Valentine day 2022 :  कोरोनाने (coronavirus) सलग दोन वर्षे भल्याभल्यांचं कंबरडं मोडलं. प्रेमाचा प्रतीक असणारा गुलाब (roses) फुलविणारा शेतकरी (farmers) तर अक्षरशः मेटाकुटीला आला. पण याच कोरोनाने (coronavirus) आता या गुलाब उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन आणलेत. निर्यातीला पसंती देणाऱ्या या शेतकऱ्यांना इतिहासात पहिल्यांदाच भारतीय बाजारपेठेत उच्चांकी दर मिळाला आहे. त्यामुळे गुलाब उत्पादक शेतकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. पुण्याच्या मावळमधील पंडित शिकारे हे त्यांनी फुलविलेला गुलाब सलग पंचवीस वर्षे निर्यात करतात. एक एकर पासून त्यांनी सुरू केलेली ही शेती आज दहा एकरात विस्तारलेली आहे. याच क्षेत्रात बहरलेला गुलाब ते भारतासह परदेशी बाजारात खास व्हॅलेंटाईन डे साठी पाठवितात. आत्तापर्यंत ते सत्तर टक्के परदेशात अन तीस टक्के भारतात विक्री करायचे. पण कोरोनामुळं निर्यातीवर निर्बंध आले, अन सलग दोन वर्षे त्यांना मोठा फटका बसला. पण यंदा याच कोरोनाने शिकारेंना भारतीय बाजारपेठेत मालामाल केलंय. आज त्यांच्या प्रति गुलाबाला 18 ते 21 रुपये असा आजवरचा सर्वात उच्चांकी बाजारभाव मिळालाय. म्हणूनच यंदा ते तब्बल सत्तर टक्के गुलाब भारतातच विक्री करतायेत. 

इतिहासात पहिल्यांदाच मिळाला उच्चांकी भाव

व्हॅलेंटाईन डे निमित्त सलग पंचवीस वर्षे गुलाब निर्यात करणारे पंडित शिकारे हे आत्तापर्यंत दहा एकर क्षेत्रातील गुलाब हे 70 टक्के परदेशात आणि 30 टक्के भारतात विक्री करायचे. पण कोरोनामुळं निर्यातीवर निर्बंध आले, अन सलग दोन वर्षे त्यांना मोठा फटका बसला. पण यंदा याच कोरोनाने शिकारेंना भारतीय बाजारपेठेत मालामाल केलंय. आज त्यांच्या प्रति गुलाबाला 18 ते 21 रुपये असा आजवरचा सर्वात उच्चांकी बाजारभाव मिळालाय. म्हणूनच यंदा ते तब्बल सत्तर टक्के गुलाब भारतातच विक्री करतायेत. हा गुलाब शेतकऱ्यांना परदेशात पाठवायचा असेल तर विमान कंपन्या त्यांच्याकडून प्रति किलो दर आकारतात. फेब्रुवारी 2020मध्ये हाच दर प्रति किलो 150 ते 200 रुपये इतका होता. मात्र त्यानंतर कोरोनाने जगभरात थैमान घातलं अन विमानसेवा विस्कळीत झाली. आज ही विमानांची उड्डाण अत्यल्प आहेत. त्यामुळं विमानाचे तिकीट महागलेत. आजच्या दिवशी या गुलाबाला प्रति किलो 400 ते 450 रुपोये प्रति किलो मोजावे लागतायेत. हीच बाब शेतकऱ्यांच्या लक्षात आली म्हणूनच आज हा गुलाब उत्पादक शेतकरी भारतीय बाजारपेठेकडे वळलाय.

..तेव्हा अठ्ठावीस लाखांची उलाढाल झाली होती

एक एकर क्षेत्रापासून मी गुलाब शेती सुरू केली. तेंव्हा अठ्ठावीस लाखांची उलाढाल झाली होती. निर्यातीमुळं हे शक्य झालं अन मी त्यावरच भर दिला. कोरोना येण्यापूर्वी दहा एकर क्षेत्रातील सत्तर टक्के गुलाब निर्यात अन तीस टक्के देशांतर्गत बाजारात विक्री केला. पण कोरोना आला अन दोन वर्षे संकटात गेली. अनेक शेतकऱ्यांनी तर गुलाब शेती सोडली. परिणामी आज उत्पादन घटले अन भारतीय बाजारात प्रति गुलाबाला 18 ते 21 रुपयांचा भाव मिळू लागला. दुसरीकडे कोरोनामुळंच विमानांच्या तिकिटात वाढ झाली. त्यामुळं परदेशात सर्व खर्च वगळता प्रति नग 12 ते 15 रुपये हातात पडू लागले. गेल्या पंचवीस वर्षात भारतीय बाजारपेठेत असे आनंदाचे दिवस कधीच पाहिले नव्हते. 

गुलाबाला प्रति किलो 400 ते 450 रुपये प्रति किलोचा भाव

हा गुलाब शेतकऱ्यांना परदेशात पाठवायचा असेल तर विमान कंपन्या त्यांच्याकडून प्रति किलो दर आकारतात. फेब्रुवारी 2020मध्ये हाच दर प्रति किलो 150 ते 200 रुपये इतका होता. मात्र त्यानंतर कोरोनाने जगभरात थैमान घातलं अन विमानसेवा विस्कळीत झाली. आज ही विमानांची उड्डाण अत्यल्प आहेत. त्यामुळं विमानाचे तिकीट महागलेत. आजच्या दिवशी या गुलाबाला प्रति किलो 400 ते 450 रुपये प्रति किलो मोजावे लागतायेत. हीच बाब शेतकऱ्यांच्या लक्षात आली, म्हणूनच आज हा गुलाब उत्पादक शेतकरी भारतीय बाजारपेठेकडे वळलाय. विमान कंपन्यांनी वाढविलेले दर आणि उत्पादनात झालेली घट ही गुलाब उत्पादक शेतकऱ्यांच्या पथ्यावर पडली. म्हणूनच आज भारतातील व्यावसायिक शेतकऱ्यांच्या मागे लागून गुलाब खरेदी करतायेत. भारतीय बाजारात मावळ मधील गुलाब पुरवठा करणाऱ्या एका कंपनीचे व्यवस्थापक सतीश आंबोरे म्हणतात, आजवर हा गुलाब शेतकरी आमच्या पाठीमागे लागायचा. पण गुलाबाची आवक इतकी असायची की आम्ही या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करायचो. पण कोरोनाने परिस्थिती बदलून टाकली. अनेक शेतकऱ्यांनी गुलाब शेती सोडल्याने उत्पादन घटलं, परिणामी भारतातून मोठी मागणी वाढली आहे. त्यामुळे आज आम्हाला या शेतकऱ्यांच्या मागे फिरावं लागतंय. 

गुलाब उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन

भारतीय बाजारपेठेचा हा चढता आलेख, गुलाब उत्पादक शेतकऱ्यांना सुखद धक्का देतोय. इंडियन सोसायटी ऑफ फ्लोरिकल्चर प्रोफेशनल्सचे अध्यक्ष प्रवीण शर्मा तर अचंबित झाले. ते म्हणतात इंडियन सोसायटी ऑफ फ्लोरिकल्चर प्रोफेशनल्सची स्थापना ही निर्यातीला पाठबळ देण्यासाठी करण्यात आली होती. याद्वारे देशातील शेतकऱ्यांचे दिवस पालटले. पण आजच्या स्थितीचा आम्ही स्वप्नात ही विचार केला नव्हता. जे दिवस आज भारतीय बाजाराने तेच कायम राहिले तर हा शेतकरी निर्यातीचा विचार मनातून सोडून देईल. यामुळे देशाच्या अर्थकारणाला आणखी गती मिळेल. असा विश्वास शर्मानी व्यक्त केला. परदेशातून गुलाबी नोटा मिळत असल्याने 1991साली शेतकरी निर्यातीकडे वळला. पण यंदा भारतीय बाजारपेठेत गुलाबाला मिळालेला उच्चांकी दर आजवर परदेशात ही मिळाला नाही. कोरोनानंतरचा हा बदल गुलाब उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन देणारा ठरतोय अन् भारताच्या दृष्टीने ही खूपच सकारात्मक बाब आहे.

कोरोना येण्यापूर्वी अन् आल्यानंतर 'व्हॅलेंटाईन डे'साठी अशी उलाढाल 

वर्ष निर्यात देशांतर्गत 
2019 21.15 कोटी 10 कोटी
2020 20.16 कोटी 12 कोटी
2021 15.30 कोटी 15 कोटी
2022 7 ते 8 कोटी 20 ते 22 कोटी

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha