एक्स्प्लोर

उजनीने अखेर आज गाठली शंभरी; सोलापूर जिल्ह्याची चिंता मिटली

खडकवासला, मुळशी, पवना यासारख्या धरणातून पाणी सोडले जात असल्याने उजनीला याचा फायदा होत आहे. सायंकाळी सहा वाजता दौंडजवळून 26 हजार क्युसेक पाणी जलाशयात मिसळत होते तर प्रकल्प 102 टक्के भरला आहे.

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणार्‍या उजनी धरण आज अखेर शंभर टक्के भरले असून सोलापूर जिल्ह्याची चिंता आता मिटली आहे. सोमवारी (31 ऑगस्ट) सायंकाळी उजनी 102 टक्के भरला असून धरणात येणारी आवक पाहता मुख्य कालव्यात पाणी सोडण्यास सुरूवात झाली आहे.

उजनी धरण ऑगस्ट महिन्याच्या अखेरच्या दिवशी शंभर टक्के भरले आहे. यावर्षी भीमा खोर्‍यात पावसाचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत कमी असल्याने प्रकल्पात एकाचवेळी मोठ्या प्रमाणात पाणी येऊ शकले नसले तरी तीन महिन्यात हे धरण हळूहळू टक्केवारीच्या शंभरीजवळ पोहोचले आहे. आता धरणातून मुख्य कालव्यात 800 क्युसेकने पाणी सोडण्यास सोमवारपासून प्रारंभ झाला आहे. याच बरोबर भीमा सीना बोगदा व सीना माढा उपसा सिंचन योजनेत ही पाणी सोडले जात आहे.

खडकवासला, मुळशी, पवना यासारख्या धरणातून पाणी सोडले जात असल्याने उजनीला याचा फायदा होत आहे. सायंकाळी सहा वाजता दौंडजवळून 26 हजार क्युसेक पाणी जलाशयात मिसळत होते तर प्रकल्प 102 टक्के भरला आहे. धरणात आता एकूण साठा हा 118 टीएमसी इतका झाला आहे. यात 58.50 टीएमसी पाणी उपयुक्त पातळीत आहे. धरण भरल्याने लाभक्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे. हा प्रकल्प क्षमतेने भरल्याने पुढील वर्षापर्यंतची चिंता आता मिटली आहे. यातच लाभक्षेत्र असणार्‍या सोलापूर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला आहे.

मागील वर्षी 2019 ला सोलापूर जिल्ह्यात उशिरापर्यंत म्हणजे नोव्हेंबर महिन्यापर्यंत पाऊस झाला होता. यामुळे उजनीतील पाण्याचा सुरूवातीला मागणी नव्हती. नंतर रब्बी व उन्हाळा हंगामात शेतीला मुबलक पाणी दिले गेले. जून 2020 च्या सुरूवातीला धरणातून सोलापूरसह भीमाकाठच्या गावांसाठी पाणी सोडले गेले तेव्हा हा प्रकल्प मृतसाठ्यात वजा 24 टक्के अशा स्थितीत होता. जून महिन्यापासून उजनी जलाशयावर चांगला पाऊस झाला असून येथे 498 मिलीमीटरची आजपर्यंत नोंद आहे. याचा फायदा प्रकल्प भरण्यासाठी थोडाफार झाला यासह भीमा खोर्‍यात आलेल्या पावसाने तीन महिन्यात हे धरण शंभर टक्के भरले आहे. जवळपास 124 टक्के पाणी येथे आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
महाराष्ट्रात पावसाचा यू-टर्न! पुढील दोन दिवस महत्वाचे, 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, पंजाबराव डखांचा अंदाज
महाराष्ट्रात पावसाचा यू-टर्न! पुढील दोन दिवस महत्वाचे, 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, पंजाबराव डखांचा अंदाज
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार

व्हिडीओ

Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha
Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha
Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
Embed widget