एक्स्प्लोर

Nagpur News: सरकार म्हणजे विषकन्या, ज्याच्यासोबत जाईल त्याला बुडवते; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा मिश्किल टोला

व्यावसायिकांनी गुंतवणूक प्रक्रियेतून सरकारला दूर ठेवले पाहिजे. सरकार विषकन्या आहे. सरकार ज्याच्या सोबत जाईल त्याला बुडवते. असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात व्यक्त केले आहे.

Nagpur News नागपूर : सर्व काही सरकारच्या भरवशावर होत नाही, त्यामुळे व्यावसायिकांनी गुंतवणूक प्रक्रियेतून सरकारला दूर ठेवले पाहिजे. माझे तर असे  मत आहे की, सरकार विषकन्या आहे. सरकार ज्याच्या सोबत जाईल त्याला बुडवते. असे मत व्यक्त केले आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी. ते नागपूर (Nagpur News) विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिलच्या वतीने  आयोजित केलेल्या "अमेझिंग विदर्भ, सेंट्रल इंडिया टुरिझम" या सेमिनार मध्ये ते बोलत होते. 

 सरकार विषकन्या आहे, ती ज्याच्या सोबत जाईल त्याला बुडवतेच

विदर्भाला नैसर्गिक एडवांटेज आहे. विदर्भात चांगले आणि मोठ्याप्रमाणात जंगल आहे. मात्र विदर्भात पर्यटन वाढीसाठी प्रमुख समस्या म्हणजे विदर्भातील गुंतवणूकदार हे आहेत. गुंतवणूक करण्यासाठी हे गुंतवणूकदार समोर येत नसल्याचे मतही नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. व्यावसायिकांनी हे समजून घेतले पाहिजे की, सर्व काही सरकारच्या भरवशावर होत नाही. तर काही वेळेस सरकारला दूर ठेवावे लागतं, असेही गडकरी यावेळी म्हणाले. सरकार विषकन्या आहे, ती ज्याच्या सोबत जाईल त्याला बुडवतेच, असा मिश्किल टोलाही गडकरींनी यावेळी लगावला. तुम्ही या सर्व लफड्यात पडू नका, ही सबसिडी घ्यायची आहे, ती घेऊन घ्या. तसेच ती केव्हा मिळेल याचं काही भरवशा नाही. आता तर लाडकी बहीण योजना सुरू झाली आहे. त्यामुळे सबसिडीचा निधी त्यांना तिकडेही लागेल असेही गडकरी मिश्किलपणे म्हणाले.

नितीन गडकरींच्या महत्त्वाकांक्षी ऑक्सीजन बर्ड पार्कचे लोकार्पण

उपराजधानी नागपुरात (Nagpur News) एका आगळावेगळ्या ऑक्सिजन बर्ड पार्कचे लोकार्पण झाले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून हे विशेष पार्क भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पुढाकारातून नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर ऑक्सीजन बर्ड पार्क (Oxygen Bird Park) नावाने साकारण्यात आले आहे. 

एकूण 14.32 कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प असून जवळपास 20 एकरमध्ये साकारण्यात आला आहे. याठिकाणी केवळ पक्ष्यांसाठी विशिष्ट आणि पक्ष्यांच्या आवडीच्या फळझाडांची लागवड करण्यात आली आहे. या उद्यानाचे महत्त्व केवळ ऑक्सिजन (प्राणवायू) देणारा परिसर एवढेच नाही. तर पक्ष्यांच्या विविध प्रजातींसाठी हा परिसर आश्रयस्थान म्हणून उपयुक्त ठरणार आहे. विशेष म्हणजे 8 हजार 104 प्रकारच्या वनस्पतींसह ऑक्सिजन पार्क विकसित करण्यात आला आहे. या प्रकल्पात त्या भागातील नैसर्गिक तळ्यांनाही त्याच स्वरूपात समाविष्ट करून घेण्यात आले आहे.

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
Devendra Fadnavis : 48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
पुण्यात CBI ची धाड, 10 जणांना अटक; कॉल सेंटरवर छापे, लाखो रुपयांसह 3 लक्झरी कार जप्त
पुण्यात CBI ची धाड, 10 जणांना अटक; कॉल सेंटरवर छापे, लाखो रुपयांसह 3 लक्झरी कार जप्त
Supreme Court : ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Congress on Vidhan Sabha : निवडणुकीच्या तयारीत काँग्रेसची आघाडी,1ॲाक्टोबरपासून इच्छुकांच्या मुलाखतीMumbai Superfats News : मुंबईतील सुपरफास्ट बातम्या : 30 Sep 2024Maratha Reservation : मोठी बातमी! मराठा आरक्षणाबाबत शिंदे समितीचा अहवाल राज्य सरकारनं स्वीकारलाMahavikas Aghadi Meeting : विदर्भातील काही जागांवर महाविकास आघाडीची चर्चा रखडली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
Devendra Fadnavis : 48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
पुण्यात CBI ची धाड, 10 जणांना अटक; कॉल सेंटरवर छापे, लाखो रुपयांसह 3 लक्झरी कार जप्त
पुण्यात CBI ची धाड, 10 जणांना अटक; कॉल सेंटरवर छापे, लाखो रुपयांसह 3 लक्झरी कार जप्त
Supreme Court : ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
पाहुण्याला उमेदवारी नको, विपुल कदमांना रामदासभाईंचा विरोध; थेट एकनाथ शिंदेंनाच दिला इशारा
पाहुण्याला उमेदवारी नको, विपुल कदमांना रामदासभाईंचा विरोध; थेट एकनाथ शिंदेंनाच दिला इशारा
India vs Bangladesh, 2nd Test : टीम इंडियाच्या धुरंदरांनी अनिर्णित होणारी कसोटी विजयाकडे खेचली; चौथ्या दिवशी विक्रमांचा पाऊस पाडला!
टीम इंडियाच्या धुरंदरांनी अनिर्णित होणारी कसोटी विजयाकडे खेचली; चौथ्या दिवशी विक्रमांचा पाऊस पाडला!
नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालयावरून वाद पेटला, मनसेचा थेट मनपा अधिकाऱ्यांना घेराव, नेमकं काय आहे प्रकरण?
नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालयावरून वाद पेटला, मनसेचा थेट मनपा अधिकाऱ्यांना घेराव, नेमकं काय आहे प्रकरण?
Ind vs Ban: कसोटी हाय का टी-20, चौकार-षटकारांची आतषबाजी; 285 धावांवर भारताचा डाव घोषित
कसोटी हाय का टी-20, चौकार-षटकारांची आतषबाजी; 285 धावांवर भारताचा डाव घोषित
Embed widget