एक्स्प्लोर
Advertisement
लोकसभा तिकिटाच्या प्रश्नावर पवारांशी चर्चा, भेटीनंतर उदयनराजे म्हणतात...
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांनी आगामी लोकसभेच्या तिकिटाविषयी बातचीत केली. सातारा जिल्ह्यातील आमदारांनी श्रीनिवास पाटील यांचं नाव सुचवलं आहे. त्या पार्श्वभूमीवर उदयनराजेंनी पवारांची भेट घेतली.
सातारा : सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात सध्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वाद पाहायला मिळतोय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांनी आगामी लोकसभेच्या तिकिटाविषयी बातचीत केली.
या भेटीविषयी उदयनराजे म्हणाले, “भेट घेतली, मिठी मारली आणि सांगितलं, तुम्ही आमचेच आहेत.. पवार साहेबांविषयी काय बोलायचं.. एवढे मोठे नेते आहेत, आपल्या सगळ्यांना लाजवल, या वयातही एवढी धावपळ करतात. काय बोलायचं त्या माणसाविषयी... ठिकंय.. म्हटलं, फसवाफसवी करु नका फक्त, नाहीतर आपल्याला पण कळतं..”
राष्ट्रवादीकडून तिकीट विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांनाच मिळणार अशी चर्चा सुरु असताना सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या सर्वच आमदारांनी श्रीनिवास पाटील यांचं नाव पुढे केल्याचं बोललं जातंय. त्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सातारा दौऱ्याच्या निमित्ताने राजकीय वातावरण ढवळून निघालं.
साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांची श्रीनिवास पाटलांना पसंती
साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे सातारा जिल्हा राजकारणामध्ये कायमच चर्चेचा विषय असतात. गेल्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंना राष्ट्रवादीचं लोकसभेचं तिकीट मिळवण्यासाठी जनशक्ती दाखवावी लागली आणि या जनशक्तीमध्ये खुद्द शरद पवार उपस्थित होते. उपस्थित जनसमुदाय बघून आणि बाकीचा अभ्यास करत शरद पवारांनी जिल्ह्यातील सर्व राष्ट्रवादीच्या आमदारांना एकत्र घेत लोकसभेचं तिकीट उदयनराजेंना देऊ केलं. मात्र सध्या उदयनराजेंच्या विरोधात सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सर्व आमदार उभे ठाकल्याचं दिसून येत आहे.
शरद पवारांनी पुणे येथे साताऱ्यातील आमदारांच्या बोलावलेल्या बैठकीमध्ये हा विषय चर्चेला आला. खासदार उदयनराजेंना यावेळी तिकीट देण्यात येऊ नये, अशी भूमिका आमदारांनी घेतल्याची माहिती आहे. यावेळी एकमताने श्रीनिवास पाटील यांचं नाव पुढे आल्याचं बोललं जातंय.
पवारांच्या स्वागतासाठी उदयनराजे सर्वात पुढे
शरद पवार साताऱ्यात येतात त्यावेळेला उदयनराजे यांची अनुपस्थिती ही कायमच राष्ट्रवादीच्या गोटामध्ये चर्चेत असते. पण यावेळी शरद पवारांच्या येण्याअगोदर खासदार उदयनराजे भोसले सर्किट हाऊसच्या बाहेर एका बाजूला आपल्या कार्यकर्त्यांसमवेत पवारांच्या स्वागतासाठी उभे होते.
सर्किट हाऊसला शरद पवार दाखल झाले आणि उदयनराजेंनी स्वागतासाठी उभे असलेल्या इतर आमदारांना बाजूला करत पवार साहेबांचं स्वागत केलं. त्यानंतर उदयनराजेंनी पवारांसोबत सुमारे सात मिनिटे चर्चा केली. या चर्चेत विषय होता तो लोकसभेचं तिकीट..
शरद पवारांसोबत झालेल्या चर्चेनंतर उदयनराजे वेगळ्याच भूमिकेत बाहेर पडले. नुसते बाहेर पडले नाहीत, तर बाहेर येत पवारांच्याच गाडीचा दरवाजा उघडत ते त्यांच्या गाडीच्या पुढच्या सीटवर बसणार होते. इतक्यात त्यांना ही पवार साहेबांची गाडी असल्याचं कार्यकर्त्यांनी लक्षात आणून दिलं. यावरही त्यांनी मजेशीर उत्तर दिलं आणि आपली आणि ही सारखीच गाडी असल्याचं म्हणाले.
पाहा व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement