एक्स्प्लोर
Advertisement
उद्धव ठाकरेंची चंद्रभागेतीरी सभा, साधूसंत राहणार उपस्थित
उद्धव ठाकरे यांच्यासोबत स्टेजवर राज्यभरातील साधू आणि वारकरी संत असणार आहेत. शिवसेनेने शक्तिप्रदर्शनासाठी तब्बल 27 एकरावर पसरलेल्या चंद्रभागा मैदानाची निवड केली आहे .
पंढरपूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 24 डिसेंबर रोजी पंढरपूरमध्ये होणाऱ्या महासभेकडे सगळ्याच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत स्टेजवर राज्यभरातील साधू आणि वारकरी संत असणार आहेत. शिवसेनेने शक्तिप्रदर्शनासाठी तब्बल 27 एकरावर पसरलेल्या चंद्रभागा मैदानाची निवड केली आहे.
राज्यभरातून पाच लाखापेक्षा जास्त शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या सभेला येणार आहेत. या महासभेतून पुढच्या राजकीय आखाड्याचे संकेत मिळणार असल्याने या सभेला फारच महत्व प्राप्त झाले आहे .
शहरातील राज्य परिवहन महामंडळाच्या मालकीच्या या मैदानावर आषाढी आणि कार्तिकीला हजारो बसेसचे यात्रा स्टॅन्ड उभारण्यात येत असतात. भलेभले नेते या मैदानावर सभा घेण्यास धजावत नसून यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी वगळता इतरांच्या सभांचा या मैदानावर फज्जा उडाला आहे.
सभेचे स्टेजदेखील अशा रीतीने उभारण्यात आले आहे, ज्यामुळे जास्तीतजास्त शिवसैनिकांची बसण्याची सोय होईल. 80 फूट लांब आणि 60 फूट रुंदीच्या मुख्य स्टेजवर उद्धव ठाकरे त्यांचे कुटुंबीय आणि शिवसेना नेते बसणार असून त्याशेजारी दोन्ही बाजूला उभारलेल्या स्टेजवर राज्यातील साधू आणि वारकरी संतांना स्थान देण्यात येणार आहे. स्टेजसमोर भव्य राममंदिराची रांगोळीही साकारण्यात येणार आहे. तसेच राज्यभरातील शिवसेनेचे आमदार, खासदार, मंत्री , नगरसेवक, पदाधिकाऱ्यांच्या बसण्याची वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement