Shiv Sena : भीमशक्ती-शिवशक्ती संघटनांनी केला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश!
Shiv Sena : महाराष्ट्रातील भीमशक्ती आणि शिवशक्तीमधून, बहुजन आघाडी, अल्पसंख्यांक मुस्लिम समाज, रिपाई पक्षातील अनेकांनी आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला.
Uddhav Thackeray Shiv Sena : महाराष्ट्रातील भीमशक्ती आणि शिवशक्तीमधून, बहुजन आघाडी, अल्पसंख्यांक मुस्लिम समाज, रिपाई पक्षातील अनेकांनी आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला. सोमवारी मातोश्री येथे सर्वांचा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.
एक संघटन करून आम्ही शिवसेनेसोबत आहोत. कारण एकच की जे महाराष्ट्रात घडलं ते कोणाला पटलं नाही. एकनाथ शिंदे यांचं सरकार आहे, ते व्यावहारिक दृष्टीने झालेले सरकार आहे. उद्धव ठाकरे यांना विनाकारण पाय उतार व्हावं लागलं होतं. त्यासाठी आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. ज्या ज्यावेळी उद्धव साहेब आम्हाला आवाज देतील तेव्हा आम्ही त्यांच्या मागे खंभीरपणे उभे राहू, असे भाई कांबळे पक्षप्रवेशावेळी म्हणाले. दसरा मेळावा हा आमचाच होईल असं उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याचेही भाई कांबळे यांनी सांगितलं.
भीमशक्ती-शिवशक्ती या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पँथर भाई कांबळे यांच्यासह 50 संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्रीवर आज त्यांचा पक्ष प्रवेश झाला. रिपब्लिकन चळवळीतील दलित पँथर पासून आंबेडकरी चळवळीत आपले आयुष्य समाज्याचा कल्याणासाठी वेचले असे वंचित बहुजन आघाडीध्ये उपाध्यक्ष भीमशक्ती-शिवशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, भाई कांबळे यांच्या हे केंद्रीय महासचिव दलित चळवळीचे अभ्यासक डॉ महेंद्र वानखडे,दलित पँथर तसेच लोकजनशक्ती पार्टीचे श्री किरण माने, मुस्लीम समाजाचे नेते अब्बास मिर्जा, बहुजन समाजाचे नेते कैलास सिरसाट, आदिवासी समाजाचे नेते लहू काटकर, सेवा निवृत्त सनदी अधिकारी तथा भीमशक्ती-शिवशक्तीच्या संघटनेतील अनेक पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.
शिवसेनेचे प्रखर हिंदुत्व हे देशभक्ती, राष्ट्रभक्ती तसेच सर्व सामान्य माणसाचे हित जोपासणारे असून लोकशाहीला टिकवण्यासाठी शिवसेना हाच पक्ष काळाची गरज आहे. आर एस एस आणि भाजपाचा संविधान विरोधी छुपा अजेंठा आणि हा भारतीय संविधानाची पायमल्ली करीत असून पुरोगामी महाराष्ट्र राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा अधिक दृढ करण्याची आणि रुजविण्याची आज गरज असून येणाऱ्या काळात महाराष्ट्र राज्यातील गाव पातळीवर वस्ती वाड्यातील, पाड्यापर्यत ज्वलंत भीमशक्ती-शिवशक्तीचा आणि शिवसेनेचा नारा व काम आम्ही पोहचण्याचे करणार आहोत, अशी माहिती भीमशक्ती-शिवशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई कांबळे यांनी माध्यमाशी बोलताना दिली.
























