एक्स्प्लोर
निवडणूक लढवण्याबाबत कुटुंबीयांशी चर्चा करुन निर्णय घेणार
जळगाव लोकसभा मतदासंघातून निवड़णूक लढवण्याच्या ऑफरबाबत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी अखेर प्रतिक्रिया दिली आहे.

जळगाव : जळगाव लोकसभा मतदासंघातून निवड़णूक लढवण्याच्या ऑफरबाबत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी अखेर प्रतिक्रिया दिली आहे. निकम याबाबत म्हणाले की, "निवडणूक लढवण्याबाबत मी अद्याप विचार केलेला नाही. कुटुंबीयांशी चर्चा करुनच निर्णय घेणार आहे." राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उज्ज्वल निकम यांना जळगावमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची विनंती केली आहे. त्याबाबत निकम यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. चोपड़ा तालुक्यातील अकुलखेडा गावात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने निकम आले होते. यावेळी निकम यांनी राजकारण प्रवेशाबाबतच्या प्रश्नांवर उत्तर दिले. निकम म्हणाले की, "राजकारण हा माझा पिंड नाही, त्यामुळे निवडणूक लढवण्याबाबत कुटुंब आणि मित्र परिवाराशी चर्चा करुन निर्णय घेईन. सध्या तरी माझी राजकारणात प्रवेश करण्याची इच्छा नाही. सध्या माझ्याकडे अनेक खटल्यांची कामे बाकी आहेत."
आणखी वाचा























