एक्स्प्लोर

विधानपरिषद निवडणूक बिनविरोध, भाजपच्या पृथ्वीराज देशमुखांचा अर्ज मागे

विधानपरिषदेसाठी भाजपकडून पृथ्वीराज देशमुख यांना दाखल केलेला अतिरिक्त अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 16 जुलैला होणारी निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नागपूर : विधानपरिषदेसाठी भाजपकडून पृथ्वीराज देशमुख यांनी दाखल केलेला अतिरिक्त अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 16 जुलैला होणारी निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून पृथ्वीराज देशमुख यांनी अर्ज मागे घेतल्याची चर्चा आहे. भाजपाला निवडणूक बिनविरोध करायची असल्यानंच देशमुखांनी अर्ज माघारी घेतल्याचं मंत्री गिरीश बापट यांनी सांगितलं. महादेव जानकर यांनी रासपकडून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याने भाजपने ऐनवेळी पृथ्वीराज देशमुख यांना मैदानात उतरवले होते. त्यामुळे विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत बारा अर्ज दाखल झाले. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली होती. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पृथ्वीराज देशमुखांनी अर्ज मागे घेतल्याने निवडणुकीच्या सर्व शक्यतांना पूर्णविराम लागला आहे. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 16 जुलैला मतदान होणार आहे, तर याच दिवशी सायंकाळी पाचनंतर मतमोजणी होईल. या निवडणुकीसाठी काँग्रेसचे दोन, राष्ट्रवादीचे एक, शिवसेनेचे दोन, रासप एक, शेकाप एक आणि भाजपचे चार उमेदवार रिंगणात आहेत.

पक्षनिहाय उमेदवार 

भाजप - भाई गिरकर, कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश पाटील, नीलय नाईक (वसंतराव नाईक यांचा नातू), राम पाटील रातोळीकर रासप - महादेव जानकर, शिवसेना - अनिल परब, मनिषा कायंदे काँग्रेस - शरद रणपिसे आणि डॉ. वजाहत मिर्झा राष्ट्रवादी काँग्रेस - बाबाजानी दुर्राणी शेकाप- जयंत पाटील

या सदस्यांचा कार्यकाळ संपणार भाजपचे भाई गिरकर, काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, संजय दत्त, शरद रणपिसे, शिवसेनेचे अनिल परब, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयदेव गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे नरेंद्र पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमरसिंह पंडित, शेकापचे जयंत पाटील, रासपचे महादेव जानकर यांची मुदत संपत आहे.

विधानपरिषद बलाबल - राष्ट्रवादी काँग्रेस : 22 काँग्रेस : 19 भाजप : 17 शिवसेना : 9 जदयू : 1 शेकाप : 1 रिपाइं : 1 अपक्ष : 7 रिक्त : 1 एकूण : 78

संबंधित बातम्या :

घोडेबाजार टाळणार, विधानपरिषदेच्या सर्व 11 जागा बिनविरोध होणार?

काँग्रेसतर्फे रणपिसे, वजाहत मिर्झांना विधानपरिषदेचं तिकीट

विधानपरिषदेची संधी डावलल्याने दीपक सावंत शिवसेनेवर नाराज?

महत्त्वाच्या बातम्या

संजय राऊतांचे FDA च्या अधिकाऱ्यांवर धक्कादायक आरोप, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाले तुमच्याकडे...
संजय राऊतांचे FDA च्या अधिकाऱ्यांवर धक्कादायक आरोप, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाले तुमच्याकडे...
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
Climate Week India 2026: हवामान सुरक्षेसाठी अन् पर्यावरणासाठी मोठा उपक्रम; ‘क्लायमेट वीक इंडिया’मध्ये पुण्यात खास कार्यक्रमांचे आयोजन
हवामान सुरक्षेसाठी अन् पर्यावरणासाठी मोठा उपक्रम; ‘क्लायमेट वीक इंडिया’मध्ये पुण्यात खास कार्यक्रमांचे आयोजन
माजी अग्निवीरांना शासकीय नोकरी, कोल्हापूर सर्किट बेंचसाठी 459 पदांना मंजुरी; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
माजी अग्निवीरांना शासकीय नोकरी, कोल्हापूर सर्किट बेंचसाठी 459 पदांना मंजुरी; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय

व्हिडीओ

Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ
Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
Tukaram Mundhe : 'आईचे दूध सर्वोत्तम' शिशु आहार उत्पादनांवर लिहिणं बंधनकारक, तुकाराम मुंढेंनी आकडेवारी सादर करत गंभीर वास्तव मांडलं... 
शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात स्तनपानाचं प्रमाण जास्त, शहरी महाराष्ट्रातील स्थिती अत्यंत भयावह : तुकाराम मुंढे
'ईव्हीएम असो वा मतदार यादी, दोन्हींमध्ये फेरफार, ज्ञानेश कुमारांनी निवडणूक फिक्स केली, अलीकडील सर्व निवडणुका बेकायदेशीर..' राहुल गांधींचा हल्लाबोल
'ईव्हीएम असो वा मतदार यादी, दोन्हींमध्ये फेरफार, ज्ञानेश कुमारांनी निवडणूक फिक्स केली, अलीकडील सर्व निवडणुका बेकायदेशीर..' राहुल गांधींचा हल्लाबोल
नाशिकच्या गोदाघाटावर अघोरी स्नान, महिलेच्या डोळ्यात लिंबाचा रस पिळला; लाखो रुपयांची फसवणूक, गुन्हा दाखल
नाशिकच्या गोदाघाटावर अघोरी स्नान, महिलेच्या डोळ्यात लिंबाचा रस पिळला; लाखो रुपयांची फसवणूक, गुन्हा दाखल
Gold : दुबईत सोनं भारतापेक्षा महाग की स्वस्त, दुबईतून किती ग्रॅम सोनं कोणताही कर न देता आणता येतं? 
दुबईत सोनं भारतापेक्षा महाग की स्वस्त, दुबईतून किती ग्रॅम सोनं कोणताही कर न देता आणता येतं? 
Ketan Agrawal and Siya Goyal : वाढदिवसाला सरप्राइज द्यायला पाठीवर SIYA नावाचा टॅटू काढला; साखरपुड्याला 28 ड्रेस अन् दागिन्यांचे सेट, केतनने सियासाठी काय-काय केलं?
वाढदिवसाला सरप्राइज द्यायला पाठीवर SIYA नावाचा टॅटू काढला; साखरपुड्याला 28 ड्रेस अन् दागिन्यांचे सेट, केतनने सियासाठी काय-काय केलं?
India Alliance on SIR Meeting: इंडिया आघाडीची SIR वर उद्या बैठक, ज्ञानेश कुमार हटाव मोहिमेला आणखी जोर येणार! पण अखिलेश यादव का येणार नाहीत, उद्धव ठाकरेंचं काय ठरलं?
इंडिया आघाडीची SIR वर उद्या बैठक, ज्ञानेश कुमार हटाव मोहिमेला आणखी जोर येणार! पण अखिलेश यादव का येणार नाहीत, उद्धव ठाकरेंचं काय ठरलं?
Embed widget