Rose Day 2022 : फेब्रुवारी हा प्रेमाचा महिना असतो. 7 फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन वीक (Valentines Week) सुरू होत आहे. हा आठवडा प्रेमिकांना प्रेम व्यक्त करण्याची संधी देतो. वर्षभर प्रेमी युगुल या आठवड्याची वाट बघत असतात. दरवर्षी 7 फेब्रुवारी हा दिवस 'रोज डे' म्हणून साजरा केला जातो. या दिवसानिमित्त बाजारात लाल, पांढऱ्या, पिवळ्या, गुलाबी रंगाचे गुलाब उपलब्ध असतात.
का साजरा केला जातो 'रोज डे'
प्रेमाची अभिव्यक्ती गुलाबाशिवाय अपूर्ण आहे. व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात गुलाबाच्या सुगंधाने आणि सौंदर्याने होते. या दिवशी प्रेमी युगुल एकमेकांना लाल गुलाब देतात आणि आपले प्रेम व्यक्त करतात. या दिवशी प्रियजनांना गुलाब देऊन प्रेम व्यक्त करता येते. तसेच पिवळे किंवा पांढरे गुलाब देऊन तुम्ही तुमच्या मित्रांना सहज खुश करू शकता. यादिवशी आपल्या आवडत्या व्यक्तीला गुलाब देऊन आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या जातात. आपल्या प्रेमाच्या भावना व्यक्त करण्यासाठी गुलाबाचा वापर करण्यात येतो. प्रेमात पडलेल्यांसाठी गुलाबाचं महत्व मोठं असतं. कारण त्याचं आयुष्यच गुलाबी झालेलं असतं.
गुलाबाचे महत्त्व काय आहे?
भारतात प्राचीन काळापासून, अगदी राजा-महाराजांपासून प्रेम व्यक्त करण्यासाठी गुलाबाचा वापर करण्यात येत आहे. आपल्या मनातील भावना शब्दात व्यक्त करता येत नसतील तरीही आपल्या आवडत्या व्यक्तीला केवळ गुलाब दिलं तरी भावना पोहचतात. यामध्ये लाल रंगाच्या गुलाबाचा वापर केला जातो. त्या व्यतिरिक्त इतर अनेक रंगाचे गुलाब अनेक भावना व्यक्त करण्यासाठी वापरतात. गुलाबाच्या रंगाप्रमाणे आपल्या मनातील भावनाही बदलतात.
संबंधित बातम्या
Romantic Destination : ‘व्हॅलेंटाईन डे’ला फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? मग, ‘ही’ ठिकाणं ठरतील बेस्ट ऑप्शन!
Valentines Week 2022 : ‘व्हॅलेंटाईन्स वीक’ साजरा करायचाय? मग, जाणून घ्या प्रत्येक दिवस कसा साजरा कराल..
NeoCoV Variant: डेल्टा-ओमायक्रॉननंतर आलाय NeoCov, जाणून घ्या या विषाणूबद्दल महत्त्वाच्या गोष्टी..
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha