एक्स्प्लोर

VBA : मोदींना पराभूत करणे हाच आमचा अजेंडा; 'वंचित' ने जाहीर केला जागावाटपाचा फॉर्म्युला

Prakash Ambedkar : स्वबळावर लोकसभा निवडणूक लढण्याची ताकद सध्या कोणत्याही पक्षात नाही, त्यामुळे एकत्रित येऊन समसमान जागा लढवाव्यात असं आवाहन वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आलं आहे.

औरंगाबाद : नरेंद्र मोदी यांना सत्तेतून हटवणे हा आमचा मुख्य अजेंडा आहे असं सांगत वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला. महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने प्रत्येकी 12 जागांवर निवडणूक लढवावी असं वंचितकडून आवाहन करण्यात आलं आहे. 

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी या चार पक्षांमध्ये लोकसभेच्या 48 जागांची समान विभागणी करावी. प्रत्येकी 12 जागा घेऊन सर्व पक्षांनी एकत्रित मोदींचा पराभव करावा असा आमचा फॉर्म्युला असल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी सांगितले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी औरंगाबाद येथे वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारणीची बैठक पार पडल्यानंतर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. 

स्वबळावर निवडणूक लढण्याची एकाही पक्षाची ताकद नाही

लोकसभेमध्ये काँग्रेससहीत कोणत्याच पक्षाची स्वबळावर पंतप्रधान निवडून आणण्याची ताकद नाही. त्यामुळे जागा वाटपावरून रस्सीखेच करण्यात अर्थ नाही. विधानसभेत मुख्यमंत्री होण्याची ताकद या पक्षात आहे, त्यावेळी जागावाटपासाठी भांडू, पण आता ती वेळ नाही, असे त्यांनी म्हटले आहे. 

महाविकास आघाडीतील तीनही पक्ष केंद्रामध्ये  स्वबळावर पर्याय होऊ शकण्याच्या परिस्थितीत नाहीत. दोन पक्ष फुटीमुळे कमकुवत आहेत. काँग्रेसचा मागच्यावेळी एकच खासदार होता. त्यामुळे हे तीनही पक्ष पर्याय होऊ शकत नाही. मागच्या लोकसभा निवडणुकीतून अस दिसून आले आहे की, वंचित बहुजन आघाडीकडे मते आहेत. गेल्या पाच वर्षांत वंचित चा जनाधार वाढला असल्याचं रेखाताई ठाकूर यांनी स्पष्ट केले. 

मोदींना पराभूत करणे हाच आमचा अजेंडा

या निवडणुकीत मोदींना पराभूत करणे हाच आमचा अजेंडा आहे.  कोणीही अती आत्मविश्वास बाळगू नये, सध्या तशी परिस्थीती नाही, असा सल्ला रेखाताई ठाकूर यांनी महाविकास आघाडीतील पक्षांना दिला आहे. 

विरोधकांनी मोदींना सत्तेतून हरवले नाही तर जेलमध्ये जावे लागेल. सत्तेवर असताना छोट्या मोठ्या चुका होतात, त्यामुळे जेलमध्ये टाकण्याची आवश्यकता नसते. मोदी-शाह ज्या प्रमाणे वागत आहेत, ते योग्य नाही. 

योग्य काळात निर्णय व्हायला पाहिजे. उरलेले तीन पक्ष हे सवर्ण लोकांचे पक्ष आहेत, संविधान बदललं तर यांना फार फरक पडणार नाही. कारण सवर्ण समाजाला सुरक्षा देण्याचेच मोदीचे धोरण आहे. संविधानातील बदलामुळे शूद्र, अतिशूद्र, ओबीसी, भटके विमुक्त, आदिवासी, दलीत, मुस्लिम, वंचितांना आणि अल्पसख्याकांच्या सुरक्षिततेवर परिणाम होईल. म्हणून वंचितांच्या आणि अल्पसंख्यांकांच्या सुरक्षिततेसाठी आम्हाला निर्णय घ्यावा लागेल असा इशाराही रेखाताई ठाकूर यांनी यावेळी दिला. 

प्रत्येकाने समसमान जागांवर लढावं

प्रत्येकी 12 जागांच्या फॉर्म्युलामध्ये आमची भूमिका अशी आहे की, आमच्या वाट्याला आलेल्या 12 जागांपैकी कमीत कमी ३ उमेदवार हे मुस्लीम राहतील. ज्या समुहासाठी वंचित बहुजन आघाडी राजकीय भूमिका घेत आहे. ते जे वंचित समूह ओबीसी, व्ही.जे.एनटी यांच्यासाठी देखील योग्य प्रतिनिधित्व आम्ही देऊ जे इतर प्रस्थापित पक्ष देत नाहीत. 

आमची भावना हीच आहे की सर्वांनी एकत्रित येऊन लढल पाहिजे. केंद्रात मोदींना पराभूत करणं हा अजेंडा समोर ठेवून लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे हिच वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारणीची भूमिका असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले. 

सगळ्यांनी एकत्र आल पाहिजे आणि समसमान वाटणी करून एका ध्येयाने लढल पाहिजे. यात जर वेळ वाया गेला तर आम्हाला वंचित समूहांसाठी वेगळी भूमिका घ्यावी लागेल. ती घ्यायची वेळ आमच्यावर आणू नका असे वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी सांगितले.

आमची भूमिका ही आहे की, वंचित बहुजन आघाडीची राज्यभरात मोठी ताकद आहे जी मागच्या पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 2019 मध्ये बूथ लेवलपर्यंत संपर्क नव्हता, आज गाव खेड्यापर्यंत आमच्या शाखा आहेत.  दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक, ओबीसी आमच्याकडे आहेत. कुठलंही भावनिक वातावरण नसताना लाखांच्या सभा आमच्या होतात. आम्ही अनेक जिल्ह्यांत आणि पाचही विभागात सिद्ध केलं आहे. रस्त्यावर येऊन आम्ही ताकद दाखवली आहे. आता जागेवरून भांडण्यापेक्षा आपण एका धेय्यासाठी एकत्र येऊन समसमान जागा वाटप करू आणि ताकदीने मोदींचा पराभव करू अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली. 

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Election : भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?

व्हिडीओ

Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Pradnya Satav Join BJP : राजीव सातव यांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठीच भाजपमध्ये प्रवेश - प्रज्ञा सातव
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election : भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
Success Story : तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
Epstein files India: अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
Gold Rate : भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
Nagpur Butibori MIDC : टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
Embed widget