(Source: ECI/ABP News/ABP Majha)
महाराष्ट्रातील गोळीबाराला मुख्यमंत्री जबाबदार, शिंदेंच्या राजवटीत महाराष्ट्रात गुन्हेगारांची पैदास सुरु; संजय राऊतांची टीका
महाराष्ट्रात शिंदेसारखे मुख्यमंत्री असतील तर असे गुन्हेगारच निर्माण होतील, अशी टीका देखील संजय राऊतांनी केली आहे.
कल्याण: उल्हासनगर (Ulhasnagar Crime) येथील गोळीबाराला मुख्यमंत्री शिंदे स्वतः जबाबदार आहे. एकनाथ शिंदेंच्या राजवटीत गुंडांची पैदास सुरु आहे. गोळीबार प्रकरणावरून खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) टीका केली आहे. महाराष्ट्रात शिंदेसारखे मुख्यमंत्री असतील तर असे गुन्हेगारच निर्माण होतील, अशी टीका देखील संजय राऊतांनी केली आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रात दीड वर्षांपासून माफिया आणि गुंडांचे राज्य सुरु आहे. झुंडशाही आणि गुंडगिरीतून हे सरकार आले आहे. पैशाचे व्यवहारातून सरकार आलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील हा प्रकार आहे. गोळीबाराला मुख्यमंत्री जबाबदार आहे, ते त्राग्याने असं म्हणतात. मनस्तापातून शिंदेंमुळे हा गोळीबार केला. या महाराष्ट्रात शिंदेसारखे मुख्यमंत्री असतील तर असे गुन्हेगारच निर्माण होतील असे आमदाराने निवेदन दिले आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात गुंड, गुन्हेगारांच्या टोळ्यांना कसे फोन जातात, हे मी आधी सांगितलं आहे. निवडणुका जिंकण्यासाठी तुरुंगातून आरोपींना जामिनावर बाहेर काढण्यात येत आहे. मी त्यांची नावं देऊ शकतो. पुण्यात गुंडांच्या टोळ्यांच्या प्रमुखांना बाहेर काढण्यात येत आहे.
उल्हासनगरमधील गोळीबाराला मुख्यमंत्री जबाबदार: संजय राऊत
महाराष्ट्रामध्ये गेल्या दीड वर्षांमध्ये माफिया व गुंडांचे राज्य सुरू आहे. झुंडशाही व गुंडगिरीतून राज्य आणले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात दुसरं काय होऊ शकते. कालचा प्रकार हा उल्हासनगरचा नाही तर मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील आहे, यास मुख्यमंत्री जबाबदार आहेत. गणपत गायकवाड हे स्वतः या गोळीबार प्रकरणावर बोलताना त्यांनी त्रागा केला. मी मनस्तापातून एकनाथ शिंदे यांच्या त्रासातून हा गोळीबार केला असल्याचे म्हटले आहे. मी गोळीबाराचे समर्थन करणार नाही. त्यांचे गृहमंत्री आहेत. पण यांच्या राजवटीत महाराष्ट्रात गुन्हेगारच निर्माण होतील.
निवडणुकीत मदत व्हावी यासाठी गुन्हेगार जामीनावर बाहेर, राऊतांचा आरोप
मुख्यमंत्री कार्यालयातून तुरुंग, गुन्हेगार, टोळ्यांना दूरध्वनी केले जातात, निवडणुकीत मदत व्हावी यासाठी गुन्हेगारांना जामिनावर बाहेर काढले जात आहे. पुण्यात नावे जाहीर करणार आहे. चार प्रमुख गुंड टोळ्यांना जामिनावर बाहेर काढले आहे. मुंबईमध्ये तेच सुरू आहे.कायद्याचे राज्य काही नाही फक्त निवडणूक जिंकायच्या आहे. गोळीबार केले त्यांना जमीन देतील. पुण्यात तीन भयंकर गुन्हेगारांना जमीन देण्यासाठी तीन मंत्र्यांनी कसा प्रयत्न केला याचे पुरावे देईल, असेही संजय राऊत म्हणाले.
कुठे आहेत गृहमंत्री?
कुठे आहेत गृहमंत्री? कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही असे बोलतात. हा न्याय फक्त शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यासाठी आहे का? चर्चा करण्याएवढे प्रकरण साधं आहे का? सर्वसामान्य असते तर आतापर्यंत फासावर लटकवले असते . नागपूर ठाणे पुणे मुंबई येथे राजकीय स्वर्थासाठी गुन्हेगारांना माफियांना तुरुंगातून सोडवून आपले राजकीय इसिप्त सध्या करण्याचा प्रयत्न आहे. भाजपवाल्यांना तोंड आहे का? काय उत्तर देणार? असा सवाल देखील राऊतांनी केला आहे.
गोळीबार करणाऱ्यांना जामीन मिळावा यासाठी गृहमंत्र्यांच्या कार्यालयातून फोन
सर्व गुन्हेगारी घटनांमध्ये राजकीय पाठबळ आहे. त्यासाठी मुख्यमंत्री कार्यालय काम करत आहे. महाराष्ट्र एवढा रसातळाला कधीच गेला नव्हता. देवेंद्र फडणवीस न्यायी आहेत वकील आहेत. राम तुमच्या बाजूने आहेत. त्यामुळे त्यांनी न्याय द्यावा. राजन साळवी व कुटुंबीयांना जामीन नाही पण गोळीबार करणाऱ्यांना जामीन द्यावा यासाठी गृहमंत्री यांच्या कार्यालयातून फोन जाईल, असे देखील संजय राऊत म्हणाले.
हे ही वाचा :