एक्स्प्लोर
विधानपरिषदेच्या 6 जागांसाठी मतदान, काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी संघर्ष
मुंबई : पुणे, सांगली-सातारा, गोंदिया, नांदेड, यवतमाळ, जळगाव या मतदार संघातील विधान परिषदेसाठी आज मतदान होणार आहे. पुण्यासह सर्व ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात उभी ठाकली आहे.
विधान परिषदेच्या सहा जागांसाठी 30 उमेदवार रिंगणात असून मतमोजणी 22 तारखेला होणार आहे. मतदान होत असलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे.
सध्या चार मतदारसंघात राष्ट्रवादी तर प्रत्येकी एका मतदारसंघांत काँग्रेस आणि भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी संघर्षाचा फायदा शिवसेना, भाजपला होणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या लढती:
1. सांगली-सातारा
• काँग्रेस - मोहनराव कदम
• राष्ट्रवादी - शेखर गोरे
2. जळगाव
• भाजप- चंदू पटेल
• अपक्ष – विजय पाटील
3. पुणे
• राष्ट्रवादी - अनिल भोसले
• काँग्रेस - जिल्हा अध्यक्ष संजय जगताप
• भाजप - अशोक येनपुरे
4. यवतमाळ
• शिवसेना- भाजप युती - तानाजी सावंत
• काँग्रेस - शंकर बडे
5. नांदेड
• काँग्रेस – अमर राजुरकर
• अपक्ष- श्यामसुंदर शिंदे
6. गोंदिया
• राष्ट्रवादी – रविंद्र जैन
• भाजप - प्रणय फुके
• काँग्रेस – प्रफुल्ल अग्रवाल
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
रायगड
Advertisement