राज्यात 23 ठिकाणी सुरु होणार आधुनिक वाहन चाचणी केंद्र, अपघाताला कारणीभूत ठरणारे ब्लॅक स्पॉटही होणार दूर
Mumbai: राज्यात अपघाताच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. याच मुद्द्यावर आज सह्याद्री अतिथीगृह येथे रस्ता सुरक्षा विषयक उपाययोजना व सुधारित धोरण ठरविण्याबाबत बैठक झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
![राज्यात 23 ठिकाणी सुरु होणार आधुनिक वाहन चाचणी केंद्र, अपघाताला कारणीभूत ठरणारे ब्लॅक स्पॉटही होणार दूर Vehicle testing centers will be started at 23 places in the state, black spots that cause accidents will be removed राज्यात 23 ठिकाणी सुरु होणार आधुनिक वाहन चाचणी केंद्र, अपघाताला कारणीभूत ठरणारे ब्लॅक स्पॉटही होणार दूर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/17/9ab23476bed94a2164af53709f9953b91666016876537384_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mumbai: राज्यात अपघाताच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. याच मुद्द्यावर आज सह्याद्री अतिथीगृह येथे रस्ता सुरक्षा विषयक उपाययोजना व सुधारित धोरण ठरविण्याबाबत बैठक झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी राज्यात रस्त्यांवर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे घोषित करण्यात आलेले ब्लॅक स्पॉट संबंधित विभागांनी तातडीने दूर करावेत, असे निर्देश देतानाच राज्यात 23 ठिकाणी आधुनिक वाहन चाचणी केंद्र तसेच वाहन परवान्यासाठी स्वयंचलित वाहन चलन चाचणी पथ स्थापन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांनी आपल्या हद्दीतील ब्लॅक स्पॉट दूर करण्यासाठी समन्वय करावे. वर्षातून किमान तीन वेळा रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी जगातील सर्वांत स्मार्ट वाहतूक सुरक्षा व्यवस्था समृद्धी महामार्गावर कार्यान्वित करण्यात यावी, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.
राज्यभर हेल्मेट सक्तीची प्रभावी अंमलबजावणी करावी: मुख्यमंत्री शिंदे
यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्यात होणाऱ्या रस्ते अपघातांमध्ये जीवितहानीचे प्रमाण जास्त आहे. त्यात युवावर्गाचे वाढते प्रमाण चिंताजनक असून मानवी चुका टाळून अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना हाती घ्याव्यात. ज्या रस्त्यांवर वारंवार अपघात होतात त्या ठिकाणी ब्लॅक स्पॉट घोषीत झाले आहेत. ते तातडीने दूर करावेत. ज्या विभागांच्या अखत्यारित असे रस्ते, महामार्ग आहेत त्यांनी हे ब्लॅकस्पॉट दूर करण्यासाठी त्वरीत कार्यवाही करावी. शाळा, महाविद्यालयांमध्ये अभ्यासक्रमांद्वारे रस्ता सुरक्षेविषयी जाणिवजागृती करण्यात यावी, असे सांगतानाच राज्यभर हेल्मेट सक्तीची प्रभावी अंमलबजावणी करावी, वाहनचालक प्रशिक्षण संस्थांचे बळकटीकरण करावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.
वारंवार वाहतूक नियम मोडणाऱ्यांचा वाहन परवाना निलंबित करावा: उपमुख्यमंत्री फडणवीस
या बैठकीत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले आहते की, वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडाची कार्यवाही केली जाते. मात्र ज्या वाहनचालकांवर पाच ते सहा वेळा दंडाची कारवाई झाली आहे, त्यांचा वाहन परवाना काही दिवस, महिन्यांसाठी निलंबित करण्याची कारवाई कारवाई, असे निर्देश त्यांनी दिले. द्रुतगती महामार्गावर वेगाने मार्गिका बदलणाऱ्या (लेन जंप) वाहनचालकांवर कारवाईसाठी पथक नेमावे. या पथकाच्या माध्यमातून बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांवर नजर ठेवतानाच त्यांचा पाठलाग करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर अशी मोहिम तातडीने राबविण्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, अपघात रोखण्यासाठी ज्या स्मार्ट यंत्रणा जगातल्या रस्त्यांवर आहेत त्या यंत्रणा मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गावर बसविण्यात याव्या. यामुळे समृद्धी महामार्ग जगातला सर्वात स्मार्ट महामार्ग बनू शकेल.
दरम्यान, राज्यात 1004 ठिकाणी ब्लॅक स्पॉट असून सुमारे 72 टक्के अपघात अतिवेगामुळे होतात. तर ज्या ठिकाणी ब्लॅक स्पॉट घोषित आहे. तेथील अपघाताचे प्रमाण 53 टक्के असल्याचे सादरीकरणादरम्यान सांगितले. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी राज्यात सुमारे 6 कोटी जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. अपघात नियंत्रण आणि मदतीसाठी मृत्युंजय दूत प्रकल्प राबविला जात असून राज्यभर 5351 मृत्युंजय दूत नेमण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)