Vivek Phansalkar: राज्याच्या पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार विवेक फणसाळकरांकडे; रजनीश सेठ यांच्या सेवानिवृत्तीमुळे निर्णय
Vivek Phansalkar: मुंबईच्या पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार विवेक फणसाळकरांकडे, पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्या सेवानिवृत्तीमुळे अतिरिक्त कार्यभार फणसाळकरांकडे.
Vivek Phansalkar State Director General Of Police : पोलीस महासंचालकपदाचा (State Director General Of Police) अतिरिक्त कार्यभार विवेक फणसाळकर (Vivek Phansalkar) यांच्याकडे देण्यात येणार आहे. सध्याचे पोलीस (Maharashtra Police) महासंचालक रजनीश सेठ निवृत्त झाल्यामुळे विवेक फणसाळकर यांच्याकडे तात्पुरता कार्यभार सोपवण्यात आला आहे. त्यामुळे पुढील आदेश मिळेपर्यंत पोलीस महासंचालकपदी विवेक फणसाळकर असणार आहेत.
राज्याच्या पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार विवेक फणसाळकरांकडे सोपवण्यात आला आहे. पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्या सेवानिवृत्तीमुळे अतिरिक्त कार्यभार फणसाळकरांकडे सोपवण्यात आला आहे. माजी पोलीस महासंचालक 31 डिसेंबर रोजी वयोमानानुसार शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत.
महाराष्ट्र सरकारनं ऑक्टोबरमध्ये 1988 च्या बॅचचे अधिकारी रजनीश सेठ यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. एमपीएससीच्या अध्यक्षपदासाठी सेठ यांच्या नावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. आता सेठ हे सेवेतून निवृत्त झाले असून ते लवकरच नवीन कार्यभार स्वीकारू शकतात.
सेठ यांनी फेब्रुवारी 2022 मध्ये महाराष्ट्राचे DGP म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (ACB) महासंचालक म्हणून काम केलं होतं. त्यापूर्वी त्यांनी मुंबई शहरात सह आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) म्हणूनही काम केलं आहे.