Maha patrakar Parishad Sanjay Raut : लवादानं दिलेला निर्णय त्यांची बायको सुद्धा मान्य करणार नाही; संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल
Sanjay Raut : लवादाने दिलेला निर्णय त्यांची बायकोही मान्य करणार नाही. डर नाही म्हणून हे जनता न्यायालय घेण्याची हिंमत आज आम्ही दाखवली आहे, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.
Maha patrakar parishad : आज न्यायाधीशाच्या भूमिकेत राज्यातील जनता आहे. लवादाने दिलेला निर्णय त्यांची बायकोही मान्य करणार नाही. डर नाही म्हणून हे जनता न्यायालय घेण्याची हिंमत आज आम्ही दाखवली आहे,अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
मंगळवारी उद्धव ठाकरेंच्या महा पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी संजय राऊत बोलत होते. ते म्हणाले की, बाळासाहेबांची शिवसेना या लवादानं कोणताही पुढचा-मागचा विचार न करता शिंदे गटाच्या हातात दिली, त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्र खदखदतोय. लवादाचा निकाल त्यांची बायकोही मान्य करणार नाही. आजचा दिवस इतिहासात नोंदला जाणार असून हा एक अभिनव उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. आज न्यायाधीशाच्या भूमिकेत महाराष्ट्राची जनता आहे. मला खात्री आहे या न्यायालयात जनता जो निकाल देईल तोच निकाल लोकभा आणि विधानसभेत मिळाल्या शिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले.
तुम्ही बेईमानाने जिंकलात
कर नाही त्याला डर कशाला, असे या राज्याचे मिंदे मुख्यमंत्री दाढीला पिळ देत सांगत असतात. बरोबर आहे, त्यामुळेच कर नाही, डर नाही. त्यामुळेच जनता न्यायालय घेण्याची हिंमत आम्ही दाखवली आहे. आमच्यामध्ये हिंमत आहे. आमच्याकडून काहीच चुकीचसमोर आमच्या वकिलांनी आणि नेत्यांनी उत्तम लढा दिला. इमानदारीने लढलो. तुम्ही बेईमानाने जिंकलात, त्याविरोधात हे जनता दरबार आहे. इमानदारी किसी कायदे और कानून की मोहताच नही होती. आम्ही इमानदार आहोत, असे संजय राऊत म्हणाले.
आज जनता जज
शिवसेनेबाबत विधानसभा अध्याक्षांनी दिलेल्या निकालाविरोधात ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. आज जनता न्यायालयाचे आयोजन करण्यात आले. आज जनता जज असेल, असे संजय राऊत म्हणाले.
बेकायदेशीर बाराखडी प्रस्थापित करणारा निर्णय - अॅड. असीम सरोदे
अॅड. असीम सरोदे म्हणाले, कायदा जर लोकांसाठी असेल तर लोकांमध्ये सुद्धा बोललं गेला पाहिजे. उच्च न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या निर्णयाचे विश्लेषण करण्याचा पूर्ण हक्क आहे. त्यामधून कोणत्याही न्यायालयाचा अवमान होत नाही. त्याबद्दल त्यांचे मी जास्त आभार मानतो. त्यांनी सांगितले की, पक्षांतर कसं करायचं याबद्दलची एक बेकायदेशीर बाराखडी प्रस्थापित करणारा निर्णय म्हणून राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाकडे आपल्याला बघायला पाहिजे. ही जी कायदेविरोधी प्रवृत्ती तयार होत आहे, त्याबद्दल या जनतेच्या न्यायालयात बोललं गेलं पाहिजे.
आणखी वाचा