एक्स्प्लोर
Advertisement
''साई संस्थान समितीत सेनेच्या मिर्लेकरांना पद द्या अन्यथा..''
मुंबईः साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी मंदिराच्या कार्यकारणी समितीमध्ये शिवसेनेचे रविंद्र मिर्लेकर यांना उपाध्यक्ष पद द्या, अन्यथा सेना यापुढे कुठल्याही महामंडळात सहभागी होणार नाही, असा इशारा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला आहे. साई समितीच्या कार्यकारिणीमध्ये सेनेला पद न मिळाल्यामुळे हा मोठा धक्का मानला जात आहे.
राज्य सरकारच्या विधी आणि न्याय खात्याने नवे विश्वस्त म्हणून नवी मुंबईचे भाजप नेते सुरेश हावरेंची संस्थानच्या विश्वस्तपदी वर्णी लावली आहे. तर उपाध्यक्ष म्हणून राहुरीचे माजी आमदार चंद्रशेखर कदम असणार आहेत. सेनेत बंडखोरी करून भाजपमध्ये गेलेले सेनेचे माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांनाही या समीतीमध्ये घेऊ नये, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
उद्धव ठाकरे यांनी वाघचौरे यांनाही या समितीमध्ये न घेण्याचा इशारा दिला आहे. तसं झाल्यास शिवसेना महाराष्ट्रातील कोणत्याही महामंडळात सहभाग घेणार नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपाला ठणकावलं आहे. उद्धव ठाकरे यांची मागणी घेऊन शिवसेना नेते रामदास कदम रात्री साडे 8 वाजता वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत.
संबंधित बातमीः साई संस्थानावर भाजपचा झेंडा, काँग्रेस हद्दपार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
क्रिकेट
Advertisement