनेपासून कार्यरत, 22 वर्षाच्या पत्रकारीतेचा अनुभव, व्यंगचित्रकार म्हणून सुरवात!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

सोशल मीडियातून ओळख, एकतर्फी प्रेम; माझं प्रेम स्वीकार कर म्हणत तरुणाने कॉलेजच्या युवतीला संपवलं
सोशल मीडियातून ओळख, एकतर्फी प्रेम; माझं प्रेम स्वीकार कर म्हणत तरुणाने कॉलेजच्या युवतीला संपवलं
Washim Crime News: किरकोळ कौटुंबिक वादानं संतापाचं टोक गाठलं; पतीनं पत्नीला संपवलं, वाशिमचं रिसोड शहर हादरलं!
किरकोळ कौटुंबिक वादानं संतापाचं टोक गाठलं; पतीनं पत्नीला संपवलं, वाशिमचं रिसोड शहर हादरलं!
निवडणुका EVM वर घ्या किंवा कागदावर, जिंकणार तर आम्हीच; विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांना विश्वास
निवडणुका EVM वर घ्या किंवा कागदावर, जिंकणार तर आम्हीच; विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांना विश्वास
Mahayuti: आपण एकत्र आहोत, तर वेगळी भूमिका का? पक्षाच्या दृष्टीने हे कृत्य योग्य नाही; छत्रपती संभाजीनगरच्या महायुतीतील नाट्यमय घडामोडींवर देवेंद्र फडणवीसांचे खडे बोल, म्हणाले..
आपण एकत्र आहोत, तर वेगळी भूमिका का? पक्षाच्या दृष्टीने हे कृत्य योग्य नाही; छत्रपती संभाजीनगरच्या महायुतीतील नाट्यमय घडामोडींवर देवेंद्र फडणवीसांचे खडे बोल, म्हणाले..

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Accident News:सप्तश्रुंग गडाच्या पायथ्याला मध्यरात्री अपघात; कार दुचाकीसह एका वाहनाला धडकली, नंतर बंदोबस्तातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही उडवलं, एकाचा मृत्यू, 11 जखमी
सप्तश्रुंग गडाच्या पायथ्याला मध्यरात्री अपघात; कार दुचाकीसह एका वाहनाला धडकली, नंतर बंदोबस्तातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही उडवलं, एकाचा मृत्यू, 11 जखमी
Kolkata Tragedy : गर्दी, पाऊस अन् स्पीकरवरून झालेली 'ती' एक घोषणा, घटनास्थळी गोंधळ अन् 19 जणांचा दुर्दैवी अंत; कोलकाता दुर्गा पूजा मंडपातील दुर्घटनेची नेमकी कारणं काय?
गर्दी, पाऊस अन् स्पीकरवरून झालेली 'ती' एक घोषणा, घटनास्थळी गोंधळ अन् 19 जणांचा दुर्दैवी अंत; कोलकाता दुर्गा पूजा मंडपातील दुर्घटनेची नेमकी कारणं काय?
Gold Rate Weekly Update : चांदीच्या दरात पाच दिवसात 14000 रुपयांची घसरण, सोनं किती रुपयांनी स्वस्त झालं? जाणून घ्या नवे दर
चांदीच्या दरात पाच दिवसात 14000 रुपयांची घसरण, सोनं किती रुपयांनी स्वस्त झालं? जाणून घ्या नवे दर
JIO IPO : जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
सोशल मीडियातून ओळख, एकतर्फी प्रेम; माझं प्रेम स्वीकार कर म्हणत तरुणाने कॉलेजच्या युवतीला संपवलं
सोशल मीडियातून ओळख, एकतर्फी प्रेम; माझं प्रेम स्वीकार कर म्हणत तरुणाने कॉलेजच्या युवतीला संपवलं
निवडणुका EVM वर घ्या किंवा कागदावर, जिंकणार तर आम्हीच; विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांना विश्वास
निवडणुका EVM वर घ्या किंवा कागदावर, जिंकणार तर आम्हीच; विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांना विश्वास
Beed Accident: पालखी महामार्गावर भीषण अपघात; तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, 5 जण जागीच ठार
पालखी महामार्गावर भीषण अपघात; तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, 5 जण जागीच ठार
Chandrakant Patil : पुणे शिक्षकच्या निवडणुकीला पाच दिवस; राज्याचे त्रिमूर्ती नेते तोडगा काढतील, एकनाथ शिंदेंचा विषय सेटल होईल, भाजपला पाठिंबा मिळेल, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चर्चेत
पुणे शिक्षकच्या निवडणुकीला पाच दिवस; राज्याचे त्रिमूर्ती नेते तोडगा काढतील, एकनाथ शिंदेंचा विषय सेटल होईल, भाजपला पाठिंबा मिळेल, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चर्चेत
Embed widget