एक्स्प्लोर

'...यामुळे मेटेंच्या गाडीला अपघात', उपमुख्यमंत्री फडणवीसांचं निवेदन; अजित पवार म्हणाले...

Highway Accident Issue Raise in Assembly : महामार्गावरील अपघाताचा मुद्दा उपस्थित करताना वर्षा गायकवाड यांनी म्हटलं की, महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होतं आहेत. याबाबत शासन काय निर्णय घेणार आहे.

Devendra Fadanvis on Vinayak Mete Accident : सध्या विधानसभेचं पावसाळी अधिवेशन (Monsoon Assembly Session) सुरु आहे. आज विधानसभेत वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी मुंबई-पुणे महामार्गावरील अपघाताचा मुद्दा उपस्थित केला. शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या अपघातानंतर मुंबई-पुणे महामार्गावर झालेला अपघाताची सरकारने चौकशी लावली आहे, असं म्हणत वर्षा गायकवाड यांनी सरकार यावर काय उपाययोजना करणार असा सवाल उपस्थित केला. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी म्हटलं की, चालकाचा अंदाज चुकल्याने विनायक मेटे यांचा अपघात झाला. मेटे यांचा जागीच मृत्यू झाल्याची डॉक्टरांची माहिती दिली. यंत्रणा बदलणं गरजेचं आहे. अपघाताचं लोकेशन न कळल्यानं मदत पोहोचायला उशीर झाला, असं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी निवेदन मांडताना म्हटलं आहे.

वर्षा गायकवाड यांनी मांडला अपघाताचा मुद्दा

महामार्गावरील अपघाताचा मुद्दा उपस्थित करताना वर्षा गायकवाड यांनी म्हटलं की, शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्या अपघातानंतर मुंबई-पुणे महामार्गावर झालेला अपघाताची सरकारने चौकशी लावली आहे. मात्र इतर महामार्गावरही अपघात होतं आहेत. अनेक अपघात हे खड्यांमुळे होतं आहे. कोकणातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. माझा डोळ्यासमोर त्या दिवशी खड्यांमुळे अपघात झाला. याबाबत शासन काय धोरणात्मक निर्णय घेणार आहे, असा सवालही वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला.

चालकाच्या चुकीमुळे मेटेंचा अपघात - फडणवीस

निवेदन मांडताना उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे की, 'मेटे यांच्या अपघाती निधनाबाबत अनेक गोष्टी कार्यकर्ते आणि त्याच्या पत्नींनी माझाजवळ उपस्थित केल्या आहेत. मेटे चालक ओव्हरटेक करताना अपघात झाला. चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करताना ही घटना घडली. याबाबत विस्तृत माहिती समोर आल्यावरच बोलता येईल. मात्र गंभीर बाब म्हणजे मेटेंच्या चालकाने फोन केल्यानंतरही वेळेत मदत पोहचली नाही, असं म्हटलं गेलं आहे. मात्र चालकाने सांगितल्याप्रमाणे नवी मुंबई आणि रायगड पोलीस त्यांच्या रस्त्यात शोध घेत होते. पण अपघाताची लोकेशन कळू शकत नव्हती. त्यामुळे यंत्रणा बदलणं गरजेचं आहे.'

ही यंत्रणा चुकीची असून यंत्रणा बदलणं गरजेचं असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं. अपघात झाल्यानंतर थेट लोकेशन मिळणे सोपे होईल अशी यंत्रणा उभी करण्यावर आम्ही भर देणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं आहे. तसेच लेन सोडून चालणाऱ्या ट्रेलरवर कारवाई करणार, लेन सोडून जाणाऱ्या ट्रेलरची माहिती मिळाल्यास थेट कारवाई करता येईल, अशी यंत्रणा उभी करणं गरजेचं असून त्यावर आम्ही अत्याधुनिक टेक्नोलॉजीचा वापर करणार आहोत, असंही फडणवीस यांनी सांगितलंय.

रात्रीचा प्रवास टाळला पाहिजे - फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की, आपण रात्रीचा प्रवास टाळला पाहिजे. मी सभागृहात सांगतो की हा प्रवास टाळला पाहिजे. मीही रात्री प्रवास करतो. त्यामुळे आपण सर्वांनी रात्रीचा प्रवास टाळला पाहिजे कारण अपघात होण्याची शक्यता असते. विनायक मेटे यांच्या पत्नी म्हणाल्या की मी त्यांना रात्री प्रवास करु नका असं सांगितलं होतं, मात्र त्यांनी ऐकलं नाही.' याआधी विरोधी पक्षनेते अजित पवार, केंद्रीय गृहमंत्री नितीन गडकरी यांनीही रात्रीचा प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे.

'घातपात आहे की नाही अपघात याबाबत शंका'

फडणवीस यांनी म्हटलं आहे की, ड्रायव्हरचा जबाब बदलत आहे. घातपात आहे की नाही याची शंका उपस्थित होऊ नये म्हणून सीआयडी या प्रकरणाचा तपास करेल. या प्रकरणात शासकीय मदत मिळण्यास काही त्रूट झाली आहे का ? याचाही स्वतंत्र तपास केला जाईल. चौथी लेन सुरू करण्याबाबत मी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करीन, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. सरकाऱ्यांबाबत सकारात्मक पाऊले उचलेल.'

दुसरं कोणावर अशी वेळ येऊ नये - अजित पवार

यावर निवेदन देताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं आहे की, विनायक मेटे यांच्या पत्नीचा हा मला फोन आला होता. दुसरं कोणावर अशी वेळ येऊ नये यासाठी अंमलबजावणी केली पाहिजे. सध्याची मुंबई-पुणे एक्सप्रेसवर सर्वात मोठी वाहतूक कोंडी होत आहे. सध्या सहा लेन आहेत, त्या आठ लेन करण्यात याव्यात म्हणजे अवजड वाहतुकीला जागा मिळेल. अनेक ठिकाणी कॅमेरे बसवले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर दंड बसत आहेत. अनेक आमदार यांना लाखो रुपयांचा दंड बसला आहे. महिन्याभरात जे कमवलं तेवढं यात गमवावा लागतं, असं आमदारांचं म्हणणं आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Nashik : हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
 EPFO News: ईपीएफओ नवी सेवा लाँच करणार, केवायसीची प्रक्रिया सोपी होणार, लवकरच पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार
ईपीएफओ नवी सेवा लाँच करणार, KYC एका क्लिकवर होणार, लवकरच पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh On Walmik Karad : वाल्मिक कराडवर मकोका, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया काय?Sharad Pawar PC: मला टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी व्यक्ती नाही, अमित शहांना प्रत्युत्तरABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 14 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सWalmik Karad- Jyoti Mangal Jadhav यांचा संबंध काय, FC रोडवरील संपत्तीचं गौडबंगाल काय? Vastav EP 122

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Nashik : हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
 EPFO News: ईपीएफओ नवी सेवा लाँच करणार, केवायसीची प्रक्रिया सोपी होणार, लवकरच पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार
ईपीएफओ नवी सेवा लाँच करणार, KYC एका क्लिकवर होणार, लवकरच पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
कुत्रा आडवा आल्याने महिला मंत्र्यांची कार झाडावर आदळली, 6 एअर बॅग्ज उघडल्याने कर्नाटकच्या मंत्री बचावल्या!
कुत्रा आडवा आल्याने महिला मंत्र्यांची कार झाडावर आदळली, 6 एअर बॅग्ज उघडल्याने कर्नाटकच्या मंत्री बचावल्या!
Sharad Pawar : शरद पवारांनी अमित शाहांच्या तडीपारीच्या वेळचा मुद्दा उकरून काढला, म्हणाले, तेव्हा मुंबईत बाळासाहेबांकडे...
शरद पवारांनी अमित शाहांच्या तडीपारीच्या वेळचा मुद्दा उकरून काढला, म्हणाले, तेव्हा मुंबईत बाळासाहेबांकडे...
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
Walmik Karad: वाल्मिक कराडविरोधात कोर्टात सरकारी वकिलांनी काय युक्तिवाद केला? CID अधिकाऱ्याची महत्त्वाची माहिती
Walmik Karad: सीआयडी अधिकाऱ्याचं कोर्टात महत्त्वाचं वक्तव्य, वाल्मिक कराडची भारताबाहेर संपत्ती?
Embed widget