एक्स्प्लोर

Sushma Andhare: गेल्यावेळी स्टेजवर एक खुर्ची रिकामी, यंदा काय?, मेळाव्याला निघण्यापूर्वी सुषमा अंधारेंनी झलक दाखवली

 गेल्या वर्षीच्या दसरा मेळाव्यात संजय राऊतांची खुर्ची रिकामी होती यावरून शिवसेना नेत्या सुषमा अंधारेंनी (Sushma Andhare) वक्तव्य केले आहे.

पुणे : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा दसरा मेळावा परंपरेप्रमाणे शिवाजी पार्कवर (Shivaji Park)  होईल तर शिंदे गटाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मेळावा बीकेसी मैदानावर होणार आहे.आजच्या दसरा मेळाव्याची चर्चा राज्यभरात सुरू आहे. दोन्ही नेते व्यासपीठावरून काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.  गेल्या वर्षीच्या दसरा मेळाव्यात संजय राऊतांची खुर्ची रिकामी होती यावरून शिवसेना नेत्या सुषमा अंधारेंनी (Sushma Andhare) वक्तव्य केले आहे. गेल्यावर्षी एक खुर्ची रिकामी  संजय राऊतांची (Sanjay Raut) एक खुर्ची रिकामी होती. मात्र यंदा संजय राऊत यांच्या उपस्थितीने ती खुर्ची चैतन्यमय दिसणार आहे, असं मत अंधारे यांनी व्यक्त केलंय

सुषमा अंधारेंनी या वेळी एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यावर देखील टीका केली आहे.   मुंबईमध्ये दसरा मेळावा हा एकच असतो बाकी ' इव्हेंट' चे आम्हाला माहिती नाही. आम्ही महाराष्ट्रात गाड्या पाठवल्या नाहीत. उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी संपूर्ण राज्यातून शिवसैनिक कष्टाची भाकरी घेऊन शिवतीर्थावर पोहचत आहेत अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिली आहे.

गेल्यावर्षी संजय राऊत एक खुर्ची रिकामी होती यंदा...

गेल्या वर्षीच्या दोन्ही ठिकाणच्या दसरा मेळाव्यात एका गोष्टीची चर्चा आहे ती म्हणजे दोन्ही ठिकाणी एक एक खुर्ची रिकामी ठेवली जाणार आहे. शिंदे गटाकडून व्यासपीठावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची खुर्ची राखीव ठेवली होती. तर ठाकरे गटाकडून संजय राऊतांची खुर्ची रिकामी ठेवण्यात आली होती. संजय राऊत तुरुंगात असल्याने खुर्ची रिकामी ठेवण्यात आली होती. याविषयी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या,  गेल्यावर्षी संजय राऊत एक खुर्ची रिकामी होती. यावर्षी संजय राऊत यांच्या उपस्थितीने ती खुर्ची चैतन्यमय दिसणार आहे आणि हा आमचा आनंदाचा क्षण आहे.

एकनिष्ठतेच्या बाता मारू नये

मुंबईतील आझाद मैदानावर आता शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. या दसरा मेळाव्याचा  टीझर शिंदे गटाकडून जारी करण्यात आला होता.  शिवसेनेचे एकच तत्व, साहेबांचं हिंदुत्व, साहेबांचं शिष्यत्व! शिवसेनेचा दसरा मेळावा... चलो आझाद मैदान... अशा आशयाचा तो टीझर होता. या टीझरवर देखील सुषमा अंधारेंनी टीका केली आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या,  ज्यांच्या टिझर मध्ये एकनाथ,    एकलव्य एक पक्ष एक विचार असं आहे, परंतु एकनिष्ठ हा शब्द नाहीय. हा शब्द लिहायची हिम्मत झाली नाही, त्यांनी एकनिष्ठतेच्या बाता मारू नये. 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

छगन भुजबळांचं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, नेमकी काय केली मागणी? 
छगन भुजबळांचं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, नेमकी काय केली मागणी? 
Devendra Fadanvis Vidhan Sabha Speech : लाडक्या बहिणींना पुढील हफ्ता कधी? फडणवीसांनी भाषणात सांगितलं
Devendra Fadanvis Vidhan Sabha Speech : लाडक्या बहिणींना पुढील हफ्ता कधी? फडणवीसांनी भाषणात सांगितलं
Kolhapur Crime : जप्त केलेला आयशर टेम्पो सोडण्यासाठी 50 हजारांची मागणी; कोल्हापुरात लाचखोर एपीआय, पीएसआयसह तिघांवर गुन्हा!
जप्त केलेला आयशर टेम्पो सोडण्यासाठी 50 हजारांची मागणी; कोल्हापुरात लाचखोर एपीआय, पीएसआयसह तिघांवर गुन्हा!
Almatti Dam : कर्नाटकचं पुन्हा 'नाटक', अलमट्टीची उंची पुन्हा वाढवण्याचा निर्णय, सांगली-कोल्हापूरवर महापुराचं संकट वाढणार
कर्नाटकचं पुन्हा 'नाटक', अलमट्टीची उंची पुन्हा वाढवण्याचा निर्णय, सांगली-कोल्हापूरवर महापुराचं संकट वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 19 December 2024Beed Santosh Deshmukh News Update : संतोष देशमुख यांच्या मृतदेहावर किती जखमा? पोस्टमार्टममध्ये काय?ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 19 December 2024Devendra Fadanvis Vidhan Sabha Speech : लाडक्या बहिणींना पुढील हफ्ता कधी? फडणवीसांनी भाषणात सांगितलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
छगन भुजबळांचं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, नेमकी काय केली मागणी? 
छगन भुजबळांचं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, नेमकी काय केली मागणी? 
Devendra Fadanvis Vidhan Sabha Speech : लाडक्या बहिणींना पुढील हफ्ता कधी? फडणवीसांनी भाषणात सांगितलं
Devendra Fadanvis Vidhan Sabha Speech : लाडक्या बहिणींना पुढील हफ्ता कधी? फडणवीसांनी भाषणात सांगितलं
Kolhapur Crime : जप्त केलेला आयशर टेम्पो सोडण्यासाठी 50 हजारांची मागणी; कोल्हापुरात लाचखोर एपीआय, पीएसआयसह तिघांवर गुन्हा!
जप्त केलेला आयशर टेम्पो सोडण्यासाठी 50 हजारांची मागणी; कोल्हापुरात लाचखोर एपीआय, पीएसआयसह तिघांवर गुन्हा!
Almatti Dam : कर्नाटकचं पुन्हा 'नाटक', अलमट्टीची उंची पुन्हा वाढवण्याचा निर्णय, सांगली-कोल्हापूरवर महापुराचं संकट वाढणार
कर्नाटकचं पुन्हा 'नाटक', अलमट्टीची उंची पुन्हा वाढवण्याचा निर्णय, सांगली-कोल्हापूरवर महापुराचं संकट वाढणार
विधानसभा निवडणुकीपूर्वीच अरविंद केजरीवालांचा धमाका, मोठ्या योजनेची केली घोषणा, नेमका कोणाला मिळणार लाभ?
विधानसभा निवडणुकीपूर्वीच अरविंद केजरीवालांचा धमाका, मोठ्या योजनेची केली घोषणा, नेमका कोणाला मिळणार लाभ?
Sharad Pawar : निर्घृण हत्या झालेल्या सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुबीयांची शरद पवार भेट देणार, परभणीचा सुद्धा दौरा करणार
निर्घृण हत्या झालेल्या सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुबीयांची शरद पवार भेट देणार, परभणीचा सुद्धा दौरा करणार
Santosh Deshmukh Postmortem Report: संतोष देशमुखांच्या अंगावर 56 जखमा, लोखंडी रॉडच्या लागोपाठ फटक्यांनी पाठीवर... पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये नेमकं काय?
संतोष देशमुखांच्या अंगावर 56 जखमा, लोखंडी पाईपचे वळ; पाठीवर सर्वाधिक मुका मार
Devendra Fadnavis : तुमच्या देशभक्तीवर शंका नाही, पण विरोधकांच्या खांद्यावर कोणीतरी बंदूक ठेवतंय, 'मालेगाव व्होट जिहाद'वरून फडणवीसांचा हल्लाबोल
तुमच्या देशभक्तीवर शंका नाही, पण विरोधकांच्या खांद्यावर कोणीतरी बंदूक ठेवतंय, 'मालेगाव व्होट जिहाद'वरून फडणवीसांचा हल्लाबोल
Embed widget