Valentines Week : फेब्रुवारी महिना प्रेमाला समर्पित आहे. 7 फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन वीक (Valentines Week) सुरू होत आहे. या दिवसांत छान गुलाबी थंडीचे हवामान असते. फेब्रुवारी महिना प्रेमिकांना प्रेम व्यक्त करण्याची संधी आणि वेळ दोन्ही देतो. आठवडाभर म्हणजे सात दिवस प्रेमी युगुल आपले प्रेम वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त करतात. प्रेम व्यक्त करण्यासाठी जे काही आवश्यक आहे, ते या सात दिवसांत व्यक्त केलं जातं आणि त्यानंतर येतो तो खास दिवस ज्याची प्रेमी वर्षभर वाट पाहत असतात, ज्याला 'व्हॅलेंटाईन डे' अर्थात 'प्रेम दिवस' असेही संबोधले जाते. आता तुम्ही देखील नव्याने प्रेमात पडला असाल आणि प्रेम व्यक्त करण्याची तयारी करत असाल, तर जाणून घ्या या आठवड्यात कोणता दिवस कसा साजरा कराल..


रोज डे (Rose Day) : 7 फेब्रुवारी


प्रेमाची अभिव्यक्ती गुलाबाशिवाय अपूर्ण आहे. व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात गुलाबाच्या सुगंधाने आणि सौंदर्याने होते. या दिवशी प्रेमी युगुल एकमेकांना लाल गुलाब देतात आणि आपले प्रेम व्यक्त करतात. केवळ कपल्सनी युगुलांनीच रोज डे साजरा करावा असे नाही, या दिवशी तुम्ही तुमच्या प्रियजनांना गुलाब देऊन खास अनुभव देऊ शकता. पिवळे किंवा पांढरे गुलाब देऊन तुम्ही तुमच्या मित्रांना सहज खुश करू शकता.


प्रपोज डे (Propose Day) : 8 फेब्रुवारी


व्हॅलेंटाईन वीकचा दुसरा दिवस ‘प्रपोज डे’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी तुम्ही तुमच्या बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडला हटके प्रपोज करून स्पेशल फिलिंग देऊ शकता.


चॉकलेट डे (Chocolate Day) : 9 फेब्रुवारी


चॉकलेट खायला कोणाला आवडत नाही? पण, मुलांपेक्षा मुलींना चॉकलेट जास्त आवडते. या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीला चॉकलेट देऊन नात्यात गोडवा वाढवू शकता.


टेडी डे (Teddy Day) : 10 फेब्रुवारी


मुलींना टेडी बेअरचे भारी वेड असते. त्यामुळे टेडी डेच्या दिवशी तुमच्या मैत्रिणीला एक छान टेडी बेअर भेट देऊ शकता.


प्रॉमिस डे (Promise Day): 11 फेब्रुवारी


प्रत्येक नात्यात अनेक वचने असतात, काही पूर्ण होतात, काही अपूर्ण राहतात. या प्रॉमिस डे, तुम्ही तुमच्या जोडीदाराला छोटी-छोटी वचने देऊ शकता, पण वचने अशी असावीत की, ती तुम्ही पाळू शकता.


हग डे (Hug Day) : 12 फेब्रुवारी


प्रॉमिस डेनंतर, या प्रेमळ आठवड्यात ‘हग डे’ साजरा केला जातो. आपली प्रिय व्यक्ती असो वा खास मित्र-मैत्रीण जेव्हाही भेटतात तेव्हा ते प्रथम एकमेकांना मिठी मारतात. परंतु या दिवशीची मिठी मात्र खास असते. त्यात भावभावना असतात. काहीही न बोलता, काहीही न ऐकता, प्रिय व्यक्तीला मिठी मारून तुम्ही तुमचे प्रेम व्यक्त करू शकता.


किस डे (Kiss Day) : 13 फेब्रुवारी


या नंतर येतो ‘किस डे’. या खास दिवशी तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीला आपल्या मनातील भावना आणखी उत्कटतेने सांगू शकता.


व्हॅलेंटाईन डे (Valentines Day) : 14 फेब्रुवारी


संपूर्ण आठवडाभर विविध प्रकारे प्रेम व्यक्त केल्यानंतर, 14 फेब्रुवारी हा दिवस येतो, जेव्हा दोन खास व्यक्ती त्यांचा संपूर्ण दिवस एकमेकांसोबत साजरा करतात. त्यांच्या प्रेमाला आणखी बहर यावा, दिवस स्पेशल वाटावा म्हणून खास नियोजन करतात.  


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha