ठाकरे परिवारावर महाराष्ट्र प्रेम करतो, युती होणार की नाही? बाळा नांदगावकरांनी थेट सांगितलं...
मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आज (12 ऑक्टोबर) सहकुटुंब मातोश्रीवर पोहोचले होते. आज ठाकरे बंधू सहकुटुंब मोतश्री निवासस्थानी स्नेहभोजन केले. यावर मनसेचे नेते बाळा नांगदावर यांनी प्रतिक्रिया दिली.
Bala Nandgaonkar : मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आज (12 ऑक्टोबर) सहकुटुंब मातोश्रीवर पोहोचले होते. आज ठाकरे बंधू सहकुटुंब मोतश्री निवासस्थानी स्नेहभोजन केले. मागील वेळेस उद्धव ठाकरे शिवतीर्थ निवास्थानी राज ठाकरे यांना भेटण्यास गेले होते, मात्र ते एकटेच होते. मात्र आज राज ठाकरे सहकुटुंब उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्रीवर दाखल (Raj Thackeray And Uddhav Thackeray Meets Matoshri) झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यावर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणी कोणावर टीका करायची ती त्यांनी करावी. ठाकरे परिवारावर महाराष्ट्र प्रेम करतो. इतर भाषिकांचे सुद्धा प्रेम आहे, तसेच ठाकरे परिवाराचे सुद्धा लोकांवर प्रेम असल्याचे नांदगावकर म्हणाले. दरम्यान, मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीसंदर्भातही बाळा नांदगावकर यांनी भाष्य केले.
युतीच्या दिशेने वाटचाल सुरु
युती होणार की नाही याला अर्थ काही अर्थ नसतो, जोपर्यंत त्या दोन भावांचं ऑफिशियल होत नाही तोपर्यंत भाष्य करणे योग्य होणार नाही. पण असं दिसते आहे की त्या दिशेने वाटचाल सुरु झालेली असावी असं मला दिसते, दोघांची मन जोडलेली असावी असे नांदगावकर म्हणाले.
जे बाळासाहेबांच्या कुटुंबावर प्रेम करतात अशा सर्वांना आनंद
मला मनापासून आनंद झाला आहे ठाकरे परिवारातले दोन बंधू एकमेकांना भेटले. गेल्या दोन-तीन महिन्यात ते सतत भेटत आहेत. माननीय प्रबोधनकार आणि माननीय बाळासाहेब ठाकरे परिवातील दोन ठाकरे बंधू यांची आज भेट झाली आहे. काही लोक ठाकरे परिवारावर प्रेम करत नसले जे इतर भाष्य करतील. जे बाळासाहेबांच्या कुटुंबावर प्रेम करतात अशा सर्वांना आनंद झाला आहे. गेल्या 19 ते 20 वर्षात दोन भावंडात संवाद नव्हता आता जो संवाद होत आहे. एकमेकात विश्वास निर्माण होणे गरजेचे आहे. एकमेकांची मन जुळली तर पुढे चांगलं होते, म्हणूनच उद्धव ठाकरे जेवायला जातात राज ठाकरे त्यांच्या घरी जेवायला जातात. आम्हाला याचा निश्चित आनंद आहे.
सगळ्या गोष्टीला राजकारणाच्या दृष्टिकोनातून पाहणार का?
सगळ्या गोष्टीला राजकारणाच्या दृष्टिकोनातून पाहणार का? राजकारणाच्या पलीकडे जाऊन पाहण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रात आपण पाहतो की सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपण नातीगोती पाहत असतो. राजकारणात मी एकमेकावर टीकाटिप्पणी करतो सभागृहात करतो रस्त्यावर लढाई लढतो आम्ही आमचा सुसंवाद सोडलेला नाही. आज दोघे भाऊ भेटले म्हणजे दोन पक्षाचे नेते भेटले म्हणजे चर्चा तर होणारच राजकारणावरही चर्चा झाली असेल. मी आज खूप आनंदी असल्याचे बाळा नांदगावकर म्हणाले.
आपण राजकीय पक्ष जे निर्माण केले आहेत ते लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी. उद्या ठाण्यात मोर्चा निघणार आहे. तिकडे कार्यकर्ते असतील. उद्याच्या ठाण्याच्या मोर्चात शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही सामील होऊ शकतो. मनसेच्या वतीने दीपोत्सव होतो. या दृष्टीने कदाचित चर्चा झाली असेल पण मला माहिती नाही ते येणार की नाही असे नांदगावकर म्हणाले.
























