एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दारुबंदीसाठी वडगाव सिद्देश्वरमध्ये विराट मोर्चा, आक्रमक महिलांकडून दारुचे अड्डे उद्धवस्त
वारंवार तक्रार करुनही पोलिस प्रशासन किंवा ग्रामपंचायत काहीही कारवाई करत नव्हती त्यानंतर महिलांनी दारुबंदीसाठी पुढाकार घेतला. विराट मोर्चा काढून दारुचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले.
उस्मानाबाद : उस्मानाबाद तालुक्यातील वडगाव सिद्धेश्वरमध्ये दारुबंदीसाठी विराट मोर्चा काढण्यात आला. वारंवार तक्रार करुनही पोलिस प्रशासन किंवा ग्रामपंचायत काहीही कारवाई करत नव्हतं. त्यामुळं महिलांनी स्वत: दारु विक्रेत्यांना दारु बंद करण्यासाठी बजावलं. पण दारु विक्रेत्यांकडून महिलांना उद्धट उत्तरं मिळाली. त्यानंतर आक्रमक झालेल्या महिलांनी दारुबंदीसाठी पुढाकार घेतला. विराट मोर्चा काढून दारुचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले.
अवैध दारूबंदीसाठी पुढे येवून गावातील महिलांनी मोर्चा काढला पोलीस प्रशासन आणि ग्रामपंचायत काहीही कारवाई करत नाही याचा पहिला राग होता. सरपंच अंकिता अंकुश मोरे यांना आज निवेदन दिले तसेच या आशयाचे निवेदन उस्मानाबाद पोलीस स्टेशनचे निरीक्षक यांनाही देण्यात आले. गावातील महिलांनी दारूबंदीसाठी एकजूट होऊन दारूबंदीसाठी ग्रामपंचायत धडक मोर्चा काढला.
अवैध दारूविक्री करणाऱ्या व्यक्तीची भेटी घेऊन दारू विक्री न करण्याबाबत समज दिली. त्यावेळी दारू विक्रेत्यांनी गावातील महिलांशी अरेरावी उद्धटपणे बोलल्यामुळे दारूबंदीसाठी पुढाकार घेतल्याने अवैध धंदे करणारे धमकावून अवैधरीत्या दारूची विक्री करणाऱ्या ठिकाणाची महिलांनी दारूची अड्डे उध्वस्त करून तोडफोड करून दारू जप्त करून विल्हेवाट केली. यामुळे गावामध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता.
वडगाव सिद्धेश्वर आणि परिसरात अनधिकृत व बेकायदेशीर अवैध दारू विक्री वाढलेली आहे. यामुळे परिसरातील व गावातील कित्येक तरुण पिढी यामुळे व्यसनाधीन झालेली आहेत. परिसरातील उत्तमी कायापुर, पळसवाडी, वरवंठी आदी गावातील नागरिक वडगाव याठिकाणी दारू पिण्यासाठी येत आहेत. दारू पिल्यानंतर एकमेकांना शिव्या देणे,भांडण तंटा करणे आदी प्रकार सर्रास होऊ लागले आहेत. त्यामुळे परिसरातील शाळकरी विद्यार्थ्यांवर,महिलावर याचा विपरीत परिणाम होऊ लागला आहे.तसेच या परिसरातील तरुण पिढी व्यसनाधीन झालेली आहे. तसेच या भागातील दारूविक्री ताबडतोब बंद करण्यात यावी तसेच भेसळयुक्त दारू विकणाऱ्यांवरही कारवाई व्हावी अशी मागणीही यावेळी महिलांनी निवेदनाद्वारे केली.
सुट्टीच्या दिवशी शाळेच्या आवारात तसेच अंगणवाडीच्या आवारात लोक दारूपीत बसतात याचा त्रास मात्र दुसर्या दिवशी शाळकरी मुलांना होत असल्याचा आरोपही महिलांनी केला.यामुळे शाळेतील मुलांचे भविष्य धोक्यात आले आहे तसेच महिलांचे संसारही उघड्यावर आलेले आहेत याचा बंदोबस्त पोलिस प्रशासनाने तत्काळ करावा अन्यथा या महिलांनी आत्मदहन करण्यासाठी यावेळी इशारा दिला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
व्यापार-उद्योग
राजकारण
क्रीडा
Advertisement