एक्स्प्लोर
Advertisement
केरळ पूरग्रस्तांसाठी विठुराया धावला, मंदिर समितीची 25 लाखांची मदत
मंदिर समितीने यापूर्वीही अनेक वेळी अशाप्रकारची मदत केली आहे. दोन वर्षापूर्वी महाराष्ट्रातील दुष्काळासाठीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराने एक कोटीची मदत दिली होती.
पंढरपूर : महापुराने उद्ध्वस्त झालेल्या केरळला जगभरातून मदतीचा ओघ सुरुच आहे. भारताच्या कानाकोपऱ्यातून केरळला मदत पाठवली जात आहे. यावेळी केरळमधील पूरग्रस्तांसाठी विठुराया धावला आहे. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री सहय्यता निधीस २५ लाख रुपये मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी या मदतीची घोषणा केली. मंदिर समितीने यापूर्वीही अनेक वेळी अशाप्रकारची मदत केली आहे. दोन वर्षापूर्वी महाराष्ट्रातील दुष्काळासाठीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराने एक कोटीची मदत दिली होती .
केरळ पूरग्रस्तांसाठी अन्नाचा पुरवठा ही प्राधान्याची गरज असल्याचं लक्षात घेऊन महाराष्ट्रातील विविध सामाजिक, स्वयंसेवी तसेच व्यावसायिक संस्थांशी राज्य शासनाने समन्वय साधत अन्न पुरवठा करण्याची व्यवस्था केली आहे.
रिलायन्सची केरळला तगडी मदत, अनेक राज्यांपेक्षा मोठी रक्कम
देशातील बडे उद्योजक असलेल्या अंबानी कुटुंबाच्या रिलायन्स फाऊंडेशनने पूरग्रस्तांना मोठी मदत केली आहे. रिलायन्सने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 21 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. इतकंच नाही तर रिलायन्स फाऊंडेशन तब्बल 51 कोटी रुपयांचं आवश्यक साहित्य पाठवणार आहे.
राज्य सरकारकडून केरळसाठी 20 कोटी आणि अन्नाची पाकिटं
केरळमध्ये ओढवलेल्या अतिवृष्टीच्या संकटप्रसंगी पूरग्रस्तांना मदत म्हणून महाराष्ट्रातर्फे 20 कोटी रुपयांची तातडीची आर्थिक मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली. शिवाय विविध सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांशी कालपासूनच राज्य सरकार संपर्कात असून त्यांच्याशी समन्वय साधून अन्नपुरवठा आणि इतर मदतीसाठी राज्याकडून पुढाकार घेण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
पुणे
निवडणूक
निवडणूक
Advertisement