Narayan Rane: उद्धव ठाकरे लवकरच निवृत्त होतील, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर खोचक निशाणा
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे जवळ 65 वर्षाचे झाले असून लवकरच ते निवृत्त होतील. त्यांच्यासाठी मी कणकवलीत वृद्धाश्रम बांधून ठेवला आहे. लवकरच त्यांना त्या वृद्धाश्रमात पाठवणार आहे.
रत्नागिरी : उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) आज कणकवलीत सभा होणार आहे.. यावरून नारायण राणेंनी त्यांच्यावर निशाणा साधलाय. आता उद्धव ठाकरे जवळ 65 वर्षाचे झाले असून लवकरच ते निवृत्त होतील. त्यांच्यासाठी कणकवलीत वृद्धाश्रम बांधून ठेवलं असल्याचा खोचक निशाणा राणेंनी लगावला..
नारायण राणे म्हणाले, उद्धव ठाकरे अडीच वर्षे मुख्यमंत्री होते मात्र ते काही करू शकले नाहीत. मी या जिल्ह्यात मेडिकल कॉलेज आणलं, अनेकांना रोजगार दिले. आता उद्धव ठाकरे जवळ 65 वर्षाचे झाले असून लवकरच ते निवृत्त होतील. त्यांच्यासाठी मी कणकवलीत वृद्धाश्रम बांधून ठेवला आहे. लवकरच त्यांना त्या वृद्धाश्रमात पाठवणार आहे.
उद्धव ठाकरे आमच्यासाठी लकी : नितेश राणे
उद्धव ठाकरे आमच्यासाठी लकी आहेत. जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरे कोकणात सभा घेतात तेव्हा तेव्हा आमचे मताधिक्य वाढते. आता देखील ते आमच्या कोकणात सभा घेत आहेत. त्यामुळे आमचे मताधिक्य नक्की वाढेल असा विश्वास भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. एवढंच नाही तर तुमचा गाडीचा खर्च मी देतो पण तुम्ही कोकणात सभा घ्या असे नितेश राणे यावेळी म्हणालेत.
उद्धव ठाकरे हा कपटी माणूस : नितेश राणे
राज ठाकरे हे नारायण राणे यांचे जवळचे मित्र आहेत. राज ठाकरे यांची कोकणशी जवळीक आहे. राज ठाकरे यांच्या सभेमुळे आम्हाला ताकद मिळेल. उद्धव ठाकरे हा कपटी माणूस आहे.जो वडिलांचा झाला नाही तो शिवसैनिकांचा काय होणार, असेही नितेश राणे म्हणाले.
नारायण राणेंची शरद पवारांवर टीका
सध्याच्या निवडणुकीत वयाचा मुद्दा चांगलाचा तापला आहे. नारायण राणेंनी काल वयावरून शरद पवारांवर निशाणा साधला होता.
चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, 12 वर्ष केंद्रीय मंत्री, दोन वर्ष संरक्षण मंत्री राहून काही करू शकले नाहीत. आता शरद पवारांचे वय 84 आहे. मी राजकारणी आहे. मी काही लोकांचा अभ्यास केला आहे, शरद पवार आयुष्यात एखाद्या विषयासाठी अस्वस्थ झाले असते तर 84 वर्षे जगले नसते. 84 वर्षाच्या वयात शरद पवार विकास कामासाठी कधी अस्वस्थ झाले नाही. माणसाला आजकाल हवामान बदल झाला की 50-55 वर्षात अटॅक येतो, माणसे जातात. 84 वर्षात जग इकडचं तिकडे होत पण शरद पवारांना काही होत नाही, बिनधास्त असतात, असे नारायण राणे म्हणाले.
हे ही वाचा :
नारायण राणे सत्तेसाठी लाचार, त्यांनी आपला भूतकाळ आठवावा; विनायक राऊतांची परखड टीका