Sada Sarvankar on Uddhav Thackeray : मुलाला पुढं आणण्यासाठी उद्धव ठाकरेंना घरात ठेवलं हे आईने मुलासाठी केलेल प्लॅनिंग; शिंदे गटाच्या आमदाराचा दावा
मदत करणारा माणूस म्हणून पहिल्यांदा बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतलं जात होतं. आता राज ठाकरे यांचं नाव घेतलं जात. त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे राज्यात स्वागत केलं जात असल्याचे सरवणकर म्हणाले.
Sada Sarvankar on Uddhav Thackeray : आम्ही हुबेहूब बाळासाहेब ठाकरे आम्ही राज ठाकरेंमध्ये (Raj Thackeray) पाहतो, शिवसेना जी चालत होती ती आता मनसे काम करत असल्याची प्रतिक्रिया शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar on Uddhav Thackeray) यांनी दिली. सदा सरवणकर यांनी राज ठाकरे यांचं जोरदार कौतुक करताना उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) तोफ डागली.
खऱ्या अर्थाने शिवसेनाप्रमुखांचे विचार राज साहेब करत आहेत
सदा सरवणकर म्हणाले की, मदत करणारा माणूस म्हणून पहिला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतलं जात होतं. आता राज ठाकरे यांचं नाव घेतलं जात. त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे राज्यात स्वागत केलं जात आहे. खऱ्या अर्थाने शिवसेनाप्रमुखांचे विचार राज साहेब करत आहेत. बाळासाहेब ठाकरे हिंदुत्वसाठी काम करत होते आता राज ठाकरे करत असल्याचे ते म्हणाले.
तेव्हा 7 तास झाले तरी उद्धव ठाकरेंचा कॉल आला नाही
सरवणकर यांनी सांगितले की, मी पत्नी आजारी होती तेव्हा हिंदुजामध्ये बेड मिळावा यासाठी राज साहेब आणि उद्धव साहेब दोघांना फोन केला होता. 7व्या मिनिटाला मदतीसाठी राज ठाकरे यांचा कॉल आला. मात्र, 7तास झाले तरी उद्धव ठाकरे यांचा कॉल आला नाही.
उद्धव ठाकरे यांना घरात ठेवलं हे आईने मुलासाठी केलेल प्लॅनिंग
त्यांनी सांगितले की, शिवसेनेत ज्यांचा नावलौकिक होत होते, त्यांच्याविरुद्ध डाव रचले जात होते आणि बाजूला काढले जात होते. पक्षप्रमुख हे करत होते हे जास्त वाईट वाटत होतं. मुलाला (आदित्य ठाकरे) पुढं आणण्यासाठी उद्धव ठाकरे यांना घरात ठेवलं हे आईने (रश्मी ठाकरे) मुलासाठी केलेलं प्लॅनिंग असल्याचा दावा त्यांनी केला. शिवसेना प्रमुखांनी ज्यांना विरोध केला, त्यांना मांडीवर बसवल्याची टीका त्यांनी केली. शिवसेना भवन तोडलं ते समाजवादी पक्ष् यांच्यासोबत आहेत, याचं यांना काहीच वाटत नाही. नारायण राणे यांनी पक्ष सोडल्यावर जे काही घडलं ते मातोश्रीवरून आम्हाला सांगितलं, असा दावाही त्यांनी केला.
इतर महत्वाच्या बातम्या