एक्स्प्लोर

संजय राऊतांविरोधात ईडीकडनं आरोपपत्र दाखल, सोमवारी सत्र न्यायालयात सुनावणी

sessions court : संजय राऊतांविरोधात ईडीकडनं आरोपपत्र दाखल, पत्राचाळ घोटाळाप्रकरणी तपासयंत्रणेनं दाखल केलं पुरवणी आरोपपत्र

Update on Sanjay Raut from sessions court : मुंबईतील गोरेगाव येथील पत्राचाळ गैरव्यवहाराप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) संजय राऊत यांच्याविरोधात प्रकरणातील पुरवणी आरोपपत्र दाखल केलं आहे. या पुनर्विकासाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात संजय राऊत यांचा केवळ सहभाग नसून त्यांनी यात महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी पडद्याआड राहून काम केल्याचे पुरावे सापडल्याचं ईडीनं या आरोपपत्रात नमूद केलेलं आहे. याशिवाय संजय राऊतांच्या जामीनाला विरोध करत ईडीनं स्पष्ट केलंय की, राऊत हे एक राजकिय व्यक्तिमत्व असल्यानं बाहेर येताच ते पुराव्यांशी छेडछाड करू शकतात, त्यामुळे तापस महत्त्वाच्या टप्यावर असताना त्यांना जामीन देणं योग्य ठरणार नाही. 

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना 31 जुलै रोजी रात्री उशिरानं ईडीनं अटक केली होती. त्यानंतर राऊतांना प्रथम ईडी आणि त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, तेव्हापासून राऊत आर्थर रोड कारागृहात आहेत. राऊत यांनी जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयात धाव घेतली आहे. त्या याचिकेवर न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्यासमोर प्राथमिक सुनावणी पार पडली असता सोमवारी संजय राऊतांची पुढची रिमांड आणि जामीन अर्जावर एकत्रित सुनावणी होण्याची शक्यता आहे.

संजय राऊत यांच्यावरील कारवाई द्वेषातून किंवा राजकीय सूडबुद्धीनं झालेली नसल्याचं स्पष्ट करत राऊतांचा दावा ईडीनं नाकारला आहे. संजय राऊतांनी आपल्या विश्वासू प्रवीण राऊतसह याप्रकरणी मुख्य भूमिका बजावताना पडद्याआडून काम केलेलं आहे. या प्रकरणी तपास अजून सुरू असून राऊत हे राजकारणातील अत्यंत प्रभावशाली आणि शक्तिशाली व्यक्ती आहेत. त्यामुळे ते जामिनावर सुटल्यास पुराव्यांशी छेडछाड करू शकतात आणि अशा प्रकरणात साक्षीदारांना धमकावल्याची अनेक उदाहरणं आहेत, असा दावा करत ईडीनं संजय राऊतांच्या जामीन अर्जाला तीव्र विरोध केला आहे. 

संजय राऊत यांची पत्नी वर्षा  राऊत यांच्या खात्यातील 1 कोटी 8 लाखाचा व्यवहारदेखील संशयास्पद असल्याचे ईडीने कोर्टाला सांगितले. अशाच प्रकारे अनेक संशयास्पद आर्थिक व्यवहार ईडीला सापडले आहेत. या संशयास्पद व्यवहाराचा तपास ईडीला करायचे असल्याचे ईडीच्या वकिलांनी कोर्टाला सांगितले. संजय राऊत हे प्रभावशाली राजकीय व्यक्तीमत्व असल्याने तपासात आणि साक्षीदारांवर ते प्रभाव टाकू शकतात असे ईडीच्या वकिलांनी कोर्टाला सांगितले. या प्रकरणी एका महिला साक्षीदाराला त्यांनी धमकी दिली असल्याची बाब ईडीने कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे तपास पूर्ण होईपर्यंत राऊत यांना जामीन नाकारण्यात यावा अशी मागणी ईडीच्या वकिलांनी केली. 

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime Walmik Karad: बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड; वाल्मीक कराडला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा धक्का, पुनर्विलोकन याचिका कोर्टाने फेटाळली
बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड; वाल्मीक कराडला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा धक्का, पुनर्विलोकन याचिका कोर्टाने फेटाळली
Maharashtra Breaking LIVE: सोनम वांगचुक यांना 'जंतर मंतर'वरुन हटवलं, दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई
Maharashtra Breaking LIVE: सोनम वांगचुक यांना 'जंतर मंतर'वरुन हटवलं, दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई
NEET Exam Paper: रात्रंदिवस अभ्यास केला, आजारी पडला, जेवलाही नाही, कित्येक रात्री...; 522 गुण मिळणे अपेक्षित, मात्र स्कोर कार्डवर अवघे 95 गुण, बीडच्या सोहमच्या आई वडिलांचा संताप
रात्रंदिवस अभ्यास केला, आजारी पडला, जेवलाही नाही, कित्येक रात्री...; 522 गुण मिळणे अपेक्षित, मात्र स्कोर कार्डवर अवघे 95 गुण, बीडच्या सोहमच्या आई वडिलांचा संताप
MP Merger : ठाकरे गटाचे 6 अन् ममता बॅनर्जींचे 20 बंडखोर खासदार, लोकसभा अध्यक्ष आज विलीनीकरणावर अंतिम निर्णय देणार?
ठाकरे गटाचे 6 अन् ममता बॅनर्जींचे 20 बंडखोर खासदार, लोकसभा अध्यक्ष आज विलीनीकरणावर अंतिम निर्णय देणार?

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk Wife : दिल्ली पोलिसांनी बळजबरीने सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं; आता पत्नीने मौन सोडलं, म्हणाल्या, 'माझ्या संमतीशिवाय....
दिल्ली पोलिसांनी बळजबरीने सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं; आता पत्नीने मौन सोडलं, म्हणाल्या, 'माझ्या संमतीशिवाय....
देशात संतापाचा उद्रेक, मागण्यांवर चर्चा नाही, बळाच्या जोरावर जंतर मंतरवरून आंदोलन मोडीत काढलं; सोनम वांगचूकना सकाळीच उचलल्यानंतर विरोध करणाऱ्या आंदोलकांना सुद्धा हाकललं
देशात संतापाचा उद्रेक, मागण्यांवर चर्चा नाही, बळाच्या जोरावर जंतर मंतरवरून आंदोलन मोडीत काढलं; सोनम वांगचूकना सकाळीच उचलल्यानंतर विरोध करणाऱ्या आंदोलकांना सुद्धा हाकललं
BCCI On Rohit Sharma Retirement: रोहित शर्मा 2027 च्या वर्ल्डकपआधीच वनडेमधून निवृत्ती घेणार? काय खरं, काय खोटं? BCCI नं स्पष्टच सांगितलं...
रोहित शर्मा 2027 च्या वर्ल्डकपआधीच वनडेमधून निवृत्ती घेणार? काय खरं, काय खोटं? BCCI नं स्पष्टच सांगितलं...
Sonam Wangchuk Hunger Strike: दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून का हटवले? अखेर समोर आलं मोठं कारण
दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून का हटवले? अखेर समोर आलं मोठं कारण
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे, राम रक्षा कवच त्यांच्या कामाचं नाही, श्राप...'
उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे, राम रक्षा कवच त्यांच्या कामाचं नाही, श्राप...'
Nashik Crime News: नाशकात PG मध्ये राहणाऱ्या तरुणीला भररस्त्यात संपवलं; कायद्याच्या बालेकिल्ल्यात धक्कादायक घटना!
नाशकात PG मध्ये राहणाऱ्या तरुणीला भररस्त्यात संपवलं; कायद्याच्या बालेकिल्ल्यात धक्कादायक घटना!
Maharashtra Weather Update : राज्यातील पावसाबाबत मोठी अपडेट; चार दिवस कोकणसह घाटमाथ्यावर मुसळधार, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाता अंदाज
राज्यातील पावसाबाबत मोठी अपडेट; चार दिवस कोकणसह घाटमाथ्यावर मुसळधार, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाता अंदाज
Abhijeet Dipke : सोनम वांगचूक यांना 'जंतर मंतर'वरुन दिल्ली पोलिसांनी हटवलं, अभिजीत दीपके यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
सोनम वांगचूक यांना 'जंतर मंतर'वरुन दिल्ली पोलिसांनी हटवलं, अभिजीत दीपके यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले "आंदोलकांना मारहाण अन् बळजबरीने..."
Embed widget