अमरावती : अमरावतीमधील दर्यापूर (Amravati Daryapur) तालुक्यातील धुंगशी बॅरेज मध्यम प्रकल्पात पाय घसरून पडलेल्या मायलेकीचा करुण अंत झाला आहे. यातील वडिलांना मात्र वाचवण्यात आलं आहे. प्रिया गौरव तायडे (28) आणि मुलगी आराध्या (2 वर्ष) अशी मृतांची नावे असून गौरव सुरेश तायडे (32) हे थोडक्यात बचावले.
अकोला जिल्ह्याच्या मुर्तीजापूर तालुक्यातील पारद येथील रहिवासी गौरव तायडे पत्नी प्रिया आणि मुलगी आराध्या हिला दुचाकीवर बसवून नदीपलीकडील दर्यापूर तालुक्यातील धामोडी या गावी मावशीच्या अंत्यविधी कार्यक्रमात गेले होते.
अंत्यविधी आटोपून काल 6 फेब्रुवारी ते दुचाकीने परत गावी जात होते. दरम्यान पुंगशी बॅरेज मध्यम प्रकल्पाजवळ गेट बंद असल्याने गौरव हे चौकीदार संजय भाऊराव गवई यांना चावी मागण्यासाठी गेले. त्यावेळी चिमुकली आराध्या धरणाच्या भीतीजवळ गेट बाजूला गेली.
त्याचवेळी आराध्या चिमुकलीचा पाय घसरून पाण्यात पडली, त्याला वाचविण्यासाठी तिची आई धावली. असता त्या सुद्धा भिंतीखालील उतारावरून पाय घसरून पाण्यात पडल्या. दरम्यान चावी घेण्यासाठी गेलेले वडिलांना आवाज आल्याने ते सुद्धा पत्नी आणि मुलीला वाचविण्यासाठी धावले.
त्यानंतर चौकीदारांनी आरडाओरड करून नागरिकांना बोलाविले, यावेळी काही युवकांनी दोर फेकून वाचविण्याचा प्रयत्न केला. पण यात माय-लेकी पाण्यात बुडाल्या तर वडील गौरव याने दोर पकडल्याने त्याचे प्राण वाचले.
मृतक प्रिया तायडे आणि तिची मुलगी आराध्या यांच्या मृत्यूबद्दल प्रियाचे वडील विठ्ठल फुंडकर यांनी शंका उपस्थित करून पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- अपघातग्रस्ताला रुग्णालयात दाखल केल्यास मिळणार बक्षिस, 'या' शहरात वाहतूक पोलिसांचा नवा उपक्रम
- Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये 28 मतदारसंघाची पुनर्रचना, 'या' ठिकाणी वाढणार जागा ; पुनर्रचना आयोगाचा प्रस्ताव
- UP Election 2022: पंतप्रधान मोदी प्रचारासाठी रणांगणात, उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये आज सभा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha