एक्स्प्लोर

त्यांनी आईच्या काळजात कट्यार घुसवली, त्यांच्यामागील महाशक्तीला आनंद झाला - उद्धव ठाकरे

चाळीस डोक्यांच्या रावणांनी ते गोठवल. या लोकांच्या वृत्तीची चीड. आईच्या काळजात कट्यार घुसवली. त्यांच्या मागच्या महाशक्तीला जास्त आनंद कारण त्यांना जमल नाही त्यांनी शिवसेनेची लोक फोडून आनंद घेताहेत.

Uddhav Thackeray live press conference : उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपवर निशाणा साधला. ज्या शिवसेनेनं तुम्हाला राजकीय जन्म दिला. जी शिवसेना तुमची राजकीय आई आहे. त्या आईच्या काळजात कट्यार घुसवली. अशी ही उलट्या काळजाची लोकं, त्यांनी शिवसेना आणि धनुष्यबाण गोठवलं, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी केली. 

आज देखील अनेक जण भेटतात म्हणतात तुम्ही कुटुंबीयच आहात. आज पुन्हा फेसबुकच्या माध्यमातून. गद्दारी झाली मुख्यमंत्री पद सोडले तेव्हा पण आपण संवाद केला. सगळ देऊनही गद्दार गेले. आता जरा अति होऊ लागलय. मलाच मुख्यमंत्री व्हायचय इथं पर्यंत ठिक होत आता शिवसेनाप्रमुख व्हायला चालले. सगळ्यांना धन्यवाद दसरा मेळाव्यात विघ्न आणले. पण आपला झालाच. दोन मेळावे झाले अस म्हणतात एकीकडे पंचतारांकित तर दुसरीकडे निष्ठावंतांचा मेळावा दिव्यांग, नेत्रहीन सगळे शिवसैनिक होते त्यांना धन्यवाद. तुम्ही आलात ते का?  कारण उध्दव बाळासाहेब ठाकरे म्हणून तुम्ही आलात. 19 जून 1966 तो काळ आजही आठवतो. घरी मराठी माणसांची वर्दळ. मार्मिक होते वाचा आणि थंड बसा हे तेव्हाचे सदर. आजोबांनी बाळासाहेबांना विचारले संघटना काढायचे ठरवले का?  आजोबांनी नाव दिले शिवसेना. पुढे हा 56 वर्षांचा इतिहास आपल्या समोर. एक दिवस एक तगडा माणूस उभा ते दत्ताजी साळवी काही नसतांना लोक जुळत गेली. काहीच नव्हत केवळ महाराष्ट्राच्या हितासाठी माझा सिंहाचा खारीचा वाटा उचलणार म्हणून लोक जुळली. वसंतराव मराठे ठाण्यात निवडून आले, अनेक जण अनेकांची नावे. त्यातून शिवसेनेचा विजयरथ पुढे निघाला. पहिल्यांदा 42 नगरसेवक.

अनेक जणांनी जीव पण गमावले, तुरुंगवास सोसला, पोलिसांशी संघर्ष त्यातून शिवसेनेचा महावृक्ष. काल निवडणुक आयोगाने चिन्ह धनुष्य बाण गोठावलं. चाळीस डोक्यांच्या रावणांनी ते गोठवल. या लोकांच्या वृत्तीची चीड. आईच्या काळजात कट्यार घुसवली. त्यांच्या मागच्या महाशक्तीला जास्त आनंद कारण त्यांना जमल नाही त्यांनी शिवसेनेची लोक फोडून आनंद घेताहेत. या देशात हिंदू म्हणायची हिम्मत दिली तीच शिवसेना गोठावली काय आनंद मिळवलात. तुमचा आणि शिवसेनेचा संबंध काय? माझ्या आजोबांनी नाव दिलय, बाळासहेबांनी रुजवलय. आज अनेकांचे फोन .सकाळी साडेनऊ वाजता नारळ फुटला त्याचे तुषार अंगावर मला ते पाणी इतके भिजवले की अनेक जबाबदारी मी सांभाळल आज शिवसैनिकांच्या अश्रुने भिजलाय.

त्यांचा उद्देश त्यांना तरी समजला. एका जाहिरातीचा संदर्भ.  यांचा उपयोग संपला की यांना फेकून देतील. मला खात्री आहे सगळेच काही स्वार्थी नाहीत हे दसरा मेळाव्यात सिध्द झाल. शिवसैनिकांना दमदाट्या इंदिरा गांधीनी जे केले नाही ते तुम्ही केलय ही बाळासाहेबांची आठवण. तेव्हाही त्रास झालाच पण तेव्हा काँग्रेसचे सरकार होते आज भाजपचे मग जे काँग्रेसने केले नाही ते तुम्ही करता. शिवसैनिकांना ज्यांनी तुम्हाला मोठे केले त्यांना छळताहात. मी डगमगलेलो नाही. माझा आत्मविश्वास आहे तुमच्या सारखे शिवसैनिक आहेत तुम्ही डगमगायचे नाही. अनेकांना फोन येतात. माझ आजही आव्हान आहे समोर या निवडणुकांना सामोरे या. तुम्हाला सगळ हवय पण बाळासाहेबांचा मुलगा नकोय.

काही काळासाठी चिन्ह गोठवलय. मला हा निकाल अनपेक्षित होता. 16 आमदारांचा निकाल लागेपर्यंत आयोगाचा निर्णय व्हायला नको होता. माझ्या कायद्यावर विश्वास आहे. तिथे न्याय मिळेल अशी खात्री. आपण तीन चिन्ह दिली आहेत त्रिशूळ, उगवता सूर्य, धगधगती मशाल. तीन नावे दिली शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रबोधन कार ठाकरे, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे. आदेशाप्रमाणे चिन्ह नाव दिलय लवकरात लवकर आम्हाला नाव द्यावे. आयोगाने आपण दिलेले पर्याय जाहीर केले पण  गद्दारांनी काय दिलय ते अद्याप सांगितलेले नाही. जनता सर्वोच्च आहे. आम्हाला त्यांच्या दरबारात जायचे आहे म्हणून निवडणूक आयोगाने लवकरात लवकर आम्हाला चिन्ह आणि नाव द्यावे. आज कोजागिरी आहे रात्र वैऱ्याची आहे जागृक राहा. आज वेळ निघून गेली की कुणी आपल्याला हरवणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Pune Chakan MIDC: चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप झाली होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप झाली होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
Maharashtra Live News Updates: नाशिकमध्ये पुन्हा 3.4 रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिक भयभीत
Maharashtra Live News Updates: नाशिकमध्ये पुन्हा 3.4 रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिक भयभीत
Ashram School Student Deaths: आदिवासी आश्रमशाळा की 'मृत्यूचा सापळा'? दोन वर्षांत राज्यात तब्बल 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर
आदिवासी आश्रमशाळा की 'मृत्यूचा सापळा'? दोन वर्षांत राज्यात तब्बल 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sri Lankan Coach News : श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Embed widget