एक्स्प्लोर

गोपीनाथ मुंडे म्हणजे फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड, उदयनराजे गहिवरले

गोपीनाथ गडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. यावेळी गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा देताना राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले भावूक झाले.

बीड : दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा आज चौथा स्मृती दिन आहे. यानिमित्ताने बीड जिल्ह्यातील परळी इथल्या गोपीनाथ गडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. यावेळी गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा देताना राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले भावूक झाले. गोपीनाथ मुंडेंसोबतचे अनेक किस्से त्यांनी उपस्थितींना ऐकवले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे भोसले, खासदार छत्रपती संभाजीराजे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, जलसंधारणमंत्री राम शिंदे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि आमदार, खासदार उपस्थति होते. ''गोपीनाथ मुंडे म्हणजे फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड'' ''गोपीनाथ मुंडेंबद्दल बोलताना अनेक आठवणी डोळ्यासमोर येतात. त्यांच्या जाण्याने माझ्यासाठीच नाही, तर सर्वांसाठीच एक मोठी पोकळी निर्माण झाली. ते एक फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड होते,'' असं म्हणत उदयनराजे भावूक झाले. ''गोपीनाथ मुंडेंनी मला बोलावून मंत्रिपद दिलं'' ''औरंगाबादला पक्षाची बैठक होती. ती संपल्यानंतर नाशिकमार्गे जायचं ठरवलं. नाशिकमध्ये असताना गोपीनाथ मुंडेंचा फोन आला. त्यांनी सांगितलं उद्या मुंबईला या. मी म्हटलं काही खास काम आहे का, ते म्हणाले तुम्ही या, तुम्हाला यावं लागेल. त्यांना सांगितलं काही खास असेल तर आत्ताच येतो. मुंडे साहेब म्हणाले आत्ता नको, उद्या या, तुमचा शपथविधी आहे,'' असा किस्सा उदयनराजेंनी सांगितला. ''खऱ्या अर्थाने वडिलांनंतर मला कुणी जवळ केलं असेल, तर ते मुंडे साहेब होते. त्यामुळे आज इथे छत्रपती म्हणून नाही, तर मुंडे साहेबांचा मुलगा म्हणून इथे आलोय, असं सांगत उदयनराजेंचा कंठ दाटून आला. ''गोपीनाथ मुंडेंनी कॉलर उडवायला शिकवली'' ''प्रत्येकाला उत्सुकता असते, उदयनराजे कॉलर का उडवतात. त्याचं कारण सांगतो. लोकांसाठी जो माणूस झटतो आणि आयुष्यभर काम करतो, त्यालाच कॉलर उडवण्याचा अधिकार. त्यामुळे मुंडे साहेब कॉलर उडवायचे म्हणून मी देखील कॉलर उडवतो,'' असं उदयनराजेंनी सांगितलं. ''कधीही हाक मारा, तुमचाच आहे'' ''गोपीनाथ मुंडेंनी कधी जात-पात मानली नाही. सर्वांना तळहाताच्या फोडाप्रमाणे वाढवलं. त्यांच्या सांगण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. त्यांचे तेच गुण पंकजा आणि प्रितम मुंडे यांच्यात दिसून येतात. आपण म्हणतो हा श्रीमंत, तो श्रीमंत, पण आज खऱ्या अर्थाने श्रीमंत आहेत, ते गोपीनाथ मुंडेंसारखे लोक,'' असं उदयनराजे म्हणाले. दरम्यान, भाषणात आपण भावूक झाल्याबद्दल उदयनराजे सर्वांना सॉरी म्हणाले. शिवाय, ''कधीही मला हाक मारा, तुमचाच होतो, तुमचाच आहे आणि भविष्यातही तुमचाच असेल, हे वेगळं सांगण्याची गरज नाही,'' असं उदयनराजेंनी सांगितलं आणि भाषण संपवलं. VIDEO : उदयनराजेंचं भाषण

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 फुटीर खासदारांसंबंधी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Maharashtra Live News Updates: ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 फुटीर खासदारांसंबंधी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Gadchiroli Snake Bite Student Death: आश्रम शाळेतील 3 विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू; गडचिरोतील धक्कादायक घटना, मध्यरात्री झोपल्यानंतर काय घडलं?
आश्रम शाळेतील 3 विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू; गडचिरोतील धक्कादायक घटना, मध्यरात्री झोपल्यानंतर काय घडलं?
Mumbai Crime News: विक्रोळीतील ज्या घरात वडील-मुलाचा दुर्दैवी अंत झाला, आता 'सील' केलेल्या त्याच घराला लागली भीषण आग; सिलिंडरचाही स्फोट, नेमकं काय घडलं?
विक्रोळीतील ज्या घरात वडील-मुलाचा दुर्दैवी अंत झाला, आता 'सील' केलेल्या त्याच घराला लागली भीषण आग; सिलिंडरचाही स्फोट, नेमकं काय घडलं?
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस

व्हिडीओ

Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
Kalyan Stray Dog: चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
IND vs SL Sarfaraz Khan : टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
BMC iPads News: मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
IND vs SL : शेवटच्या षटकात 3 चेंडू, 3 षटकार अन् भारताचा थरारक विजय; सिराजच्या बॅटमध्ये असं काय होतं? श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली, गंभीरलाही विश्वास बसेना, पाहा Video
शेवटच्या षटकात 3 चेंडू, 3 षटकार अन् भारताचा थरारक विजय; सिराजच्या बॅटमध्ये असं काय होतं? श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली, गंभीरलाही विश्वास बसेना, पाहा Video
Embed widget