एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मी कुठेही गेलेलो नाही, अजूनही राष्ट्रवादीमध्येच : विजयसिंह मोहिते पाटील
मी अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबतच आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते पाटील यांनी केले आहे.
पुणे : मी कुठेही गेलेलो नाही, मी अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते पाटील यांनी केले आहे. मी पक्षासोबत आणि पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतच आहे, असेही मोहिते पाटील यांनी सांगितले आहे. आज पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटची 43 वी वार्षिक सर्वसाधारण सभा होती. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात शरद पवार आणि त्यांचे जुने सहकारी विजयसिंह मोहिते पाटील एकाच मंचावर आले होते.
याच कार्यक्रमात बोलताना विजयसिंह मोहिते पाटील म्हणाले की, मी अजूनही शरद पवारांसोबत, राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे, याआधी (लोकसभा निवडणुकीनंतर) मी शरद पवारांना दोन-तीन वेळा भेटलो आहे, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे पवार- मोहिते राजकीय संबंध सुधारत असल्याचे चित्र आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतले अनेक मातब्बर नेते पक्ष सोडून भाजपमध्ये गेले. त्याचदरम्यान मोहिते पाटीलही राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये जातील अशा, चर्चा होत्या. तसेच मोहिते-पवार संबंध आता फार बरे नसल्याचे बोलले जात होते. परंतु आज मोहिते-पवार एकचा मंचावर दिसले. तसेच आपण पवारांसोबत असल्याचे सांगून मोहितेंनी सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
Vijaysinh Mohite-Patil | मी अजूनही राष्ट्रवादीमध्येच : विजयसिंह मोहिते पाटील | ABP Majha
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विजयसिंह मोहिते पाटील यांचे पूत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजप प्रवेश केला. माढा मतदारसंघात रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा प्रचारही केला. निवडणुकीच्या तोंडावर विजयसिंह मोहिते पाटीलही भाजपच्या मंचावर पाहायला मिळाले. अकलूजमध्ये झालेल्या भाजपच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विजयसिंह मोहिते पाटलांचा सत्कार केला होता. त्यामुळे मुलगा भाजपमध्ये गेल्यानंतर आता विजयसिंह मोहिते पाटीलदेखील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या. परंतु आपण अजूनही राष्ट्रवादीतच आहोत, असे मोहिते पाटील यांनी आज स्पष्ट केले.
वाचा : विजयसिंह मोहिते पाटलांचा सत्कार करणे हे माझं भाग्य : नरेंद्र मोदी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रिकेट
निवडणूक
निवडणूक
Advertisement