एक्स्प्लोर
शिवसैनिकांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे अहमदनगरला जाणार
शिवसैनिकांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर 25 एप्रिलला सकाळी 10 वाजता उद्धव ठाकरे अहमदनगरला घटनास्थळी भेट देणार आहेत. हत्या झालेल्या शिवसैनिकांच्या कुटुंबियांचीही भेट उद्धव ठाकरे घेणार आहेत.
मुंबई : शिवसैनिकांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर 25 एप्रिलला सकाळी 10 वाजता उद्धव ठाकरे अहमदनगरला घटनास्थळी भेट देणार आहेत. हत्या झालेल्या शिवसैनिकांच्या कुटुंबियांचीही भेट उद्धव ठाकरे घेणार आहेत.
अहमदनगर दुहेरी हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर नगरमधील शिवसैनिकांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी शिवसेना नेते अनिल राठोड, लोखंडे, संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर उपस्थित होते.
उद्या सोमवारी नगरमधील हत्या झालेल्या शिवसैनिकांचे दहावं झाल्यानंतर शिवसैनिकांना अटक करण्याचे एसपींना आदेश असल्याचंही शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना सांगितले. त्यामुळे उद्या रामदास कदम, एकनाथ शिंदे, विशाखा राऊत आणि किशोरी पेडणेकर नगरमधील केडगावला जाणार आहेत.
तसंच शिवसैनिकांचं अटकसत्र सुरु झाल्यास परवा मंगळवारी हजारो शिवसैनिक नगरहून मुंबईला मुख्यमंत्र्यांच्या निवास्थानी वर्षावर दाखल होणार आणि शिवसैनिकांना अटक झाल्यास वर्षावर ठिय्या आंदोलन करणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी तसे आदेशच शिवसैनिकांना दिले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
महाराष्ट्र
राजकारण
शिक्षण
Advertisement