एक्स्प्लोर

'अटी लावा पण मंदिरं उघडा', मंदिरं उघडण्याचा निर्णय न झाल्याने भाविकांची नाराजी

राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी अनलॉक 5 नंतर आता भाविकांना अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे. दसऱ्यापर्यंत तरी मंदिरांची दारे उघडण्याची शक्यता धूसर झाल्याने भाविकांच्या तीव्र नाराजी आणि निराशा आहे.

पंढरपूर : राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी अनलॉक 5 नंतर आता भाविकांना अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे. दसऱ्यापर्यंत तरी मंदिरांची दारे उघडण्याची शक्यता धूसर झाल्याने भाविकांच्या तीव्र नाराजी आणि निराशा आहे. वास्तविक अनलॉक 5 मध्ये मंदिराबाबत सकारात्मक निर्णय होईल अशा आशेवर राज्यभरातील भाविक निर्णयाची वाट पाहत होते. मात्र रेस्टारंट बार , हॉटेल उघडायला परवानगी देणाऱ्या ठाकरे सरकारने मंदिराची दारे मात्र बंदच ठेवल्याने भाविक आणि वारकरी संप्रदायात मोठी नाराजी आहे.

अनलॉक 5 मध्ये हॉटेल व इतर व्यवसायांना ज्या पद्धतीने अटी घातल्या तश्या अटी मंदिरातही घालून दारे उघडावीत अशी आता भाविक मागणी करीत आहेत. कोरोनाच्या संकटकाळात राज्यातील सर्वच धर्माच्या नागरिकांनी धार्मिकस्थळांबाबत खूप सकारात्मक भूमिका घेत सरकारला पाठिंबा दिला होता. आता मात्र धार्मिक स्थळांची दारे बंद होऊन सहा महिने उलटूनही शासन हि दारे उघडण्यास तयार नसल्याने भाविकांच्या भावना तीव्र आहेत.

सध्या पंढरपूरमध्ये वारकरी संप्रदायात महत्वाचा मनाला जाणारा आणि 3 वर्षातून येणार अधिक महिना सुरु आहे. राज्यभरातून रोज हजारो भाविक पंढरपुरात येऊन नामदेव पायरी आणि कळसाचे बाहेरून दर्शन घेत असून चंद्रभागेच्या स्नानावर समाधान मानीत आहेत. कोरोनाचे वाढते संकट पाहता शासनाने मंदिरे उघडण्याची मानसिकता नसल्याचे पाहून मुंबई उच्य न्यायालयानेही एका जनहित याचिकेवर मंदिर उघडण्याबाबत हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे.

Unlock 5 | पाचव्या अनलॉकसाठी राज्य सरकारकडून गाईडलाईन्स जारी; हॉटेल्स, फूड कोर्ट, रेस्टॉरंट्स सुरु होणार

मात्र अशा संकटकाळी देवाच्या दर्शनाने सकारात्मक ऊर्जा तयार होईल जी या रोगाशी लढण्यास मदत करेल अशी भाविकांची भूमिका आहे. अधिक महिना संपल्यानंतर अश्विन महिन्यात नवरात्र येणार असून या काळात मंदिरे उघडण्यास राज्यातील काही मोठ्या देवस्थानाकडून नकारात्मक भूमिका समोर आल्याने दसऱ्यापर्यंत मंदिरे उघडण्याची शक्यता कमी दिसत आहे.

एकाबाजूला राजकीय पक्षांनी मंदिरे उघडण्याबाबत आंदोलने केली तरी शासनावर याचा काही फरक पडला नसला तरी आता राज्यातील भाविक कोरोनाच्या कडक नियमाचे पालन करीत मंदिरे उघडण्याच्या करीत असलेल्या मागणीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार हेच महत्वाचे ठरणार आहे.

Maharashtra Unlock-5 | राज्यात हॉटेल, रेस्टॉरंट, बार 5 ऑक्टोबरपासून सुरु होणार

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
कर्जमाफीच्या यादीतून एकही शेतकरी सुटणार नाही, प्रत्येक जिल्ह्यात 10 ते 15 हजार शेतकऱ्यांची केवायसी अूपूर्ण,  मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती 
कर्जमाफीच्या यादीतून एकही शेतकरी सुटणार नाही, प्रत्येक जिल्ह्यात 10 ते 15 हजार शेतकऱ्यांची केवायसी अूपूर्ण,  मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती 
Sharad Pawar : सोलापुरात दुष्काळ पाहणी, पण मराठवाड्यातील दौरा रद्द; शरद पवार पुण्यातील रुग्णालयात दाखल
Sharad Pawar : सोलापुरात दुष्काळ पाहणी, पण मराठवाड्यातील दौरा रद्द; शरद पवार पुण्यातील रुग्णालयात दाखल
इम्रान खान म्हणाला, मी नोकरीचा शोध घेतोय; मुंबई उच्च न्यायालयाने सुनावले खडे बोल, पण देश सोडण्याच्या नोटीसवर दिलासा
इम्रान खान म्हणाला, मी नोकरीचा शोध घेतोय; मुंबई उच्च न्यायालयाने सुनावले खडे बोल, पण देश सोडण्याच्या नोटीसवर दिलासा

व्हिडीओ

Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी
India Alliance Vs BJP : 'इंडिया' आघाडीचा महामोर्चा, भाजपच्या देशभरात पदयात्रा Special Report
Inflation Diwali : दिवाळीपूर्वीच महागाईचा दणका...CNG चे दर वाढले, जेट इंधनातही भाववाढ Special Report
Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Imran Khan : OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'
रस्त्याचे काम सुरु असतानाच मशीनचा उच्च दाबाच्या तारेला स्पर्श; कंत्राटदारासह 8 मजुरांचा विजेचा धक्क्याने अंत, 5 जण जखमी
रस्त्याचे काम सुरु असतानाच मशीनचा उच्च दाबाच्या तारेला स्पर्श; कंत्राटदारासह 8 मजुरांचा विजेचा धक्क्याने अंत, 5 जण जखमी
दिवाळीपूर्वी पर्यटकांना गुडन्यूज, रायगडवरील रोप-वे पुन्हा सुरू; देखभालीसाठी दीड महिन्यांपासून होता बंद
दिवाळीपूर्वी पर्यटकांना गुडन्यूज, रायगडवरील रोप-वे पुन्हा सुरू; देखभालीसाठी दीड महिन्यांपासून होता बंद
Sayaji Shinde On Tree Cutting: 'महाराष्ट्रात सध्या कोरोनासारख्या ‘झाडखाऊ’ व्हायरसची लागण', सयाजी शिंदेंचा सरकारवर हल्लाबोल; कर्जतमधील प्रकल्पाविरोधात नागपुरात राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
'महाराष्ट्रात सध्या कोरोनासारख्या ‘झाडखाऊ’ व्हायरसची लागण', सयाजी शिंदेंचा सरकारवर हल्लाबोल; कर्जतमधील प्रकल्पाविरोधात नागपुरात राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
कर्जतमधील टोरेंट प्रकल्प नको असेल, तर सरकारमधून बाहेर पडावे; सत्ताधारी आमदार थोरवेंचा सुनील तटकरेंना टोला
कर्जतमधील टोरेंट प्रकल्प नको असेल, तर सरकारमधून बाहेर पडावे; सत्ताधारी आमदार थोरवेंचा सुनील तटकरेंना टोला
न्यायालये बॉम्बने उडवून देऊ, ई-मेलवरुन धमकी; ठाणे, सांगली, परभणी, बीड, सोलापुरात न्यायालय परिसर केला रिकामा; पोलीस यंत्रणा अलर्ट
न्यायालये बॉम्बने उडवून देऊ, ई-मेलवरुन धमकी; ठाणे, सांगली, परभणी, बीड, सोलापुरात न्यायालय परिसर केला रिकामा; पोलीस यंत्रणा अलर्ट
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: पुणे, सातारा, रत्नागिरीमध्ये पावसाची हजेरी; राज्यात अचानक पाऊस पु्न्हा का कोसळतोय?; हवामान विभागाने सांगितले कारण
पुणे, सातारा, रत्नागिरीमध्ये पावसाची हजेरी; राज्यात अचानक पाऊस पु्न्हा का कोसळतोय?; हवामान विभागाने सांगितले कारण
Embed widget