एक्स्प्लोर
Advertisement
राष्ट्रवादीला आणखी एक धक्का, भास्कर जाधवांचा राजीनामा मंजूर, दुपारी शिवबंधन बांधणार
राष्ट्रवादी काँग्रेसचे गुहागर मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. काही वेळापूर्वी औरंगाबाद इथे जाऊन जाधव यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला.
औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे गुहागर मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. काही वेळापूर्वी औरंगाबाद इथे जाऊन जाधव यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. यावेळी जाधव यांच्यासोबत शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम, शिवसेना सरचिटणीस मिलिंद नार्वेकर आणि आमदार उदय सामंत उपस्थित होते.
विधानसभा अध्यक्षांनी जाधव यांचा राजीनामा मंजूर केला आहे. त्यामुळे जाधव आज (13 सप्टेंबर) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. दुपारी 2 वाजता मातोश्रीवर त्यांचा शिवसेना प्रवेश होईल.
भास्कर जाधव हे दोन वेळा गुहागर मतदारसंघातून निवडून आले आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर तब्बल 72 हजार 525 मतांसह विजय मिळवला होता. यावेळी त्यांनी भाजपच्या डॉ. विनय नातू (39 हजार 761 मतं) आणि शिवसेनेच्या विजय कुमार भोसले (32 हजार 83 मतं) यांचा पराभव केला होता.
व्हिडीओ पाहा
संबंधित बातम्या:
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
नांदेड
बॉलीवूड
Advertisement